मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ७२

क्रीडा खंड - अध्याय ७२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

धामीं जाण्यापूर्वी दूतांनीं कश्यपास तें वृत्त ।

कळवुन कथिलें नंतर, अदितीला तेधवांच तें वृत्त ॥१॥

तेव्हां अदिती सूतां, भेटाया आश्रमांतुनी आली ।

माता बघून त्यानें, स्यंदन त्यजिला त्वरीत ये खालीं ॥२॥

धांवत जाउन तिजला, दिधली प्रेमें त्वरीत कीं भेटी ।

इतुक्यामध्यें आला, काशीराजा तिथें त्वरें भेटी ॥३॥

वंदुन अदीति चरणीं, नृपती बोले विनायका सदनीं ।

नेउन बहूत दिन ते, झाले म्हणुनी न कोप करुं जननी ॥४॥

कथिला तिजला सारा, झालेला सर्व थोर इतिहास ।

ऐकुन पुत्रावरुनी, ओवाळी लिंबलोण दृष्टीस ॥५॥

नंतर नमिती दोघे, कश्यपमुनिंना यथाविधी धामीं ।

कश्यप सूता तेव्हां, आलिंगुनि शिरस घ्राणिलें प्रेमीं ॥६॥

सन्मानी भूपासी, आशीर्वाद प्रसाद तो दिधला ।

नंतर परतुन जाण्या, आज्ञा दिधली नमीत दोघांला ॥७॥

भूपति नगरीं आला, राज्य करी तो बहूत दिन-रजनीं ।

आनंदानें पुढती, राज्य करी बहुत आब्द वर-दानीं ॥८॥

कश्यप अदिती धामीं, आनंदानें विनायकासहित ।

एके दिवशीं बैसति, पुशिलें सूतें तयास अवचीत ॥९॥

अवतार-कृत्य झालें, आज्ञा द्यावी स्वधामिं जाण्यासी ।

ऐकुन माता-पितरें, शोकाकुल जाहलीं तयासरसीं ॥१०॥

वदती विनायकासी, जासी तरि आमुचें कसें होई ।

बोले सूत तयांना, स्मरतां संनिध खरोखरी येई ॥११॥

माता बोलत असतां, तो एकाकी त्वरीत अदृश्य ।

रचिती त्वरीत तेथें, सुंदर मंदिर सुभव्य तें दृश्य ॥१२॥

त्या मंदिरांत स्थापिति, मूर्त विनायक सदैव तो भेटे ।

त्यांच्या इच्छेपरि तो, दर्शन द्यावें म्हणून कीं प्रकटे ॥१३॥

विधि व्यासांसी म्हणती, त्रेता-युगिं सिंधु नाम दैत्याचें ।

हनन करावें यास्तव, गणपति सुत होत त्या उमापतिचें ॥१४॥

केल्या बहूत लीला, सुरम्य असती म्हणून सांगाव्या ।

इच्छा असली तरि मी, व्यासां तव सांगतों श्रवुन गाव्या ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP