मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय १५ वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय १५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय १५ वा Translation - भाषांतर ११४निषाद अयोग्य जाणूनि राज्यासी । पुनर्मंथनासी करिती मुनि ॥१॥बाहूसी मंथितां मिथुन जाहलें । आनंद पावले मुनिश्रेष्ठ ॥२॥पाहूनियां मुनि म्हणती विष्णूचा । अंशचि हा साचा आदिराजा ॥३॥प्रथितयशत्वें ‘पृथु’ नाम यासी । शोभा भूषणांची कांता ‘अर्चि’ ॥४॥वाद्यनाद तदा जाहला गगनीं । येती तयास्थानीं ब्रह्मा, विष्णु ॥५॥म्हणती हा भाग्यवंत होवो राजा । अर्चि तया कांता अनुरुप ॥६॥हस्तावरी त्याच्या शोभे यवचिन्ह । विराजलें पद्म चरणावरी ॥७॥वासुदेव म्हणे आनंदकारक । ऐसा होई पुत्र तपोबळें ॥८॥११५अभिषेकार्थ पुढती । सर्व साहित्य आणिती ॥१॥झाला अभिषेकविधि । भूतें उपायनें देती ॥२॥पृथु अर्चीच्या सान्निध्यें । सालंकृत बहु शोभे ॥३॥सिंहासन त्या कुबेर । वरून अर्पी तया छत्र ॥४॥कांति त्याची चंद्रासम । सलिल स्त्रवे जयांतून ॥५॥वालव्यजनें वायूचीं । कीर्तिमाला धर्म अर्पी ॥६॥इंद्रदत्त तो कीरीट । यम अर्पी दिव्य दंड ॥७॥वेदकवच विरंची । हार अर्पी सरस्वती ॥८॥वासुदेव म्हणे चक्र । प्रेमें अर्पी शार्ड्गधर ॥९॥११६ऐश्वर्य ते लक्ष्मी, दश चंद्रांकित । शिव अर्पी खड्ग अत्यादरें ॥१॥शतचंद्रयुक्त ढाल ते भवानी । बैसवी स्यंदनीं विश्वकर्मा ॥२॥शुभ्र अश्व चंद्र, अग्नी अर्पी चाप । सूर्य किरणरुप बाण अर्पी ॥३॥योगपादुक त्या दिधल्या पृथ्वीनें । दिव्यमाला प्रेमें गगन अर्पी ॥४॥नाट्य, गान, वादित्र ते अंतर्धान - । विद्या, देती जाण विद्याधर ॥५॥कल्याणकारक आशीर्वाद मुन । सागर अर्पूनि धाला शंख ॥६॥सागर, सरिता, पर्वत तयासी । नित्य मार्ग देती आनंदानें ॥७॥उपायनें ऐसीं स्वीकारुनि सर्व । पृथु उपकार मानीतसे ॥८॥वासुदेव म्हणे स्तुति मागधोक्त । ऐकूनि तो श्रेष्ठ राव बोले ॥९॥११७सूत मागधहो, ऐसें । व्यर्थ स्तवन हें माझें ॥१॥प्रगट जाहल्या सद्गुण । योग्य होईल स्तवन ॥२॥नसती जे गुण अंगीं । वर्णितां ते कासयासी ॥३॥सर्व ऐश्वर्यसंपन्न । ईश्वराचे गावे गुण ॥४॥गुणवंत मी पुढती । होईन हें जरी चित्तीं ॥५॥तरी अद्य मी गुणहीन । निंदाचि हें गुणगान ॥६॥स्तुति योग्य ते साधूंसे । कदा नावडे मजसी ॥७॥कांहींचि न घडतां कर्मं । कैसें स्वीकारुं स्तवन ॥८॥वासुदेव म्हणे सभ्य । व्यर्थ स्तवनें न तुष्ट ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP