मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय १३ वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय १३ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय १३ वा Translation - भाषांतर १०२जोडूनियां कर मैत्रेयांसी क्षत्ता । प्रचेतससत्रा कथीं म्हणे ॥१॥सत्रांत नारदें कथिल्या त्या कथा । मजसी निवेदा दयावंता ॥२॥कोणाचे वंशज, कोठें केलें सत्र । वृत्तांत समग्र निवेदा तो ॥३॥मैत्रेय बोलती ‘उत्कल’ ध्रुवाचा । पुत्र महाज्ञाता भासे जड ॥४॥यास्तव बंधु जो सापत्न ‘वत्सर’ । जया राज्यभार समर्पिला ॥५॥स्वर्वीथीचे ठायीं तया पुत्र षट्क । तिग्मकेतु, इष, पुष्पार्ण ते ॥६॥ऊर्ज, वसु, जय, पुत्र तो सहावा । वृत्त वासुदेवा नवलकारी ॥७॥१०३प्रभा, दोषा, ऐशा भार्या पुष्पार्णासी । त्रिसंधी प्रभेसी पुत्र झाले ॥१॥प्रदोष निशीथ व्युष्ट ते दोषेतें । पुष्करिणी शोभे व्यष्टकांता ॥२॥सर्वतेजा पुत्र कांता त्या ‘आकूति’ । चक्षु’ तिजप्रति पुत्र एक ॥३॥नड्वला राणीसी सुपुत्र द्वादश । सदाचारनिष्ठ सर्वही ते ॥४॥पुरुकुत्स, त्रित, द्युम्न, सत्यवान । ऋत, अग्निष्टोम, व्रत, शिबि ॥५॥उल्मुक, प्रद्युम्न तेंवी अतीरात्र । द्वादश हे पुत्र सुविख्यात ॥६॥वासुदेव म्हणे पुढती त्यांचा वंश । देऊनियां लक्ष परिसा आतां ॥७॥१०४उल्मुककांता ते पुष्करिणीप्रति । अंग, सुमना, ख्याति, क्रतु, गय ॥१॥अंगिरस, ऐसे सहा पुत्र होती । अंग-सुनीथांसी वेन झाला ॥२॥निंद्यकर्मे त्याचीं पाहूनियां अंग । त्यागूनियां राज्य निघूनि गेला ॥३॥पुढती वेनाचा नाश विप्रशापें । होतांचि तें माजे अराजक ॥४॥यास्तव मंथूनि वेन सव्य करा । मुनींनीं निर्मिला पुत्र पृथु ॥५॥अंशावतार हा नृपाळ प्रथम । वासुदेव गान पुढती करी ॥६॥१०५क्षत्ता म्हणे ऐसा दुराचारी पुत्र । जाहला अंगास केंवी सांगा ॥१॥घार ऐसें कृत्य केलें काय तेणें । विप्रशाप जेणें जाहला त्या ॥२॥मैत्रेय कथिती अंगाच्या यज्ञांत । देवता न भाग स्वीकारिती ॥३॥दोष काय ऐसें ऋत्विजां पुशितां । पुत्रविहीनता म्हणती दोष ॥४॥ऋत्विजोपदेशें पुढती अंगासी । पुत्रकाम इष्टि करितां लाभ ॥५॥दिव्य पुरुषानें अर्पिला प्रसाद । जेणें पुत्रलाभ अंगाप्रति ॥६॥वासुदेव म्हणे मातामह त्याचा । पुत्र अधर्माचा ‘मृत्यु’ स्वयें ॥७॥१०६बाल्यादारभ्य तो मातामहासम । यास्तव अधर्म करी बहु ॥१॥वेन आला ऐसें ऐकूनीच जन । जाती घाबरुन पळती दूर ॥२॥निर्दय तो क्रूर पशूसम बाळां । झोडपी, स्वलीला करितां हर्षे ॥३॥उपाय तयासी करी बहु अंग । परी वेनरंग पालटेना ॥४॥अंतीं कुसंतानाहूनि नि:संतान । भलें ऐसें मन चिंती त्याचें ॥५॥संतती आत्म्यासी मोहकारी वाटे । कारण दु:खातें उभयही ते ॥६॥सत्पुत्रही जरी होतां दु:खमग्न । पिता होई खिन्न तयास्तव ॥७॥यास्तव दु:खद भला कुपुत्रचि । वैराग्याची प्राप्ति होई तेणें ॥८॥वासुदेव म्हणे सुखाहूनि दु:ख । वैराग्यकारक होई जनीं ॥९॥१०७मुनि मैत्रेय क्षत्त्यासी । वृत्त अंगाचें कथिती ॥१॥ऐसा राव चिंतामग्न । क्षणही न तया चैन ॥२॥अंतीं गाढ निद्रेमाजी । असतां कांता एके रात्रीं ॥३॥गेला त्यागूनि नगर । सदनीं होई हाहा:कार ॥४॥शोध घेतांही न लाभे । आत्मबोध जैं मूढातें ॥५॥वासुदेव म्हणे अंतीं । होई निराशा सर्वांची ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP