बालकास पाळण्यांत घालण्याचा विधि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
पुत्राला पाळण्यांत घालण्याविषयीं बारावा दिवस शुभ होय. कन्येला पाळण्यांत घालण्याविषयीं तेरावा दिवस शुभ होय. ह्या दोन दिवशीं शुभ नक्षत्राचा विचार करण्याची गरज नाहीं. इतर दिवशीं असेल तर ज्योति:शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें दिनशुद्धी पहावी. आपल्या आचाराप्रमाणें कुलदेवतादि पूजा करून बालकास अलंकार घालून हरिद्रादिकानें सुशोभित केलेल्या पाळण्यांत माता इत्यादि सौभाग्यवती स्त्रियांनीं योगशायी हरीचे स्मरण करून गायन वाद्य चाललें असतां पूर्वेस शिर करून बालकास निजवावें. आपल्या आचाराप्रमाणें आणखीहि स्त्रियांना सौभाग्यद्रव्यें द्यावीत.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP