मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल भक्तिस्तोम माजविणार्या वेषधार्यांस उपदेश Translation - भाषांतर ५१.जो कां करी संतनिंदा । त्यासि दंडावें गोविंदा ॥१॥करी संतासीम पाखंड । त्याचें करावें त्रिखंड ॥२॥निंदक दंडावे दंडावे । नेऊनि अंधारीं कोंडावे ॥३॥नामा म्हणे सांगेन एक । निंदक श्वानाचे ते लोक ॥४॥५२.संत ते कवन असंत ते कोण । सांगावी हे खूण दोही माजी । देवा तुजकारणें ऐसें झालें ॥१॥पैल संत म्हणोनि जवळी गेलें । तेणें अमृत म्हणोनि विष पाजिलें । जीवासि घेतलें जालें तैसें ॥२॥संसारेम गांजिलें गुरु गिरवसितीं । भगवे देखोनि तारावें ह्मणती । तंव ते नेणोनि उपदेशाची रीति । कुकर्मी घालिती तैसेम झालें ॥३॥कोणी एक प्राणी सागरा पातले । पैल तारूं म्हणोनि जवळी गेले । तंव तारूं नव्हेती तेथिंचे हेर । बुडविती शरीर तैसें झालें ॥४॥कोणी प्राणी हिंवें पीडिलें । पैम झाडी म्हणोनि जवळी गेलें । तंव अस्वल खिंखाळत उठिलें । नाक कान तोडिलेम तैसें झालें ॥५॥कोणी एक अंधारी पडिला प्राणी । जवळी गेला पैल दीप म्हणोनि । दीप नव्हे सर्प माथींचा मणि । डंखिला प्राणि तैसें झालें ॥६॥केशव म्हणे नामयातें । जे सर्वांभूर्ती भजती मातें । ऐसें हें वर्म सांगतसे तूतें । ऐसिया संतांतें म्हणिजे संत ॥७॥५३.हरिभक्तीचा उभारिला ध्वज । परमार्थाचें बीज न क-ळेची ॥१॥काय करूं देवा जळो त्याची बुद्धी । जया नाहीं शुद्धि परलोकींची ॥२॥मुद्रा धारण अंगीं तुळशीच्या माळा । परि नाहीं कळवळा खहिताचा ॥३॥बहुरुपी वेष मिरविताती देहीं । पर-मार्थाची नाहीं आठवण ॥४॥उपजीविकेलागीं घालिती पसारा । ज्ञान ते चौबारा विकीतसे ॥५॥राजमान्य व्यापारी मोठे अधि-कारी । पुढें दावी कुसरी संगीताची ॥६॥घातमात करी नटे ना-नापरी । चंचळ परनारी भुलवी तो ॥७॥आपुलें लाघव दाऊनि वाडें कोडें । दुसर्याची पुढें होऊं नेदी ॥८॥लटकें पैशून्य बोले दोष गुण । तेणें भयें कोण राहों शके ॥९॥ऐसें नाम विटंबूनि करी हरीकथा । तेणें परमार्था विघ्न झालें ॥१०॥सुगंध चंदन जवादि कस्तुरी । विष्टेचेचि थडी पडिली जैसी ॥११॥नामा ह्मणे माझी हरिकथा माउली । विश्रांति साउली शिणलियाची ॥१२॥५४.काय चाड आह्मां बाहेरल्या वेषें । सुखाचें कारण असे अंतरीं तें ॥१॥भीतरी पालट जंव नाहीं झाला । तोंवरी न बोल जाणपणें ॥२॥चंदनाचे संगतीं नीच महत्त्वा पावलीं । नांवें परि उरलीं पालट देहीं ॥३॥नामा ह्मणे ऐसें सांगा मज कोणी । जेणें केशव येऊनि ह्लदयीं राहे ॥४॥५५.अद्वैत सुख कैसेनि आतुडे । जंववरी नसंडे मीतूं-पण ॥१॥शब्द चित्र कथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं के-वळ विठ्ठलदेवीं ॥२॥अणुचें प्रमाण असतां दुजेपण । मेरुतें समान देईल दु:ख ॥३॥नामा ह्मणे सर्व आत्मरूप पाहीं । तरीच ठायींच्या ठायीं निवशील ॥४॥५६.एकचि हें तत्व एकाकार देशीं । एक तो ने-मेसी सर्व जनीं ॥१॥ऐसें ब्रह्म पाहा आहे सर्व एक । न-लगे तो विवेक करणें कांहीं ॥२॥मिथ्या हें डंबर माया मथितार्थ । हरि हाचि स्वार्थ वेगीं करीं ॥३॥नामा ह्मने समर्थ बोलिला तो वेद । नाहीं भेदाभेद ब्रह्मपणीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP