मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय ८ वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय ८ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय ८ वा Translation - भाषांतर ५३मुनि विदुरासी बोलले कुमार । हंस ऋभु नारद आणि यति ॥१॥आजन्म राहिले ब्रह्मचर्यव्रतें । अधर्माचा ऐकें वंश आतां ॥२॥मृषा तत्पत्नीसी दंभ, माया, जाण । पुत्र कन्या दोन अपत्यें हीं ॥३॥विवाह तयांनीं केला अधर्मानें । ‘निऋति’ त्या प्रेमें दत्तक घेई ॥४॥लोभ निकृति त्या जाहलीं भावंडे । परंपरा त्यांतें रुचली बहु ॥५॥क्रोध हिंसा त्यांची जाणावी संतति । कलि तैं दुरुक्ति तयां होती ॥६॥कन्या मृत्यु, पुत्र भय, नामें त्यांसी । यातना नरकांसी प्रवर्तलीं ॥७॥विदुरा, हे सृष्टि चिंतील जो मनीं । प्रवृत्ति अधर्मी न घडे तया ॥८॥५४विष्णुअंश स्वायंभुव त्या मनूचा । ऐकें वंश आतां शुद्धिकर ॥१॥शतरुपा त्याची कांता प्रियव्रत । उत्तानपाद तो द्वितीय पुत्र ॥२॥उत्तानपादासी सुनीति सुरुचि । कांता जगामाजी विख्यात त्या ॥३॥सुरुचि नृपाची आवडती कांता । उत्तम तियेचा पुत्र एक ॥४॥सुनीति विदुरा, कांता नावडती । सुपुत्र तियेसी ध्रुवबाळ ॥५॥वासुदेव म्हणे वृत्तान्त तयाचा । भविकहो, ऐका पुण्यप्रद ॥६॥५५एकदां नृपाळ खेळवी उत्तमा । येऊनियां प्रेमा अंकीं घेई ॥१॥आपणही अंकीं बैसावें ताताच्या । चिंतूनि ध्रुवाचा यत्न तेंवी ॥२॥नृपाळ तयासी न घेईचि अंकीं । इतुक्यांत सुरुचि अवलोकी त्या ॥३॥आधींच लाडकी त्यांत ऐसी कृति । पाहूनि पतीची, वदली क्रोधें ॥४॥बाळा, राजपुत्र परी तूं न माझा । अयोग्य या अंका शोभावया ॥५॥अप्राप्याची इच्छा धरुं नको मनीं । इच्छितां हें वनीं करीं तप ॥६॥घोर तपें ईश होईल प्रसन्न । ममोदरीं जन्म देईल तो ॥७॥तरीच हा अंक लाभेल तुजसी । नृपाळ पुढती न वदे कांहीं ॥८॥वासुदेव म्हणे ऐसा अपमान । असह्यचि जाण ध्रुवाप्रति ॥९॥५६सुस्कारे सोडीत बाळ निघूनियां जाई ॥ माता सुनीति तयाची व्याकुळता पाही ॥१॥घेऊनियां अंकीं तया कुरवाळी माता ॥ जन निवेदिती तिज सकल वृत्तान्ता ॥२॥ऐकूनि मातेचें मन पोळूनियां जाई ॥ स्वभाव स्त्रियांचा नित्य कोमलचि राही ॥३॥मर्मंभेदक जे शब्द बोलली सवत ॥ ऐकतां ते सुनीतीचें करपे काळीज ॥४॥कासावीस होऊनियां रडे ढळढळां वासुदेव म्हणे काय करील अबला ॥५॥५७सोडूनिया श्वास बोले बाळाप्रति । म्हणे जें प्रारब्धीं तेंचि घडे ॥१॥दोष काय त्याचा द्यावा अन्याप्रति । वदली सत्यचि बाळा, माई ॥२॥दासीही मजसी न मानी नृपाळ । ऐसीचा तूं बाळ दुर्दैव हें ॥३॥बाळा, श्रेष्ठपादलाभार्थ जें ‘माई’ । वदे तोचि पाहीं यत्न एक ॥४॥अगाध सामर्थ्य एका ईश्वरासी । भजतां तयासी इच्छापूर्ति ॥५॥वासुदेव म्हणे एक नारायण । संकटांत अन्य मार्ग नसे ॥६॥५८परमेष्ठिपदास्तव । तप करी ब्रह्मदेव ॥१॥सेवा करी भगवंताची । इच्छा पूर्ण तदा त्याची ॥२॥मनु तुझा पितामह । तया पदीं ठेवीं भाव ॥३॥भरला ईश सर्वांठाईं । ऐसी शुद्ध मती ठेवी ॥४॥तेणें यज्ञयाग क्रिया । सफल तयाच्या जाहल्या ॥५॥इहपरलोकीं श्रेष्ठ । पद लाभलें तयास ॥६॥वासुदेव म्हणे माता । ऐसा बोध करी सुता ॥७॥५९प्रपितामह तैं पितामह ज्यासी । भजले तयासी तूंही मज ॥१॥मानसमंदिरीं तयाची स्थापना । करुनियां मना शुद्ध करीं ॥२॥निश्चल अंतरीं ठेवूनियां भाव । चिंत्तीं एकमेव जगदात्मा तो ॥३॥तेणें रात्रंदिन लक्ष्मी जया सेवी । भक्तांच्या पुरवी कामना तो ॥४॥वासुदेव म्हणे मातेचें वचन । ऐकूनियां स्थान त्यागी ध्रुव ॥५॥६०सोडूनि नगर बाळ जाई काननांत ॥ त्रिकालज्ञ नारदांसी कळलें हें वृत्त ॥१॥विस्मय पावूनि चित्तीं येती वनामाजी ॥ पाहूनि बाळासी वाटे कौतुक तयांसी ॥२॥‘अहो क्षात्रतेज’ ऐसे सहज उद्गार ॥ बाळ सानुलें अपमानें सोडी घरदार ॥३॥वासुदेव म्हणे मुनि जाणूनिही हेतु ॥ सत्व पाहती बाळाचें सोडूनियां किंतु ॥४॥६१म्हणती बाळासी अद्यापि तूं सान । हांसून खेळून दिवस कंठीं ॥१॥मान-अपमान सर्व हे कल्पना । संताप कां मना करुनि घेसी ॥२॥यदृच्छेंत सदा मानावा संतोष । ईश्वरीप्रसाद कठिण असे ॥३॥सर्वसंगत्यागी ध्याती तया योगी । जन्मोजन्मीं प्राप्ति न घडे परी ॥४॥त्यजावा यास्तव कठिण हा मार्ग । वार्धक्यचि योग्य भक्ति - ज्ञाना ॥५॥सहजचि यत्न घडे तो त्या काळीं । सदाचारीं व्हावी प्रीति तव ॥६॥उत्तमासी प्रेम समानासी मैत्री । तुच्छता नसावी कवणासीही ॥७॥ऐशा मार्गे जातां टळतील दु:खें । वासुदेव सांगे नारदोक्ति ॥८॥६२ध्रुव म्हणे मुनिश्रेष्ठा । शांति धरावी सर्वदा ॥१॥कथूनि हें उपकार । केले मजवरी थोर ॥२॥परी क्षत्रिय स्वभावें । नम्रता न अंगीं राहे ॥३॥त्यांत आपत्न्य मातेचें । शब्दशल्य हृदयीं टोंचे ॥४॥तेणें न रुचे हा मार्ग । कैसें लाभे अढळपद ॥५॥जगद्धितार्थ भ्रमणा - । करी, घेऊनि ब्रह्मविणा ॥६॥ज्ञानसंपन्न तो मुनि । तोषे बोल ते ऐकूनि ॥७॥वासुदेव म्हणे बोध । करी ध्रुवासी नारद ॥८॥६३बाळा, ध्रुवा तुज कथिला मातेनें । मार्ग तोचि जाणें कल्याणाचा ॥१॥एकाग्रचित्तानें ध्यावें ईश्वरासी । पुरुषार्थप्राप्ति तेणें घडे ॥२॥नित्य वास त्याचा घडे जया स्थानीं । जावें त्या मधुबनीं यमुनातीरीं ॥३॥कथितों त्यापरी वागावें त्या ठायीं । मनोरथ होई पूर्ण तेणें ॥४॥करुनि त्रिकाल स्नान, प्राणायाम । करुनियां, मन आंवरावें ॥५॥वासुदेव म्हणे ध्रुवासी नारद । दाविताती मार्ग ध्यानाचाही ॥६॥६४सुंदर मंगल ईश्वराची मूर्ति । संकल्पाची चित्तीं हास्यमुख ॥१॥नेत्रकमळांची मनोहर शोभा । सरळ नासिका भुंवया धनु ॥२॥निर्मल आकाशासम अंगकांति । आरक्तता ओष्ठीं मनोरम ॥३॥सूर्यासम शोभे मस्तकीं किरीट । कुंडलाचें तेज गालावरी ॥४॥वनमाला वत्सलांछन विराजे । शंख चक्र शोभे गदा पद्म ॥५॥पीतांबरावरी मेखलेची दीप्ति । स्मितहास्य दृष्टि कृपापूर्ण ॥७॥सहस्त्रदल त्या अंबुजासमान । सिंहासनीं ध्यान करणें योग्य ॥८॥वासुदेव म्हणे ध्यानें या वैराग्य । उपजे नारद कथिती ध्रुवा ॥९॥६५‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा । पुढती करावा जप नित्य ॥१॥सप्त अहोरात्र जपतां हा मंत्र । दर्शन प्रत्यक्ष भगवंताचें ॥२॥नित्य जप होतां प्रेमें व्हावी पूजा । काष्ठ तैं मृत्तिका शिला रौप्य ॥३॥सुवर्णादि यथालाभ द्रव्यें मूर्ति । करावी प्रभूची पूजायोग्य ॥४॥योग्यस्थळीं योग्य कालींही उदक । कंदमूलादिक पुष्पें दूर्वां ॥५॥तुलसी पुष्पादि साहित्य घेऊनि । एकाग्र होऊनि पूजा व्हावी ॥६॥वाड्मयादि तप परिमिताहार । चित्तीं निरंतर गुण गावे ॥७॥भक्तिभावें ऐसें करितां अर्चन । होती परिपूर्ण सकळ इच्छा ॥८॥वासुदेव म्हणे निष्काम ही सेवा । घडतां जाणावा मोक्ष हातीं ॥९॥६६नारदोपदेश होतां ध्रुवबाळ । जाई गंगातीर लक्षूनियां ॥१॥पुढती नारद उत्तानपादासी । भेटतां तयासी सन्मानी तो ॥२॥सचिंत तयासी पाहूणि नारद । म्हणती काय सांग न्यून तुज ॥३॥ऐकूनि लज्जित होउनियां नृप । म्हणे स्त्रीलंपट जाहलों मी ॥४॥मूढपणें पांच वर्षांचें कोमल । घातलें बाहेर बाळ माझें ॥५॥पुशिलेंही नाहीं तयाच्या मातेसी । पश्चात्ताप चित्तीं होई आतां ॥६॥वासुदेव म्हणे ध्रुवाचें स्मरण । होऊनियां मन खिन्न त्याचें ॥७॥६७कोठें असेल हो बाळ । काय करीत असेल ॥१॥क्षुधा पीडील तयासी । हांका मारील कोणासी ॥२॥नेत्र निस्तेज होतील । मार्ग कंठितां श्रमेल ॥३॥ऐशा विचारें काहूर । गेलें माजूनियां फार ॥४॥बाळ माझा महाज्ञानी । कर्म आठवे तें मनीं ॥५॥नाहीं बसूं दिलें अंकीं । वदतां दुरुक्तें सुरुची ॥६॥निवारिलें नाहीं तिज । माझा बाळ कोठें अद्य ॥७॥मुनीश्वरा, कुशल त्याचें । कथा विदित जरी साचें ॥८॥पशूंचा विषय । बाळ जाहला कीं काय ॥९॥वासुदेव म्हणे क्षेम । पुशी राव तळमळून ॥१०॥६८न करीं रे दु:ख बोलले नारद । कुशल त्वत्पुत्र ध्रुवबाळ ॥१॥योग्यता तयाची असे फार मोठी । विक्रम नेणसी तयाचा तूं ॥२॥इंद्रादिकांतेहीं अशक्य जें कर्म । करील तो जाणे निश्चयानें ॥३॥कीर्तिध्वज जगीं फडकवील तुझा । येईळ मागुता सत्वरीचिं ॥४॥वासुदेव म्हणे नारदवचनें । त्यागिलें रायानें सकलैश्वर्य ॥५॥६९इकडे तो बाळ येई मधुवनीं । ईश्वराधनीं दंग झाला ॥१॥प्रथमवासीं तो घेई अल्पाहार । लोटतां साचार दिनत्रय ॥२॥द्वितीयमासीं तो गलित पर्णे भक्षी । सहावें दिवशीं पुढती जल ॥३॥नवमदिनीं तो तृतीय मासांत । पुढती करी वर्ज जन्नोदक ॥४॥चतुर्थ मासांत वायूचें भक्षण । एकादश दिन पूर्ण होतां ॥५॥पंचममासीं तो करी घोर तप । भूमीवरी पाद टेंकी एक ॥६॥विषयचिंतन मनाच्या आधीन । निग्रहें तें मन आंवरिलें ॥७॥भगवत्स्वरुपीं जाहला निमग्न । भरलें रोम रोम ईशतेजें ॥८॥वासुदेव म्हणे बाळ तो ईश्वर । जाहला साचार तपोबळें ॥९॥७०विदुरासी वृत्त कथिती मैत्रेय । तपोबळें विश्व चलन पावे ॥१॥विश्वतादात्म्यें तो निरोधितां प्राण । कासावीस प्राण देवांचेही ॥२॥प्रार्थिती ते देवदेवा ईश्वरासी । वांचवा आम्हांसी संकटीं या ॥३॥आजवरी ऐसा नाहीं अनुभव । जाहलें हें काय नकळे आम्हां ॥४॥देवांप्रति तदा कथिती भगवान । ध्यानाचा परिणाम ध्रुवाच्या हा ॥५॥निवृत्त तयासी करितों मी आतां । स्वस्थळीं जा चिंता सोडूनियां ॥६॥वासुदेव म्हणे ऐसें तपोबळ । जगाप्रति बाळ दावीतसे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP