बेदपाठ
प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.
१
वेदविधि कांहीं न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥ दशग्रंर्थी ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ॥२॥ सर्व ब्रह्मरूप ऐसे बोले वेद । तेथें वादावाद उरला नाहीं ॥३॥ ओऽहं सोऽहं कोऽहं नाही ठाव । उगेचि गौरव मिरवी ज्ञान ॥४॥ एका जनार्दनीं ब्रह्मज्ञानासाठी । हिंडताती कोटि जन्म घेत ॥५॥
२
वेद वोलिला जो जो गुण । तो तो नव्हेचि पठण ॥१॥ वेदें सांगितले न करी । ब्रह्मद्वेषो दुराचारी ॥२॥ न करा सुरापान । कन्या-गो-विक्रय जाण ॥३॥ ऐसी वेदाची मर्यादा । न कळेचि मतिमंदा ॥४॥ निजमुखें स्वयें बोले वेदु । न करावा परापवादु ॥५॥ एका जनार्दनीं शरण ।वेदाचें नोहे आचरण ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : August 31, 2025

TOP