मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय १० वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय १० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय १० वा Translation - भाषांतर ८५प्रजापति शिशुमार कन्या ‘भ्रमि’ । कांता ध्रुवालागीं तेंवी ‘इला’ ॥१॥वायूची ते कन्या ‘उत्कल’ तत्पुत्र । कन्या तिज एक ‘रुपवती’ ॥२॥कल्प, वत्सर ते पुत्र त्या भ्रमीचे । ध्रुवासी अपत्यें ऐशापरी ॥३॥विवाहचि नाहीं केला उत्तमानें । एकदां हौसेनें वनीं गेला ॥४॥मृगयेस्तव तैं यक्षानें वधिला । ऐकूनि मातेला खेद बहु ॥५॥वासुदेव म्हणे केला प्राणत्याग । झालें ईश्वरोक्त वचन सत्य ॥६॥८६ऐकूनि तें वृत्त ध्रुव बहु क्रुद्ध । विजयरथ सज्ज करीतसे ॥१॥हिमाचलीं जाई अलकापुरीतें । भरलें शंखनादें नभ सारे ॥२॥यक्ष गुह्यकांच्या स्त्रिया घाबरल्या । वीरांच्या स्फुरल्या भुजा नादें ॥३॥शिवगणांसवें यक्ष घेती धांव । असामान्य ध्रुव वीर होता ॥४॥प्रतियोद्धयावरी सोडी तीन बाण । लल्लाट भेदून नवल करी ॥५॥प्रशंसूनि तदा खवळले यक्ष । वासुदेव युद्ध घोर म्हणे ॥६॥८७ध्रुवावरी बाणषट्क प्रत्येकाचें । खड्ग परिघ ते प्रास बहु ॥१॥शूल, शक्ति, ऋष्टि, भ्रुशुंडी, कुठार । भडिमार थोर करिती यक्ष ॥२॥हाहा:कार तदा जाहला नभांत । सेनासमुद्रांत बुडला ध्रुव ॥३॥जयजयकार शब्दें यक्ष तैं गर्जले । ध्रुवावरी आलें विघ्न घोर ॥४॥मानवसूर्य हा बुडालारे ऐसी । नभांत सिद्धांची वाणी येई ॥५॥इतुक्यांत मेघ विदारुनि सूर्य । तळपे तैं ध्रुव तळपूं लागे ॥६॥छिन्न भिन्न करी दक्षसेनेप्रति । सर्वत्र दिसती यक्षप्रेतें ॥७॥वासुदेव म्हणे पळाले तैं यक्ष । ध्रुव परी दक्ष, सिद्ध राहे ॥८॥८८जिंकितांचि यक्षांप्रति । ध्रुव चिंतीतसे चित्तीं ॥१॥अवलोकावी अलकापुरी । परी संशय अंतरीं ॥२॥सारथ्यासी म्हणे दुष्ट । वाटे करितील कपट ॥३॥इतुक्यांत सिंधुतीरीं । वायूसमचि अंबरीं ॥४॥गेला भरुनियां नाद । दिशा धूलिकणें धुंद ॥५॥नेत्र कोंदले अभ्रांनीं । चमकूं लागे सौदामिनी ॥६॥रक्त, पूय, मूत्र, विष्ठा - । वर्षावचि रणीं साचा ॥७॥वासुदेव म्हणे ऐसी । माया प्रबल यक्षांची ॥८॥८९धडाधड धडें कोसळूं लागलीं । नवल त्या स्थळीं होई एक ॥१॥प्रचंड पर्वत आविर्भूत झाला । पाषाण त्या स्थळा वर्षू लागे ॥२॥खड्ग मुसळांची होई बह वृष्टि । सर्वत्र ओकती विष व्याळ ॥३॥व्याघ्र सिंहादि ते पशु येती हिंस्त्र । क्षोभला समुद्र बुडावी धरा ॥४॥अनिवार ऐसी असुरांची माया । लवही न ध्रुवा परी भय ॥५॥सिद्ध मुनि तदा प्रार्थिती प्रभूतें । मोद आशीर्वादें ध्रुवाप्रति ॥६॥नाममात्रें ज्याच्या आटे भववारी । संकटीं तो तारी भक्तांप्रति ॥६॥वासुदेव म्हणे ऐकूनि ते शब्द । जाहला सावध राजपुत्र ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP