मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला| शिखा ( शेंडी ) विचार सार्थ षोडशसंस्काररत्नमाला संस्कार क्रम संस्कारांचीं फले संस्काराची परिभाषा पत्नी कोणत्या बाजूस असावी गणपति पूजनविधि पुण्याहवाचनाची कारिका पुण्याहवाचन प्रयोग मातृकापूजन नांदीश्राद्ध कर्मांगदेवता मंडपदेवताप्रतिष्ठा कर्मविशेष अग्नींची नांवे कुंडमंडप वेदीलक्षण यज्ञपात्रांचा आकार व त्यांची प्रमाणें कुंडसंस्कार स्थालीपाक तंत्र ग्रहयज्ञ करण्याची अवश्यकता ग्रहयज्ञसंकल्प आचार्यवर्ण पंचगव्याविधि भूमिप्रोक्षण अग्न्युत्तारण प्राणप्रतिष्ठा ग्रहस्थापना बलिदान पूर्णाहूती अभिषेक श्रेयसंपादन नवग्रहांची दानें विनायकशांतीचा विचार विनायकशांति करण्याचा विधि गर्भाधानसंस्कार निर्णय गर्भाधानाच्या मुहूर्ताचा निर्णय गृह्याग्नीचा पुन: संधान प्रयोग भुवनेश्वरीशांति प्रयोग गर्भाधानसंस्कार विधानम् गर्भरक्षणाचा प्रयोग गर्भपात होण्याची कारणें वंध्यत्वदोष परिहार अनपत्यत्व दोष निवारण संतति वाचत नसेल तर वांचण्यास उपाय वंध्यास्त्री पुत्रवती होण्याचा प्रयोग पुंसवन अनवलोभन व सीमंतोन्नयन संस्कारांचा निर्णय पुंसवनाचा संस्कार अनवलोभनाचा संस्कार सीमंतोन्नयनाचा संस्कार गर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतो गर्भिणी पतीचे धर्म सुखाने प्रसूत होण्याचा उपाय जातकर्म संस्काराचा निर्णय जननशांतिसंबंधी विचार कन्येच्या संस्काराचा विचार जातकर्म संस्कार षष्ठीदेवीची पूजा नामकरण संस्काराचा निर्णय नामकरणाचा संस्कार बालकास पाळण्यांत घालण्याचा विधि दूध पाजण्याचा विधि कर्णवेध ( कान टोचणे ) संस्कार बाळंतिणीनें जलपूजा करण्याचा विचार बालकाला दुष्टदृष्टि दोषादिक झाले असतां त्याचा रक्षाविधि सूर्यावलोकन व निष्क्रमण संस्काराचा निर्णय सूर्यावलोकन कटिसूत्र बांधणे आणि भूमिवर बसविणे संस्कार - निर्णय अन्नप्राशनाचा संस्कार प्रथम केशकर्तन ( जावळ ) निर्णय वर्धापनाचा ( वाढदिवसाचा ) निर्णय वर्धापन ( वाढदिवसाचा ) संस्कार पुंसवनादिचौलांत संस्काराचा लोप झाला असतां प्रायश्चित्त होम गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंत संस्कार अक्षरारंभाचा निर्णय अक्षरारंभ संस्काराचा विधि रजोदोषाचा विचार श्रीपूजनादिशांति शिखा ( शेंडी ) विचार चौल संस्काराचा निर्णय चौलकर्म संस्कार प्रयोग उपनयनसंस्काराचा विचार उपनयनसंस्काराचा निर्णय. उपनयनाचा काल उपनयनाच्या पूर्वी करावयाचे उपनयनाचा प्रयोग अनुप्रवचनीय होम मेधाजनन मंडपदेवतांचें उत्थापन ( देवदेवक उठविणें ) चार व्रतांच्या संस्काराचा निर्णय सांगवेदाध्यानाचा प्रकार सांगतो ब्रह्मचारीव्रतलोप प्रायश्चित्ताचा प्रयोग समावर्तन ( सोडमुंज ) संस्काराचा निर्णय समावर्तन ( सोडमुंजीचा ) संस्कार विवाहसंस्कार निर्णय विवाहाविषयीं मंडप वेदी इत्यादिकांचा निर्णय वाग्दान ( वाङनिश्चय ) प्रयोग सीमांत पूजनाचा प्रकार विवाहाच्या पूर्वीचें कृत्य व मंडापदेवताप्रतिष्ठादि वरानें वधूच्या घरी प्रवेश करण्याचे विधि मधुपर्काचा विधि गौरीहराची पूजा वधूवरांचे परस्पर निरीक्षण कन्यादानाचा विधि अक्षतारोपण विवाहहोमाचा प्रयोग गृहप्रवेशनीय होम ऐरिणी ( वंशपात्र ) दान वधूसह ग्रहप्रवेश व लक्ष्मीपूजन देवकोत्थापन व मंडपोद्वासनाचा विधि औपासननामक सायंप्रातर्होमाचा निर्णय सायंकालीन औपासनहोमाचा प्रयोग प्रात:कालीन औपासनहोमाविषयी विशेष अग्निसमारोपविधि अग्नि सिद्ध करणें नववधू गृहप्रवेशाचा निर्णय द्विरागमन कन्यावैधव्ययोगनाशक उपायांचा निर्णय कन्येचा वैधव्ययोगपरिहार करणारे विधान मृतभार्यात्व दोष जाण्यास उपाय दुसर्या व तिसर्या विवाहाचा निर्णय अर्कविवाह प्रयोग दत्तकग्रहण विचार दत्तपुत्रविधान पुत्रकामेष्टि प्रयोग नारायनबलीचा व नागबलीचा मुहूर्त निर्णय वीरभोजनविधि नारायणबलि प्रयोग नागबलि प्रयोग सर्वप्रायश्चित्त प्रयोग संस्कारप्रयोगांतर्गत याज्ञिकसाहित्य साहित्यांतील पारिभाषिक शब्द शिखा ( शेंडी ) विचार ‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे. Tags : poojasanskarvidhiपूजाविधीसंस्कार शिखा ( शेंडी ) विचार Translation - भाषांतर चूडा म्हणजे शेंडी, ठेवण्याच्या संस्कारास चौल असें म्हणतात. चूडा = चौड = चौल ‘ ड ल यो रभेद: ’ ड आणि ल एकच. चूडा - शिखा ठेवण्याची चाल अत्यंत प्राचीन असून ऋग्वेदांत वसिष्ठाच्या शेंडीचा उल्लेख आहे. शिखा केवळ सामाजिक चिह्न नाही. तर दीर्घ आयुष्याचें एक साधन आहे. कारण ही शिखा ( शेंडी ) मस्तकांतील अधिपति ( मुख्य ) नाजूक भागाचे रक्षण करणारी आहे. म्हणूनच शिखा पुढें न ठेवित मस्तकाच्या ज्या भागावर आंत व वर केशाचा भोवरा असतो. त्या ठिकाणी शिरा व सांधे यांचा मिलाफ़ असल्यामुळें ती जागा नाजूक असतें. तिला धक्का लागू नये. याकरितांच त्यांच जागेवर शेंडी ठेवण्याची पद्धत आहे. शेंडी ठेवण्याच्या योगानें मेंदूच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाची वाढ होऊन बुद्धी तरतरीत होते.भरतखंडांत ब्राह्मणादि चारहिवर्ण शिखाधारी आहेत. या भारतवर्षांत ( हिंदुस्थानांत ) कित्येक पूर्ण जटाधारी, दक्षिणी अर्ध जटाधारीं व उत्तर हिंदुस्थान, मध्यप्रांत, गुजराथ, सिंध, राजस्थान, वगैरे ठिकाणचें आर्यलोक शिखाधारी आहेत. कित्येक लोकाला या शिखा चिन्हाचा उपयोग मोठमोठ्या शहरांतून माहीत होत नाहीं. परंतु तुम्ही फ़िरत फ़िरत एकाद्या खेडेगावीं गेला तर ज्याच्या डोकीवर शिखा ( शेंडी ) चिह्न नाहीं, त्याला आर्य लोक आपलें आडाचें पाणी काढूं देत नसत.आजकाल अनेक मंडळी अथवा सभेंत नवीन नवीन अनेक चिन्हे बनवितात. कोणी चांदीचें अथवा गिलीटाचें मेडल छातीवर लटकवितात. कोणी टोपीवर अक्षरपट्टी अथवा टिकली लावतात. कोणी मखमल किंवा रेशमाचें फ़ूल बटनांत अडकवितात. ही सर्व चिन्हें कापड उतरविल्याबरोबर चिन्हे उतरतात अथवा कपडा गहाळ झाला तर गहाळ होतात. परंतु शिखा ( शेंडीचा ) जो लहानसा सुंदर केशाचा गुच्छ असतो. तो एक बोटभर जरी लांब असला तरी तो मस्तकावर आपोआप लटकत राहतो. तुम्ही कपडे उतरा अथवा ते अंगावर ठेवा; जागे रहा अथवा झोंपेंत असा; देशांत रहा अथवा परदेशांत जा; सर्वत्र हे चिह्न तुमचे बरोबर आहे. हें हरवल्याचे किंवा कोणी नेण्याचें मय नाहीं. इतर सर्व चिन्हें वागविण्यास पैसे लागतात. शिखा हें चिन्ह इतकें स्वस्त आहे कीं, तें पैशावांचून बनवितां येते. आर्यांचे मुख चिन्ह शिखा व यज्ञोपवीत हे आहे. यज्ञोपवीत धारणाच्या संस्कारास उपनयन असें म्हणतात. हे दोनही संस्कार हिंदुधर्म शास्त्र दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे संस्कार ब्राह्मणवर्गांत चालूं असून दोनहि एकदम करण्यांत येतात. तथापि हें संस्कार सर्व भारतांत रूढ होणे अत्यंत जरूर आहे. N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP