मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ Translation - भाषांतर १.दुर्जनाची बुद्धि वोखटी दारुण । आपण मरून दुजा मारी ॥१॥माशी जातां पोटीं मेली तेचि क्षणीं । प्राण्या वोकवूनि कष्टी करी ॥२॥दीपकाची ज्योति पतंग नासला । अंधार पडिला जनामध्यें ॥३॥तैसा नैसर्गिक स्वभाव दुष्टांचा । शेखीं ज्याचा त्यासी फळां येतो ॥४॥झाली सज्जनाची संगति कदापि । जाईना तथापि त्याची क्रिया ॥५॥सहज मळलें धुतां शुद्ध होय । बिब-याचा काय डाग जातो ॥६॥वज्रहि फुटेल नभहि तुटेल । भला तो होईल ऐसा जाणा ॥७॥नामा म्हणे कुंभपाकींचा तो धनी । त-यासी भल्यांनीं बोलूं नये ॥८॥२.दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा । संग न करावा पापि-याचा ॥१॥सर्पाचें पिलें सानें ह्मणऊनि पोशिलें । त्यासी पान दिधलें अमृताचें ॥२॥नव्हे तें निर्विष न संडी स्वभावगुण । घेऊं पाहे प्राण पोसित्याचे ॥३॥विष्णुदास नामा सांगतसे युक्ति । विवेक हा चित्तीं दृढ धरा ॥४॥३.समर्थासी करीं क्रोध हे अहंता । अखंड ममता मानी सदा ॥१॥आपुली आपण व्यर्थ सांगे स्तुति । वडिलांची कीर्ति भोग सांगे ॥२॥वमन झालीया सांचितसे अन्न । काय तो दुर्जन भाग्यहीन ॥३॥नामा ह्मणे जाण असतां शरीरीं । जातो यमपुरीं भोगावया ॥४॥४.कोळशासी दूध मर्दोनियां धूतां । न पावे शुद्धता कांहीं केल्या ॥१॥दुर्जनासी तैसा बोध परमार्थ । नवजायचि स्वार्थ कांहीं केल्या ॥२॥सूकराचे परी नेणती मिष्टान्न । विष्टा ते भक्षण करीतती ॥३॥मोहियले प्राणी पाहतां पाहतां । काय सांगूं आतां नवलावो ॥४॥नामा ह्मणे तया न होयचि मोक्ष । येवोनि पद्माक्ष केविं भेटे ॥५॥५.वेडिया उपचार गाढवा गुर्हाळ । ह्मैसिया बिर्हाड पुष्पवनीं ॥१॥पद्मासनीं केंवि कुंजर हा बैसे । कोडिया न दिसे चंदन बरवा ॥२॥तैसा नव्हे देव मूर्ख जनांच्या भक्ति । भल्याचा विरक्ति ज्ञानवांटा ॥३॥शेळीस ऊंस कळकटीया सुदिवस । सूकराप्रित रस आंबियाचा ॥४॥दर्दुरा क्षीरपान त्रिदोषिया मौन । मद्यपिया मन स्थिर नव्हे ॥५॥नामा ह्मणे हरि सबाह्य भरला । भरोनि उरला दाही दिशा ॥६॥६.थिल्लर तें नेणे सागराचा अंत । मुंगीस अग्नींत रीघ नाहीं ॥१॥श्वान काय जाणे मेरूचें प्रमाण । कोसळल्या गगन न कळे त्यास ॥२॥अंध काय जाणे कैसा उगवे दीन । पाषाणा पर्जन्य नकळे जेंवी ॥३॥देहवंत जीव काय जाणे देव । नामा ह्मणे भाव काय तेथें ॥४॥७.जाळें टाकिलें सागरीं । उदक नयेची चुळभरी ॥१॥तैसें पापियाचें मन । ज्या नावडे हरिकीर्तन ॥२॥सावजीं केला कोल्हा राव । तो न संडी आपुला भाव ॥३॥गाढव गंगेसि न्हा- णीले । पुढती लोळूं ते लागले ॥४॥श्र्वान बैसविलें पालखीं । वरती मान करूनि भुंकी ॥५॥नगर नावडे विखारा । दर्पण नावडे नकठ्या नरा ॥६॥पति नावडे शिंदळी । जाय परपुरुषाजवळी ॥७॥नामा ह्मणे बा श्रीहरि । कोडय नावडे कस्तुरी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP