मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय ४ था स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय ४ था सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय ४ था Translation - भाषांतर २३बोलूनियां ऐसें शिव विराम पावती ॥ उभय मार्गेहीं दु:ख सतीचें चितिती ॥१॥माहेरींच्या अपमानें सोडील ही प्राण ॥ जाऊं नको म्हणतां अंतीं तोचि परिणाम ॥२॥ऐकूनि पतीची उक्ति सती भांबावली ॥ चिंतिता अंतरामाजी वृत्ति द्विधा झाली ॥३॥माहेराची ओढ, तेंवी शिवाचेंही प्रेम ॥ प्रसंग कठीण अंतीं न राहेचि भान ॥४॥अश्रुपुर लोटे, अंग कांपे थरथरां ॥ अत्युग्र मुद्रेनें पाहे सदय शंकरां ॥५॥वासुदेव म्हणे अंतीं माहेरींची वाट ॥ धरुनि निघाली सती होऊनि क्रोधांध ॥६॥२४पादचारी जाई स्वामिनी हें दूतां । पाहूनियां चित्ता खेद वाटे ॥१॥धांवूनि सत्वरी नंदीसवें जाती । शंख निनादती दुंदुभीही ॥२॥प्रार्थुनियां नंदी घेई निजपृष्ठीं । सपरिवारेसी सती जाई ॥३॥छत्र-चामरें त्या माला, वेणुनाद । आरसे, कंदुक, कमळें आदि ॥४॥यज्ञमंडपीं ते येईअ ऐशा थाटें । स्वागत तियेचें न करी दक्ष ॥५॥माता-भगिनींसी आनंद जाहला । प्रसन्न तियेला भेट देती ॥६॥प्रेमाश्रु तयांच्या येती नयनांत । सती अंतरांत परी दु:खी ॥७॥वासुदेव म्हणे विनाशाची वेळ । येतां थोर थोर चुकती ऐसे ॥८॥२५नसो, सन्मानिलें नाहीं आपणासी । भाग यज्ञामाजी नाहीं शिवा ॥१॥नसो तोही परी निंदी पिता तया । क्रोध पाहूनियां सतीलागीं ॥२॥आरक्तनयना अग्नीचि ते भासे । परी न दक्षातें भान कांहीं ॥३॥पाहूनि तें क्रुद्ध होती शिवदूत । आंवरी तयांस सती स्वयें ॥४॥परी शिवद्वेषें भरलें तें स्थान । अनावर मन सतीचें तैं ॥५॥वासुदेव म्हणे दांत ओठ खाई । निर्भत्सीं त्याठायीं पित्यालागीं ॥६॥२६अधमा, कां ऐसा निंदिसी शिवातें । भेदभाव ज्यातें लवही नसे ॥१॥त्रैलोक्यवंद्य त्या चरणरजाची । प्रेतवत् देहासी सर न तव ॥२॥चतुर्विध जन असती या जनीं । चिंतिताती मनीं पुण्यवंत ॥३॥सद्गुण परमाणु पर्वतासमान । लेखिती ते जन सर्वश्रेष्ठ ॥४॥त्यागूनियां दोष गुणचि बोलती । सत्पुरुष ऐसी संज्ञा तयां ॥५॥गुणदोष दोन्ही जाणिती विवेकें । सामान्य तयांतें म्हणती ज्ञाते ॥६॥गुणही पराचे दोषचि जो गणी । अधम तो जनीं दुष्ट नीच ॥७॥वासुदेव म्हणे क्रोधाकुल सती । बोलली पित्यासी पुढती ऐका ॥८॥२७प्रेततुल्य देहा मानूनियां आत्मा । निंदी जगदात्मा मूढ तोचि ॥१॥‘शिव’ नामोच्चार करितांचि मुक्ति । लाभे हें जाणती ब्रह्मादिक ॥२॥निर्माल्य जयाचा लाभतां संतोष । पावताती जेथ थोर थोर ॥३॥तया शंकराची न कळे योग्यता । तुजसी हें आतां सिद्ध होई ॥४॥निंदकाचा ऐशा व्हावा जिव्हाच्छेद । नाहींतरी देहत्याग व्हावा ॥५॥अथवा त्यजावें स्थान तें ज्ञात्यानें । निंदा शांतपणें ऐकूं नये ॥६॥वासुदेव म्हणे पित्यासी ते धन्या । वदली वदान्या ऐका काय ॥७॥२८दक्षा, देव स्वर्गी, मानव भूभागीं । तैसीचि कर्माची स्थिती असे ॥१॥प्रवृत्तीनें कोणी, कोणी निवृत्तीनें । जातां न निंदणें योग्य कोणा ॥२॥वेदोक्तचि दोन्ही पंथ ते जाणूनि । स्वीकृत सत्कर्मी दक्ष व्हावें ॥३॥आत्मरुपीं मग्न सर्वदा मत्पति । प्रवृत्ति निवृत्ति तया काय ॥४॥शिवासी निंदिती तयां न सद्गति । गर्विष्ठ ते पापी निंदारत ॥५॥दक्षा, ऐशा तव, कन्या मी हें पाप । दाक्षायणी शब्द निंद्य वाटे ॥६॥मानूनि ते लज्जा त्यजीन हा देह । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥७॥२९निंद्य त्या पित्याचें शरीर तयासी । अर्पावें सतीची हेचि इच्छा ॥१॥अंतीं अवलंब करुनि योगाचा । बैसी पीत वस्त्रा परिधानूनि ॥२॥योगबळें अग्नि करुनियां सिद्ध । जाळी ते देहास योगाग्नीनें ॥३॥शिवरुपीं लीन होऊनियां गेली । शोक तयास्थळीं सुजनां होई ॥४॥निवारिलें नाहीं तियेसी दक्षानें । निंदिती क्रोधानें यास्तव त्या ॥५॥शिवगण तदा धांवले क्रोधानें । वारिलें भृगूनें मंत्रबळें ॥६॥वासुदेव म्हणे यज्ञाहुती देतां । देव शिवदूतां निवारिती ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP