TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५४४१ ते ५४५०

बोधपर अभंग - ५४४१ ते ५४५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


बोधपर अभंग - ५४४१ ते ५४५०
॥५४४१॥
माता अंगिकारी बाळा । पुरवीत त्याचा लळा ॥१॥
तेंचि बळ अरण्यांत । त्यागितांचि होय घात ॥२॥
तयेपरी हरिविण । पापी नुद्धरति दीन ॥३॥
तुका ह्मणे पराधीन । जीव हरीचे स्वाधीन ॥४॥

॥५४४२॥
पराधीनता जाणावी । अहंकृते बुडवावी ॥१॥
जेथें सर्व सत्ता वसे । प्रीति धरितां मी वसे ॥२॥
दोहीं हातीं टाळी वाजे । एके हातें काय साजे ॥३॥
देवभक्त दोहींकडे । परस्परें प्रीति जोडे ॥४॥
तुका ह्मणे जैसा भाव । तैसा आहे रमाधव ॥५॥

॥५४४३॥
आत्मसुख सर्वा सम । परी प्राक्तन विषम ॥१॥
ज्ञानस्वरुप होउनी । भोगिताती ते उन्मनी ॥२॥
मीतूंपण विसरलें । निज तत्वीं सुखीं झाले ॥३॥
शेष उरलें प्रारब्ध । सारिताती निज बोधें ॥४॥
तुका ह्मणे परंपरा । राम करिती सोयरा ॥५॥

॥५४४४॥
सखा सोयरा श्रीराम । जया हाचि धर्म नेम ॥१॥
जनीं वनीं राम डोळां । त्याचे बैसला सांवळा ॥२॥
ऐसें अविनाश रुप । हाचि विठ्ठल चिद्रूप ॥३॥
तुका ह्मणे डोळेभरी । भक्त पाहती श्रीहरी ॥४॥

॥५४४५॥
त्राता मेघ चातकाचा । तेवि विठ्ठल दासांचा ॥१॥
घडी पळ सांभाळित । प्रेमळासी दयावंत ॥२॥
आदि अंतीं पायांपाशीं । ठेवी माउली कां जैशी ॥३॥
तुका ह्मणे भाव पोटीं । तयापाशीं जगजेठी ॥४॥

॥५४४६॥
जगद्गुरु जगत्पते । दयावंत रघुपते ॥१॥
मज दाखवी चरण । आघात हे चुकवून ॥२॥
फांसा काढी वासनेचा । दास करीं काया वाचा ॥३॥
तुका ह्मणे दीनबंधु । मज तारी कृपासिंधु ॥४॥

॥५४४७॥
भ्रमताती सर्व भूतें । आपुलालिये संचितें ॥१॥
क्रियमाण पूर्व फळ । भोग भोगिती बहळ ॥२॥
जो कां योगभ्रष्ट होय । तोचि धरी हरीपाय ॥३॥
जागा होउनी सुटला । जन्ममरणा मुकला ॥४॥
तुका ह्मणे ठेवा जैसा । उपेगासी येतो तैसा ॥५॥

॥५४४८॥
जन्मवरी याती केली । हरिभक्ति आराधिली ॥१॥
झाली अप्रीत सकळ । हारपली तळमळ ॥२॥
विष्टामूत्र त्याग केला । आत्मरुपीं सुखी झाला ॥३॥
तुका ह्मणे पुण्यवंत । ध्यानें पावला अनंत ॥४॥

॥५४४९॥
अष्ट धातु वेगळाली । आठवीतां वायां गेली ॥१॥
सोनें सोनियांत मिळे । दुजें घालितां वितुळे ॥२॥
संत आणि तो अधम । कल्पकोटी नोहे सम ॥३॥
शुभ्र हिरा आणि गार । मोल भेद अनिवार ॥४॥
तुका म्हणे पूर्ण योगी । तोचि मिळे पांडुरंगीं ॥५॥

॥५४५०॥
हरीध्यान कर्म तोडी । अमृतानें पडे बेडी ॥१॥
पुण्याक्षीण होतां आले । मृत्युलोकीं ते जन्मले ॥२॥
पुनरपि जन्ममृत्य । भोग भोगिती अमित ॥३॥
तुका ह्मणे नारायण । नामें तुटतें बंधन ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-04T19:47:51.5930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चुकल्‍याचें मन दाही दिशा

 • चुकलेल्‍या माणसाला काय करावे ते सुचत नाही 
 • त्‍याला अनेक गोष्‍टी कराव्याशा वाटतात पण त्‍यांतील नक्‍की कोणती करावी हे समजत नाही. 
RANDOM WORD

Did you know?

मी ह्या साईट साठी काही करू शकते काय
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.