मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| जनांस उपदेश ६ ते १० उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - जनांस उपदेश ६ ते १० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल जनांस उपदेश ६ ते १० Translation - भाषांतर ६.चांदणें नावडे चोरा । सद्बुद्धि नावडे रांडेच्या पोरा । वृक्ष नावडे कुंजरा । सत्य कुचरा नावडे ॥१॥चंदन जाणावा सुगं-धाची धृति । कर्पूर जाणावा उत्तम याति । हंस जाणावा चालतिये गति । कोकिळ श्रुति ओळखावी ॥२॥लांव जाणावी उफराटिये दृष्टी । क्रोधी जाणावा भोंवयांसीं गांठी । लटिक्या जाणा बहुता गोष्टी । नष्ट कुचेष्ठी ओळखावा ॥३॥नारी जाणावी भ्रतारभक्ति । आचारें जाणावी महा सति । धनुर्धर जाणावा संधान युक्ति । संत तापसीं ओळखावा ॥४॥जयीं घातलिया निघे खरा । ज्ञान जाणे तोचि च-तुरा । शिंदळी जाणावी नीच उत्तरा । कुसळी घरोघरा फिरतसे ॥५॥इतुकिया बोलाची न मानावी खंति । विठ्ठलचरणीं ठेवूनियां मति । प्रसन्न होईल लक्ष्मीपति । ह्मणे विष्णुदास नामा ॥६॥७.देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित ॥१॥मी माझें म्हणतां गेले नेणों किती । रंक चक्रवर्ति असंख्यात ॥२॥क्षणक्षणा देह आयुष्य पैं काटे । वासना ते वाढे नित्य नवी ॥३॥मोहाचीं सोयरीं मिळालीं चोरटीं । खाऊनि शेवटीं घर घेती ॥४॥जोंवरी संपत्ति तंववरी हे सखें । गेलीया तें भुंके सुणें जैसें ॥५॥नामा म्हणे केशवा मी तों तुझा दास । मज आहे विश्वास तुझ्या नामीं ॥६॥८.भुलले हे लोक काळाचें कौतुक । सुरशक्रादिक पाह-ताती ॥१॥देवा तुझी माया अगम्य अगाध । प्रपंचाचा वेध सुटों नेदी ॥२॥माझें घरदार माझा संसार । मी मोठा चतुर ह्मणोनियां ॥३॥आपणा देखतां जाती तें पाहती । मीपणाची भ्रांति सुटों नेणे ॥४॥नामा ह्मणे आतां काय म्यां बोलावें । भोंवत असावें चौर्यांशीला ॥५॥९.विषय सेवितां तुज । नव्हे पुढील काज । कदा न भेटे तुज । गरुडध्वज निश्चयेंसी ॥१॥काय करिसी खटपत । वांयां मार्ग दुर्घट । वरपडा होसील कष्ट । परि संसार न सुटेचि ॥२॥सुट-केचें मूळ जाण । रामकृष्ण नारायण । येणें तुटेल भवबंधन । जन्मा न येसी सर्वथा ॥३॥साधन इतुकेंचि पुरे । न लगती मंत्रांचे भार । ते बुडविती साचार । परि तरों न देती ॥४॥नामा म्हणे ते पामर । नेणतीच हा मार्ग सार । परि वाचे नाहीं उच्चार । तो जाणावा महादोषी ॥५॥१०.मायेचा हा फांसा अहंकार वळसा । परि ह्लषिकेशा भजतीना ॥१॥नव्हे हे सुटिका हा बोल लटिका । केशवासी एका न भजकारें ॥२॥होतील त्यां मुक्ती पुरतील त्यां आर्ती । चरण हे चिंतीं विठ्ठलाचे ॥३॥नामा ह्मणे केशव सर्वांभूतीं देव । ऐसा धरीं भाव भजनशीळ ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP