मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय १६ वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय १६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय १६ वा Translation - भाषांतर ११८निस्पृह ते वाणी ऐकूनि गायक । पावूनि आनंद करिती स्तुति ॥१॥अनुज्ञा तयांसी लाभलीं मुनींची । म्हणती प्रगटलासी विष्णूची तूं ॥२॥गायक म्हणती जनहो, हा ‘धर्म’ । करील शासन दुर्जनांसी ॥३॥ईश्वरीशक्तींनें पाळील हा लोकां । प्रत्युपकारकां करां घेई ॥४॥शीत उष्णकाळीं उदकग्रहण । सूर्यनारायण करी परी - ॥५॥वर्षाकाळीं त्याची करीतसे वृष्टि । पुरवील तैसी जनेच्छा हा ॥६॥समभावें नित्य जनां वागवील । पर्जन्य पाडील इष्ट वेळीं ॥७॥वासुदेव म्हणे निशिकांतासम । पृथूचें दर्शन सकलां प्रिय ॥८॥११९गुप्तवित्त, गूढकार्य तेंवी मार्ग । सर्वदा अव्यक्त वरुणासम ॥१॥बेनारणीमाजी प्रगटला अग्नि । टाकील जाळूनि कंटकांसी ॥२॥सर्वव्यापी निर्विकार जेंवी आत्मा । निर्विकार जाणा तेंवी यासी ॥३॥दंडणार नाहीं अदंडय शत्रूसी । पुत्रही अपराधी दंडार्ह या ॥४॥प्रकाशेल सूर्य तेथ तेथ याचें । निष्कंटक साचें राज्य जाणा ॥५॥दृढव्रत सत्यसंध हा ब्रह्मण्य । तैसाचि शरण्य वृद्धसेवी ॥६॥मानद हा भूतां वास्त्सल्य दीनांचें । परस्त्रिया यातें मातेसम ॥७॥वासुदेव म्हणे निजपत्नीवरी । आत्मभावें करी प्रेम ज्ञाता ॥८॥१२०प्रजेप्रति पिता, ज्ञात्यांचा हा दास । प्रिय सकलांस आत्म्यासम ॥१॥मित्रानंदकारी सत्संगनिरत । दुष्टदंडनार्थ सिद्ध सदा ॥२॥बैसूनि विजयरथीं मही गोल । शौर्ये संरक्षील सूर्यासम ॥३॥दोहूनियां मही रक्षील प्रजेसी । भेदील गिरींसी चापबळें ॥४॥समान यापरी करील हा भूमि । सिंहचि हा वनीं अरिंसे तेंवी ॥५॥वासुदेव म्हणे अलौकिक ऐसा । प्रभाव नराचा उद्धारक ॥६॥१२१सरस्वतीच्या उगमीं । निर्मील हा यज्ञभूमि ॥१॥तयास्थानीं शत यज ।करितां इंद्राचें या विघ्न ॥२॥पुढती कुमारांचा बोध । नृपेंद्रासी या लाभेल ॥३॥देवदैत्यही ते जाण । याचे करितील गुणगान ॥४॥ऐसा पृथुपराक्रम । वर्णिताती बंदीजन ॥५॥वासुदेव म्हणे सर्व । ईशकृपेचा हा खेळ ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP