TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५२८१ ते ५२९०

बोधपर अभंग - ५२८१ ते ५२९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


बोधपर अभंग - ५२८१ ते ५२९०
॥५२८१॥
विंचू हाणी नांगी । दु:ख आणिकांचे अंगीं ॥१॥
काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंके जन ॥२॥
सर्पे जावोनि दंशावें । तेणें प्राणासी मुकावें ॥३॥
तुका ह्मणे ऐशा जाती । नरकीं राहोनी पचती ॥४॥

॥५२८२॥
ज्याचा सखा हरी । त्यावर विश्व कृपा करी ॥१॥
ऐसा असोनी अनुभव । कासाविस होतो जीव ॥२॥
ज्यास हरीचें चिंतन । त्यासीं बांधुं न शके विघ्न ॥३॥
तुका म्हणे हरी । प्रल्हादासी यत्न करी ॥४॥

॥५२८३॥
बहुत प्रकार परी ते गव्हाचे । जिव्हे जिव्हानाचे आवडी ते ॥१॥
सरली ती आवडी दुसरी ही नवी । सिंधु सदा दावी तरंग ते ॥२॥
घेतलें ते घ्यावें आम्ही वेळोवेळां । माय बाप लळा न विसंबे ॥३॥
तुका ह्मणे रस राहीला वचनीं । तो पडताळूनि ठेवितसें ॥४॥

॥५२८४॥
शुद्ध मंगळाचा सांठा । विट तोटा नेणत ॥१॥
हाचि भरंवसा आला । भला भला ह्मणवी ॥२॥
जनीं जनार्दन वसे । तेथें दिसे तें शुद्ध ॥३॥
तुका ह्मणे बहु मुखें । खरें सुखें ठेवावें ॥४॥

॥५२८५॥
जैसा शुद्ध गंगा ओघ । तैसा भाग वागवी ॥१॥
प्रेम वाढे ग्रासोग्रासीं । ब्रह्मरसीं भोजन ॥२॥
तृप्तीवरी आस्था उरे । ऐसे बरे प्रकार ॥३॥
तुका ह्मने पाक मन । नारायण ते भोगी ॥

॥५२८६॥
मुळव्याधी जो पिडीला । त्यासी हांसे तो खर्जुला ॥१॥
ह्मणे राम राम । त्यासी निंदीती अधम ॥२॥
तीर्थी करी सोसी । त्यासी हांसतो आळसी ॥३॥
क्षयरोगी ह्मणे सत्ता । सरे अरोग्यता ॥४॥
डोळां वडस वाढलें । काक कान्हेळा अबोलें ॥५॥
तुका ह्मणे पाया । शुद्ध होय आपणीया ॥६॥

॥५२८७॥
असे कारण तें दृष्टी । शंका पोटी उपजे ॥१॥
शूर शोभे रणांगणीं । मरणींच संतोष ॥२॥
पाहिजे तो कळवळा । मग बाळा उणें त्या ॥३॥
तुका ह्मणे ऐशा लीळा । पाहूं कवतुकें डोळां ॥४॥

॥५२८८॥
सर्व साधियलें कर्म । स्नानसंध्या नित्य नेम ॥१॥
जे जे आश्रमाचे धर्म । नित्यानित्य उपक्रम ॥२॥
क्रिया झाली सांग । दिलें गंगोदक अर्ध्य ॥३॥
तुका ह्मणे नेम । आणावे साठीं श्रम ॥४॥

॥५२८९॥
देखण्याच्या तीन जाती । वेठी वारता अत्यंतीं ॥१॥
जैसा भाव तैसें फळ । खाती तोचि एक जाळ ॥२॥
पाहे सांगे आणि जेवी । शुद्ध बुद्ध लाभ जेंवीं ॥३॥
तुका ह्मणे हिरा । मुखें पारखिया गारा ॥४॥

॥५२९०॥
घेती एकासी थडका । पाडी धका देऊनी ॥१॥
एकमेकां पाठीवरी । स्वयें करी टवाळी ॥२॥
हाता हात हाणी बाही । चुके ठायीं पडतां ॥३॥
तुका लवणीचे पणीं । एका हाणी पोटासी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-04T19:32:08.6570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

forwards

  • आघाडीचे खेळाडू 
RANDOM WORD

Did you know?

पिंड म्हणजे काय? त्याचे प्रकार किती व कोणते?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.