मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| जनांस उपदेश ११ ते १३ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - जनांस उपदेश ११ ते १३ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल जनांस उपदेश ११ ते १३ Translation - भाषांतर ११.कांरे तूं शिणतोसि घरदार बंधनें । वांयांचि व्यसनें आणितोसी ॥१॥भजें यादवराया लागें त्याच्या पायां । आणिक उपायां करूं नको ॥२॥सर्वभावें हरिभजन तूं करी । भक्ति दे पुढारी तारीक सत्य ॥३॥नामा ह्मणे दया मांडी सोडीं माया । भजन लवलाह्या हरीचें करीं ॥४॥१२.वासनेचा त्याग करारे सर्वथा । या भावें अनंता शरण जावें ॥१॥कृपेचा सागर नुपेक्षी निर्वाणीं । कलिकाळाहूनि सोडविलें ॥२॥भक्ताचा पाळक अनाथाचा कैवारी । ब्रिदें चराचरीं वर्णि-ताती ॥३॥शरीरसंपत्तीचा सोडा अभिमान । मन करा लीन कृष्ण-रूपीं ॥४॥आसनीं शयनीं चिंतितां गोविंदु । तेणें तुटे कंदु भव-व्याधि ॥५॥परदारा परदासांचे पीडन । सांडूनि भजन करा त्याचें ॥६॥करा सर्वभावें संतांची संगति । नाहीं अर्थाअर्थीं जन्मा येणें ॥७॥शुकसनकादिक प्रल्हाद जनक । परीक्षिती मुख्य बिभिषण ॥८॥भीष्म रुक्मांगद नारद उद्धव । शिबि कवि देव इत्यादिक ॥९॥शास्त्रांचें हें सार वेदां गव्हार । नाम परिकर कलियुगीं ॥१०॥नामा म्हणे नको साधन आणिक । दिल्ही मज भाक पुंडलिकें ॥११॥१३.पहा परदारा जननिये समान । परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी ॥१॥निदेसी तूं मुका होऊनि तत्त्वतां । परद्वेषीं निरुतां न घालीं दृष्टि ॥२॥ऐसें दृढ मनीं धरूनि राहसी । तरी माझें पावसी निजपद ॥३॥पराकारणें प्राण वेंचि जो सर्वथा । जाणे परव्यथा कळवळोनि ॥४॥परसुख संतोष धरी जो मानसीं । जरी परलो-कासी जाणें आहे ॥५॥देहाचा अभिमान न धरावा चित्तीं । धरावी उपरति उपशमु ॥६॥सर्वकाल प्रीति संतांचि संगति । गावीं अनु-रागें प्रीति नामें माझीं ॥७॥सर्वांभूतीं सर्वदा ऐसी समबुद्धि । सांडावी उपाधि प्रपंचाची ॥८॥सर्वकाळ परमात्मा आहे सर्वदेशीं । हे भावना अहर्निशीं दृढ धरीं ॥९॥संतसमुदाय मिळती जेथें जेथें । जावें तेथें तेथें लोटांगणीं ॥१०॥चिंता न करीं नाम्या येणें तरसी जाण । तुज सांगितली खूण निर्वाणींची ॥११॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP