मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| जनांस उपदेश २१ ते २५ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - जनांस उपदेश २१ ते २५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल जनांस उपदेश २१ ते २५ Translation - भाषांतर २१.अवचट देह लाधला प्राणिया । भक्तिवीण वांयां गेला जाण ॥१॥धिक् त्याचें जिणें जन्मला कासया । जरी पंढरिराया विसरला ॥२॥रामनामीं रत नव्हेचि बापुडें । जननिये सांकडें घातलें तेणें ॥३॥ऐसा जन्म नको नको गा श्रीरामा । ह्मने तुझा नामा विष्णुदास ॥४॥२२.जड हेंचि खळे आयुष्याची रासी । काळ माप रसी मवीतसे ॥१॥माप तें लागलें माप तें लागलें । मात तें लागलें झडा झडा ॥२॥मनोमय साक्ष माणिकाप्रमाणें । तूंचि नारायण काळ खंडी ॥३॥नामा ह्मणे जावें शरण केशवा । सळेचा जो ठेवा न पवसी ॥४॥२३.अतिथी आलिया द्यावें अन्नदान । अर्पीं जीव प्राण परमार्थीं ॥१॥तोचि एक नर श्रीहरिसमान । करी दुजा कोण नाहीं ऐसा ॥२॥दीनासी समान करितां आदर । त्याच्या उपकारा पार नाहीं ॥३॥नामा ह्मणे असे खूण हे भाविकां । सर्वामभूतीं देखा पाहे ऐक्य ॥४॥२४.भूमिदानें होसी भूमिपाळु । कनकदानें कांति निर्मळु । चंदनदानेम सदा शीतळु । जन्मोजन्मीं प्राणिया ॥१॥अन्नदाने दृढा-युषी । उदकदानें सदासुखीं । मंदिरदानें भुवनपालखी । सुपरिमळू उपचारां ॥२॥वस्त्रदानें सुंदरपण । तांबूलदानें मनुष्यपण । गोपी-चंदनें ब्राह्मणपण । अतिलावण्य सुंदरता ॥३॥जे वृक्ष लविती सर्वकाळ । तयावरी छत्रांचें झल्लळ । जे ईश्वरीं अर्पिती फळ । नाना-विध निर्मळ ॥४॥ऐशा दानाचिया पंक्ति । वेगळाल्या सांगों किती । एका ध्यारे लक्ष्मीपति । विष्णुदास ह्मणे नामा ॥५॥२५.एकी एकादशी करितां काय वेंचे । उपवासी राहतां काय वेंचे ॥१॥एक तुळसीदळ वाहतां काय वेंचे । पाउलीं वंदितां काय वेंचे ॥२॥तुज जागरणा जाणां काय वेंचे । हरिहरि ह्मणती काय वेंचे ॥३॥संतसमागमा जातां काय वेचें । चरणरज वंदितां काय वेंचे ॥४॥एक दंडवत करितां काय वेंचे । अपराधी ह्मण-वितां काय वेंचे ॥५॥एक प्रदक्षिणा करितां काय वेंचे । तीर्थया- येसी जातां काय वेंचे ॥६॥ऐसी निमाली भक्ति कां न करिसी निर्दैवा । नामा ह्मणे केशवा अनुसर पां ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP