मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ७४

क्रीडा खंड - अध्याय ७४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

रविदत्त गर्भ होता, तो तेजोमय म्हणून राणीस ।

साहे न तिला म्हणुनी, सोडी सिंधूमधेंच गर्भास ॥१॥

त्यापासुन बालक हें, निर्मित झालें सतेज बलवान ।

सिंधू विप्र नटे मग, रायासी देत सूत तो अणुन ॥२॥

भूपा तुझे सतीनें, त्यजिला जो गर्भ सागरामाजी ।

तो सुत जन्मा पावे, घेईं भूपा ययास तूं आजी ॥३॥

रक्षीं तयास आतां, ऐकुन मग त्या सुतास स्वीकारी ।

केला जातकविधि मग, सिंधू म्हणुनी प्रथीत नाम करी ॥४॥

होता लाल म्हणूनी, माता-पितरीं तयास रक्तांग ।

दिधलें नाम असें हें, दुसरें म्हणती रुचीर द्वयआंग ॥५॥

उग्रेक्षणाख्य नामें, प्रथित असें नाम आणखी देती ।

विप्रप्रसादनाख्या, नामीं झाली प्रसिद्ध ती विभुती ॥६॥

जनकापाशीं सिंधू, आज्ञा मागे तपास जाण्यास ।

मी वर प्राप्त करुनी, त्रीजगताचें करीन राज्यास ॥७॥

आज्ञा होतां जाई, कांतारीं तो कराव्या तपासा ।

अंगुष्ठ-पर्व तिष्ठे, हस्तांवरती करी बघे विधिसा ॥८॥

शुक्रांनीं दिधलेला, मंत्र जपे तो बहूत आब्द-मिती ।

सूर्य प्रसन्न झाला, तिष्ठे त्याच्या समीप बहु प्रीती ॥९॥

तुष्टे तपसा पाहुन, वर मागे तो म्हणे अरे सिंधू ।

मजला अमर करावें, वदला सूर्यास तेधवां सिंधू ॥१०॥

सूर्य वदे सिंधूला, जन्मा आला तयास मृत्यु असे ।

देई वरास ऐके, मानव सुर असुर वा दिकादि नसे ॥११॥

अणखी पशुही नागां, यांपासुन ही नसेच ये साच ।

दिवसा रात्रीं तैसा, सायंकालीं अशा उषा याच ॥१२॥

काळांमध्यें नाहीं, मृत्यू तुजला नसेच हें खास ।

तुजला अमृत देतों, उदरीं राहें करुन कीं वास ॥१३॥

तोंवर मृत्यू नाहीं, वर देउनियां रवी करी अस्त ।

केली तपसा-पूर्ती, सदनीं आला निघून तो स्वस्थ ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP