मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|

साहित्यांतील पारिभाषिक शब्द

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


पंचामृत - दूध, दहि, तूप, मध व साखर.
पंचगव्य - गोमूत्र, गोमय, दूध, दहि आणि तूप
पंचखाद्य - खोबरे, खारीक, डाळ, पोहे व लाह्या.
पंचत्वक् - वड, पिंपळ, जांबूळ, आंबा, व पाहीर यांच्या सालीं.
पंचपल्लव - पिंपळ, उंबर, पाहीर, वड, आंबा यांचे टाहाळे.
पंचरत्न - सुवर्ण, रौप्य, मोती, पोवळे, राजावर्त ( हिरा ).
पंचरंग - ( रांगोळी ) - पांढरी, तांबडी, पिंवळी, हिरवी आणि काळी.
सप्तमृत्तिका - गजस्थान, अश्वशाला, चवाठा संगम, वारुळ, डोह व गोठाण यांतील माती
सप्तधान्यें - सातू, गहूं, तीळ, कांग, सावे, चणे आणि साळी.
सर्वौषधि - कोष्ठ, जटामासी, दारुहळद, मोरमासी, शैलेय ( शिलाकुसुम ) चंदन, वेखंड, नागरमोथा, कचोरा व चाफ़्याची साल मिळून दहा.
सौभाग्यवायन - खण, फ़णी, करंडा, मणीमंगळसूत्र, गळेसर, तांदूळ आणि नारळ असे सुपलीत घालून द्यावयाचे.
नवग्रह - रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतू.
समिधा - रुई, पळस, खंर, आघाडा, पिंपळ, उंबर, शमी, दूर्वा, दर्भ.

प्रयोगांत येणार्‍या कुंड, स्थंडिल, वेदी, यज्ञपात्रें, ग्रहमंडल वगैरे संबंधीं माहिती योग्य ठिकाणीं दिलेली असून त्यांच्या आकृतीही दिल्या आहेत. तसेंच याज्ञिकसाहित्यांत “ पुण्याहवाचन साहित्य, ” “ होमसाहित्य व पूजासाहित्य ” असें जेथें म्हटलें आहे, त्याठिकानीं त्या सदराखालचे सर्व साहित्य घ्यावें. सुपार्‍या, विड्याची पाने, नारळ खोबर्‍याच्या वाट्या यांची बेरीज प्रत्येक ठिकाणीं दिली आहे. सर्व साहित्य यथालाभें यथावैभव घ्यावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP