TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४९०१ ते ४९१०

बोधपर अभंग - ४९०१ ते ४९१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


बोधपर अभंग - ४९०१ ते ४९१०
॥४९०१॥
लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अग्नि टनत्कारी दिसों येतो ॥१॥
सांगावें तें कायी सांगावें तें कायी । चित्ता होय ठायीं अनुभव तो ॥२॥
अन्ने सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करुनि उपाव घेऊं हेवा ॥३॥
तुका ह्मणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥४॥

॥४९०२॥
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥
समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥२॥
काकुळतीसाठीं सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥३॥
तुका ह्मणे यश कीर्ति आणि मान । करितां जतन देव जोडे ॥४॥

॥४९०३॥
आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौनचि ॥१॥
नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणीसांगातें ॥२॥
वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥३॥
तुका ह्मणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥४॥

॥४९०४॥
कोणाशीं विचार करावा सेवटीं । एवढया लाभें तुटी झाल्या तरे ॥१॥
सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥२॥
घात तो या नांवें येथें अंतराय । अंतरल्या पाय गोवींदाचे ॥३॥
तुका ह्मणे गड संदिचा हा ठाय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥४॥

॥४९०५॥
दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा ॥१॥
नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥२॥
पापपुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥३॥
तुका ह्मणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥४॥

॥४९०६॥
सुखरुप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥
बाळगोपाळांची वाट । सेव्यसेवकता नीट ॥२॥
जरी झाला भ्रम । तरी पडों नये भ्रम ॥३॥
तुका म्हणे दासां । वेव सरिसासरिसा ॥४॥

॥४९०७॥
परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता ॥
आणि कमी तो तत्वतां । बांधला न वजाय ॥१॥
ऐसा अनुभव रोकडा । विश्वासी तो जीवा जोडा ॥
एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥२॥
सकट आंबलें तें अन्न । शोधी तेंचि मद्यपान ॥
विषमानें भिन्न । केलें शुद्धाशुद्ध ॥३॥
तुका ह्मणे नीत । बरवें अनुभवें उचित ॥
तरी काय हित मोलें घ्यावें लागतें ॥४॥

॥४९०८॥
भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती ॥
करवी फजीती । हांवे भार वाढला ॥१॥
कुळिकेसी लांस फांस । डोई दाढी बोडवी दोष ॥
अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥२॥
विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें ॥
न बाटें जो चित्तें । अधर्माच्या तो त्यागी ॥३॥
आज्ञापालणें ते सेवा । भय धरोनियां जीवा ॥
तुका ह्मणे ठेवा । ठेविला तो जतन ॥४॥

॥४९०९॥
उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥१॥
पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ॥२॥
दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥३॥
आळसाची धाडी । तुका म्हणे बहु नाडी ॥४॥

॥४९१०॥
शक्ती द्याव्या देवा । नाहीं पार्थिवाची सेवा ॥१॥
मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥२॥
मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥३॥
तुका ह्मणे सोसें । लागे लाविल्याचें पिसें ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-02T20:05:38.4370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ascaris lumbricoides suum

 • सूकर त्रि-ओष्ठ कृमि 
RANDOM WORD

Did you know?

भारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.