मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय ६ वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय ६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय ६ वा Translation - भाषांतर ३६मैत्रेय बोलती विदुरा वृत्त । देव विरंचीस निवेदिती ॥१॥ब्रह्मा विष्णु वृत्त जाणूनि पूर्वीचि । दक्षयज्ञाप्रति नव्हते आले ॥२॥ब्रह्मा म्हणे वैर करितां श्रेष्ठासी । जगीं हेचि गती होई नित्य ॥३॥अपराध जरी असेल थोरांचा । द्वेष तरी त्यांचा करणें न्याय्य ॥४॥स्वयेंचि अपराध करुनि दुर्बल । जय इच्छितील तरी व्यर्थ ॥५॥वासुदेव म्हणे ब्रह्मा तैं देवांसी । म्हणे अपराधी एथ तुम्ही ॥६॥३७हर्विर्भाग शंकरासी । अर्पिला न कां योग्ग्यासी ॥१॥क्रुद्ध होतां जटाधर । जगत्संहार करील ॥२॥मर्मविदारक शब्दें । दक्षें अवमानिलें त्यातें ॥३॥कांताही ते पतिव्रता । गेली त्यागूनियां देहा ॥४॥ऐसें असतां वांचलांती । भाग्य मानितों मी हेंचि ॥५॥कल्याणाची जरी इच्छा । आशीर्वाद मागा त्याचा ॥६॥दयाळु तो करुनि क्षमा । सिद्ध करील त्या यज्ञा ॥७॥न कळे शिवाचें सामर्थ्य । विष्णूसवें जाणा मज ॥८॥वासुदेव म्हणे शिव । ठरवी स्वतंत्र निर्णय ॥९॥३८पुढती देवांसवें ब्रह्मा कैलासासी । शिवभेटीप्रति सिद्ध झाला ॥१॥वर्णवेन शोभा कैलासगिरीची । शिवाची वसती तयास्थानीं ॥२॥उत्तुंग तो सर्व गिरींमाजी, सिद्ध । वसताती नित्य तयाठाईं ॥३॥जन्मसिद्ध कोणी तप मंत्रौषधि । योजूनियां सिद्धि संपादिती ॥४॥गंधर्व अप्सरा नित्य तपस्थानीं । शिकरें घ्या ध्यानीं रत्नमय ॥५॥ताल, तमाल, ते मंदार, कांचन । तोलुनि गगन धरिती वाटे ॥६॥पुष्पफलांनीं तें स्थान बहरलें । शोभती कमळें उत्पलादि ॥७॥वासुदेव म्हणे बहु पशुपक्षी । स्वैर संचारती काननीं त्या ॥८॥३९महानदी नंदा अलकनंदाही । हारचि ते पाहीं कैलासाचे ॥१॥स्वर्गांगना देवांसवें तयास्थानीं । क्रीडती येऊनि अत्यानंदें ॥२॥केशर-कस्तुरीसंयुक्त तें जल । गजही विहार करिती तेथें ॥३॥अलगा नगरी शोभे कुबेराची । विमानीं हिंडती यक्षस्त्रिया ॥४॥ब्रह्मदेवासवें मयूरांचें नृत्य । पिक गातां गीत हर्ष देवां ॥५॥भ्रमरगुंजन पुष्पांचा सुगंध । देई ब्रह्मानंद देवांप्रति ॥६॥वैडूर्यसोपानयुक्त पुष्करिणी । करिती जलयानीं क्रीडा यक्ष ॥७॥वासुदेव म्हणे ऐसे जातां जातां । एका वटवक्षा अवलोकिती ॥८॥४०कोशानुकोश ज्या उंची तैं विस्तार । वटवृक्ष थोर ऐसा होता ॥१॥सनकादि मुनि गुह्यक, राक्षस । कुबेरही तेथ दिसला तयां ॥२॥मध्यभागीं शिवशंकर बैसले । दक्षिणांकीं ठेलें चरणपद्म ॥३॥वाम जानूवरी शोभे वाम हस्त । तर्क मुद्रास्थित अवलोकिले ॥४॥प्रसन्न वदन अंगीं चिताभस्म । रुद्राक्षधारण चंद्रकला ॥५॥दर्भासनावरी बैसूनि नारदा । ब्रह्मबोध साचा करिती प्रेमें ॥६॥शांत स्वस्थ ऐशा पाहूनि शंकरां । नमस्कार केला ब्रह्मदेवें ॥७॥शिवही तयासी वंदूनि सन्मानी । बैसती वंदूनि सकल देव ॥८॥वासुदेव म्हणे हांसताचि ब्रह्मा । बोलला वचना ऐका काय ॥९॥४१नम्रभावें शिवा, वंदिसी तूं मज । परी सर्वजग नियंता तूं ॥१॥प्रकृति-पुरुषां आधार तूं एक । यज्ञाचा आरंभ केला तूंचि ॥२॥वेदरक्षणाचा उद्देश धरुनि । धर्मही या जनीं केला त्वांचि ॥३॥अधर्मे शासन धर्ममार्गें मोक्ष । देसी तूंचि एक सकलांप्रति ॥४॥सर्वभावें तुज येती जे शरण । भय कदाहि न तयांप्रति ॥५॥मायामोहित जे पराचा उत्कर्ष । न साहूनि निंद्य दुर्भाषणें - ॥६॥स्वयेंचि आपुला करिताती नाश । क्षमाचि तयांस करणें योग्य ॥७॥यास्तव दक्षाचे अपराध पोटीं । घालूनि तयासी उठवीं देवा ॥८॥तेंवी भृग्वादींसी करुनियां क्षमा । हविर्भाग यज्ञामाजी घेईं ॥९॥वासुदेव म्हणे ब्रह्मा ऐशा परी । नम्रभावें करी प्रार्थनेतें ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP