मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ५६ - ५७

क्रीडा खंड - अध्याय ५६ - ५७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

त्यजिलें विनायकानें, शूराचपलांस तेधवा तों हे ।

आले रौद्रपुरासी, कथिते झाले नरांतका ते हें ॥१॥

आहे विनायकाचा, अतुल पराक्रम जगांत या तीनी ।

त्यासी युद्ध कराया, एकहि योद्धा नसे नृपा अवनीं ॥२॥

त्यांचें भाषण ऐकून, कोपे तेव्हां नरांतक प्रचुर ।

हें विश्व सर्व जणुं कीं, ग्रासाया पसरिलें मुखा थोर ॥३॥

गर्जे भीषण तेव्हां, गेली दाही दिशांस आरोळी ।

कांपे अवनी सारी, अपुल्या वीराम सशस्त्र या जवळी ॥४॥

ऐकुन आज्ञा आली, सेना तेथें त्वरीत चतुरंग ।

सिंदुर चर्चित शिरसा, लठ्ठालठ्ठी करीत बहुरंग ॥५॥

पुढती स्वार शिबंदी, मागुन रथ ते सुवर्णखांबाचे ।

ध्वज फडकती रथीं त्या, आयति सह ते समस्त रथ त्यांचे ॥६॥

बैसति रथांवरी त्या, मंत्री रथि कीं महारथी वीर ।

सारथि हाकित वाजी, थाट दिसे जोरही दिसे प्रचुर ॥७॥

देव भयाभित झाले, वाटे वधितो विनायका आजी ।

भाव मनीं असुरांचा, कळला देवां खरोखरी गा जी ॥८॥

काशीराजा होता, ज्या नगरीं त्या समीप ये असुर ।

बुरुजावरील सेवक, पाहति सेना समस्त ते असुर ॥९॥

मात कळविती भूपा, सत्वर सेवक बघून आलेले ।

भूपें आज्ञा केली, सेना सत्वर सु-वीर ते आले ॥१०॥

भूपति करांत घेई, धनु-बाणादी असी तसें चर्म ।

चिलखत धारण केलें, सेना सत्वर प्रभू यजी कर्म ॥११॥

वारुवरी तो बैसे, डंका वाजे जमोन ये सैन्य ।

त्रिभुवन जणुं जिंकाया, समर्थ झालों गमे अम्ही धन्य ॥१२॥

युद्धोत्साह भटांचा, व्यक्‍त असा भासला सख्या वदनीं ।

नगराच्या पूर्वेला, जमली सेना प्रधान कथि वदनीं ॥१३॥

अणखी वदतो भूपा, प्रसंग दारुण मला दिसे मोठा ।

यास्तव आपण ऐकुन, सुज्ञांसह त्या नरांतका भेटा ॥१४॥

अपुल्या कार्यासाठीं, नीचालाही अवश्य भेटावें ।

ऐसें बृहस्पती हें, मत देई तें अवश्य मानावें ॥१५॥

राज्याच्या नाशाची, वेळ असे म्हणुन भासतें भावा ।

यास्तव या वेळीं कीं, स्वहितसाठीं विनायका द्यावा ॥१६॥

प्रधान भूपति दोघे, विचार करिती रणांगणीं जाया ।

इकडे घेरिति शत्रू, शिरले नगरांत तेधवां सखया ॥१७॥

सदनें दग्ध करी तीं, झाला कल्लोळ त्या पुरामाजी ।

भूपति ऐकुन कर्णी, वदला सेनेस तेधवां हें जी ॥१८॥

अपुल्यासमक्ष ललना, पीडिति सार्‍या असूर ते फार ।

यास्तव विचार कसला, समरामाजी शिरा तुम्ही चतुर ॥१९॥

ऐसें बोलुन भूपति, अपुल्या वारुस मारितो टांच ।

हस्तीं धनुष्य घेऊन, आरंभी तीर-मार तो साच ॥२०॥

भूपासमीप सैनिक, वर्षति श्र ते सु-वृष्टि-सम सारे ।

मारा बहूत होतां, राक्षस मेले विदारिलीं शरिरें ॥२१॥

कांहीं कर चरणां बिन, पोटें फुटलीं तशींच ते हृदयीं ।

झाले विदीर्ण तेव्हां, राक्षस हटल रणांगणाठायीं ॥२२॥

विजयाच्या ईर्षेनें, काशीराजा करीत हरिनाद ।

शिरला शत्रूंमध्यें, तों एकाकी पराक्रमी यश-द ॥२३॥

राक्षस-भट लोळविले, पाहुन तो एकटा तया समरीं ।

जाती समीप त्याच्या, सोसुन मारा धरीत त्यांस करीं ॥२४॥

भूपति धरितां तेव्हां, वदला वीरा नरांतक प्रबल ।

शासन करण्या इच्छित, होतों आम्ही बहूत कीं काल ॥२५॥

भूपति लाभे आम्हां, कश्यपनंदन धरुन काय फल ।

ऐसें बोलुन त्यानें, भूपा रथिं घातलेंच तत्काल ॥२६॥

हर्षभरें दळ सारें, संगें घेऊन जात माघारीं ।

काशीराजा नेला, कळली ती मात त्या नृपा नगरीं ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP