मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय ५ वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय ५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय ५ वा Translation - भाषांतर ३०वृत्तान्त हा शिवा कथिला नारदें । क्रोध तैं शिवातें येई बहु ॥१॥उपटूनि एक जटा आदळितां । सहस्त्र भुजांचा प्रगटे वीर ॥२॥प्रचंड शरीर मेघासम कांति । नरकपालाची माळ गळां ॥३॥प्रज्वलित जटा आयुधें बहुत । जोडूनि करांस प्रार्थी शिवा ॥४॥आज्ञापावें काज बोलतां शंकर । तयालागीं कार्य कथिती ऐका ॥५॥वीरभद्रा, सेनानायक होऊनि । दक्षासी वधूनि त्वरित येईं ॥६॥वासुदेव म्हणे ऐकूनि ते आज्ञा । घाली प्रदक्षिणा वीर शिवा ॥७॥३१कालाचाही काळ करुनि गर्जना । जाई दक्षयज्ञा वीरभद्र ॥१॥चालतां तो वीर कांपली धरणी । धांवले गर्जूनि शिवदूतही ॥२॥यज्ञमंडपांत दुश्चिन्हें जाहलीं । वाटे कीं पातली प्रलयवेळ ॥३॥नभ धूलिमग्न स्तब्ध समीरण । मंडपींचे जन चिंतायुक्त ॥४॥प्राचीनबर्हि तो नृपाळ रक्षील । मानिती सकल परी भय ॥५॥दक्षकांता तदा बोलली ‘प्रसूति’ । सख्यांसवें सतीक्रोधचि हा ॥६॥कोपला शंकर निश्चयें करुनि । वासुदेव पाणी जोडी तया ॥७॥३२प्रलयकालींचें नृत्य आठवे तयांसी । मोकळ्या जटा दिग्गज खोंची त्रिशूळासी ॥१॥अट्टाहास्यध्वनि मेघगर्जनेसमान । आरोळ्या फोडीत नाचे शिव भगवान ॥२॥फाटूनियां जाती जेंवी दशदिशा वाटे ॥ सहन न होई तदा तेज तें कोणातें ॥३॥उन्मत्त नृत्य तें जनीं वर्णितांही कोणी ॥ ऐकूनीच जाई भयें काळीज फाटूनी ॥४॥वक्र भुंवया क्रोधानें करितां शंकर ॥ बोबडी वळोनी काळ कांपे थरथर ॥५॥ब्रह्मदेवासही असह्य क्रोध शंकराचा ॥ वासुदेव म्हणे पाड काय त्या दक्षाचा ॥६॥३३स्तविती शंकरा निंदिती दक्षासी । सर्वत्र तों होती बहु उत्पात ॥१॥दुश्चिन्हें पाहूनि दचकला दक्ष । विघ्न तों यज्ञांत प्राप्त झालें ॥२॥मोडिला मंडप विझविला अग्नि । नाश शिवदूतांनीं मांडियेला ॥३॥मूत्रोत्सर्ग कोणी केला होमकुंडीं । जाहला मंडपीं हाहा:कार ॥४॥मुनिपत्न्यातेंही दावूनिया भय । बंधनांत देव टाकियेले ॥५॥वासुदेव म्हणे मुनींचाही छळ । करिती सकल शिवदूत ॥६॥३४मणिमान बांधी भृगुऋषीप्रति । चंडीश पूषासी बद्ध करी ॥१॥नंदिकेश्वरानें पाडिलें भगातें । धरिलें दक्षातें वीरभद्रें ॥२॥ताडूनि पाषाण इतरांसी अन्य । क्रोधें शिवगण दंडिताती ॥३॥शिवालागीं दाढीमिशा दाखवूनि । पूर्वी भृगुमुनि हंसला होता ॥४॥यास्तव तयाची उपटी दाढीमिशी । वीरभद्र ऐशी शिक्षा करी ॥५॥निंदासमयींच्या नेत्रसंकेतानें । काढिले क्रोधानें भृगुनेत्र ॥६॥वासुदेव म्हणे ऐसें क्रूरकर्म । करुनियां यज्ञ विध्वंसिला ॥७॥३५दक्ष शापितां शंकरा । ‘पूषा’ ऋत्विज हांसला ॥१॥त्याचे पाडूनियां दंत । केलें उताणें दक्षास ॥२॥बैसूनियां छातीवरी । खड्गें शरीर विदारी ॥३॥त्याची न तुटेचि त्वचा । बुकली अंतीं जेवी अजा ॥४॥यज्ञपशूसम वध । करुनि छेदियेला कंठ ॥५॥दिधली आहुती अग्नीसी । जाळी मंडप तो अंतीं ॥६॥गेले कैलासी शिवगण ‘ । शांतं पापं’ म्हणती जन ॥७॥वासुदेव म्हणे ऐसा । घोर परिणाम गर्वाचा ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP