मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ७

क्रीडा खंड - अध्याय ७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

कश्यपसदनामाजी, गणपतिनें घेतला असे जन्म ।

ऐकुन वार्ता आले, वशिष्ठमुनी वामदेव ते प्रथम ॥१॥

आणखि बहूत मुनिही, गणपतिच्या दर्शनास मग येत ।

ऐकुन अदिती बालक, घेउन ती पातली पुढें त्वरित ॥२॥

बत्तीस लक्षणांनीं, युक्त अशा बालकास ते बघती ।

करिती परोपरींनीं, स्तुति त्याची रक्षणास ते बघती ॥३॥

नंतर एके दिवशीं, कश्यप गेले नदीतिरीं स्नाना ।

इकडे अदिती करित्ये, होमाची सिद्धता तशी यजना ॥४॥

बालक निजलें होतें, स्वस्थ असें पालकांत तें सदनीं ।

ऐशी संधी बघुनी, विरजा नामें असूर कामीनी ॥५॥

आली हळूच तेथें, बालक घेई त्वरीत ती विरजा ।

परिपक्व केळ वदनीं, घाली तैसें शिशू गिळी सहजा ॥६॥

पडली निचेष्ट तेथें, उदरीं निघती कळा बहू लोळे ।

बालक वर्धित झालें, उदर विदारुन उरीं तिच्या खेळे ॥७॥

उदरविदारण झालें, किंकाळुन मरण पावली विरजा ।

नामापरीच गेलें, पाप तिचें मुक्त जाहली विरजा ॥८॥

कामें समस्त करुनी, अदिती करित्ये तपास पुत्राचा ।

पाहे समीप सदनीं, थांग नसे तीस लागला त्याचा ॥९॥

आक्रोश करित आली, अदिती तेव्हां तशीच बाहेर ।

राक्षसबाई तेथें, मृत झाली पाहिली बहू थोर ॥१०॥

बालक वक्षस्थळिं तें, हांसे खेळे बघून साचार ।

उचलुनि कडेवरी तें, अदिती घेई त्वरीत ती चतुर ॥११॥

सदनीं आणुन त्याला, न्हाऊं घाली मुदीत ती भारी ।

सांगे वृत्त पतीशीं, भूमीचा भार बाल ऊन करी ॥१२॥

कश्यप मनांत ताडी, करिता झाला यथाविधी शांती ।

कश्यप सतीस लेषहि, पुत्राला तूं त्यजूं नको वदती ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP