मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
उपदेश कलिप्रभाव

उपदेश कलिप्रभाव

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.


येऊनि नरदेही वायां जाय । नेणें संतसंग कांही उपाय ॥१॥ कली वाढलासे अधमब्राह्मण सांडिती आपुलें कर्म ॥२॥ शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥ देवपूजा नेणे कर्म । न घडे मानसंध्या धर्म ॥४॥ ऐसा कलीचा महिमा । कोणी न करी कर्माकर्म ॥५॥ एका जनार्दनी शरण । घडो संतसेवा जाण ॥६॥
भावार्थ

मंत्रतंत्रांची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ॥१॥ ऐसा कलीमाजी अधर्म ।करिताती नानाकर्मे ॥२॥ वेदशास्त्री नाहीं चाड । वायां करिती बडबड ॥३॥ एका जनार्दनीं धर्म । अवघा कलीमाजी अधर्म ॥४॥

कलीमाजी नोहे अनुष्ठान । कलीमाजी नोहे हवन । कलीमाजी नोहे पठण । नोहे साधन मंत्राचे ॥१॥ नोहे योगयागविधी । नसती अंगी ये उपाधी । वाढतसे भेदबुद्धी । नोहे सिद्धी कोणती ॥२॥ न चले कर्माचे आचरण । विधिनिषेदाचें महिमान । लोपली तीथे जाण । देवप्रतिमा पाषाण ॥३॥ नठाके कोणाचा कोठे भाव अवघा लटिका वेवसाव । एका जनार्दनीं भेव । जेथें तेथें वसतसे ॥४॥

कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हे गूढ वायां शास्त्र ॥१॥ आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी पीक न होय ॥२॥ अनावृष्टि मेघ न पडे निर्धार । ऐसा अनाचार कलीमाजी ॥३॥ एका जनार्दनीं नीचाचा स्वभाव । न कळे तया भाव कोण कैसा ॥४॥

पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥ शा स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥ नीचाचे सेवक करती घरोघरीं । श्वानाचिये परी पोट भरती ॥३॥ एका जनार्दनीं आपुला स्वधर्म । सानियां वर्म होती मूढ ॥४॥ब

या पोटाकारणें न करावें तें करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥ नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्मज्ञान त्यांचे मखें ॥२॥ श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती । कांहीं न ते भीती पुण्यपापा ॥३॥ एका जनार्दनी सांडोनि आचार । करिती पामर नानामतें ॥४॥

कलियुगामाजी थोर जाले पाषांड । पोटासाठी संत जाले उदंड ॥१॥ नाहीं विश्वास संतदया मानसीं । बोलती वायांविण सौरस अवघा उपहासी ॥२॥ वेद पठण शास्त्रे संभाषे पुराणमत । अवघे बोधोनि ठेविती बोलती वाचाळ मत्त ॥३॥ देव भजन संतपूजन तीर्थ महिमान न कळे मूढा । ऐसें कलियुगी जाले जाणत जाणत दगडा ॥४॥ एका जनार्दनीं काया वाचा राम जपा । सो हे साधन तेणे नाहे पुण्यपापा ॥५॥

अल्प ते आयुष्य धन कलीं । मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥ जनमय प्राण न घडे साधन । नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥ असत्याचे गृह भरले भांडार । अवघा अनाचार शुद्धबद्ध ॥३॥ एका जनार्दनी म्हणोनि येते कींव । बुडताती सर्व महाडोहीं ॥४॥

कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥ कलियुगा- माजी अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥ शा नानापरीची मते नसती दाविती । नानामंत्र जपती अविधीनें ॥३॥ एका जनार्दनीं पातकाची राशी । नाम अहर्निशीं न जपती ॥४॥
१०
वंदूं अभाविक जन । ऐकावें साधन पावन । कलियुगीं अज्ञान । अभाविक पैंहोती ॥१॥ न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र । जान ध्यान गायत्री मंत्र । जप तप राहिलें ॥२॥ शा यज्ञ यागादिक दान । कोणां न कळे महिमान । अवघे जाहल अज्ञान । न कळे कांहीं ॥३॥ लोपले मंत्र औषध । गाईस न निघे दुग्ध । पतिव्रता ज्या शुद्ध । व्यभिचार करिती ॥४॥ ऐसियाने करावें काय । तिहीं ध्यावें विट्ठल पाय । एका जनार्दनीं ध्याय । विठ्ठल नाम आवडी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP