मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय २७ वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय २७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय २७ वा Translation - भाषांतर १९९पुरंजनी महाधूर्त । जाणूनियां रावचित्त ॥१॥आसक्ति ते ध्यानीं घेई । विलासांत मग्न होई ॥२॥झणीं होऊनि सुस्नात । पुढती येई सालंकृत ॥३॥मग झाली प्रेमभेटी । गुजगोष्टी त्या एकांतीं ॥४॥राव ऐसा विषयांध । नष्ट तयाचा विवेक ॥५॥ऐसीं गेलीं बहु वर्षे । भान तया न काळाचें ॥६॥पुरंजनीतें पुरुषार्थ । वेंची मानूनि आयुष्य ॥७॥क्षीण जाहलें यौवन । परी राही ज्ञानहीन ॥८॥वासुदेव म्हणे काम । ऐसे व्यर्थ नेई जन्म ॥९॥२००एकादशशत तयां होती पुत्र । कन्या दशाधिक पुत्रांहुनि ॥१॥सुशील उदार प्रजा ते सकळ । ‘पौरंजनी’ थोर नाम त्यांचें ॥२॥पंचालाधिपति पुरंजन त्यांचे । विवाह आनंदें करीतसे ॥३॥प्रति पुत्राप्रति होई पुत्रशत । पुरंजनवंश ऐसा वाढे ॥४॥पौत्रही पुढती पाही आनंदानें । होई ममतेनें दास त्यांचा ॥५॥पुढती सकाम आरंभिले यज्ञ । पशूंचें हनन बहुत केलें ॥६॥देवपितरांसी संतुष्ट करुन । जाहले निमग्न संसारांत ॥७॥वासुदेव म्हणे कामुकांचा वैरी । जरा प्राप्त झाली अंतीं तया ॥८॥२०१‘चंडवेग’ नामें गंधर्वाधिपति । तया त्रिशतषष्ठी अनुचर ॥१॥कांताही तयांच्या तितुक्याच होत्या । शुक्ल कृष्ण त्यांचा वर्ण शोभे ॥२॥परिवारासवें गंधर्व यापरी । पुरंजनपुरी लुटिती यत्नें ॥३॥पंचफणी तयां प्रतिकार करी । शतवर्षे गेलीं ऐशापरी ॥४॥महानाग परी थकलाचि अंतीं । संकट नृपासी कळलें नाहीं ॥५॥करभार तेंवी प्रियतमासंग । नृपाळासी गुंग करी बहु ॥६॥वासुदेव म्हणे अन्य एक विघ्न । आलें कळल्याविण नृपाळासी ॥७॥२०२जरा नामें कालकन्या । पावे ‘दुर्भगा’ जे संज्ञा ॥१॥वरालागीं हिंडें वनीं । भेटे मजसी म्हणे मुनि ॥२॥अव्हेरितां मी तिजसी । दु:खे शापी ती मजसी ॥३॥कदाही न मुने, तुज । एकस्थळीं घडो वास ॥४॥शापूनियां ऐशापरी । गेली यवनदरबारीं ॥५॥भय नामें नृपाळासी । विनवी जोडूनि करांसी ॥६॥यवन बोलला तिजसी । गुप्तरुपें सकलां भोगीं ॥७॥सैन्यासवेंचि ‘प्रज्वार’ । बंधु माझा हा चतुर ॥८॥साह्य करील तुजसी । होईं भगिनी तूं माझी ॥९॥वासुदेव म्हणे ऐसा । हेतु साधला जरेचा ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP