मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
पुंसवन अनवलोभन व सीमंतोन्नयन संस्कारांचा निर्णय

पुंसवन अनवलोभन व सीमंतोन्नयन संस्कारांचा निर्णय

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


पुंसवन: -- या शब्दाचा अर्थ - पुमान् म्हणजे वीर्यवान् ( बलवान् ) संतति ज्या संस्काराच्या योगाने होते, त्याला पुंसवन म्हणतात. हा संस्कार गर्भाचें स्पष्ट ज्ञान झाल्यावर दुसरा, चवथा, सहावा किंवा आठवा यांतून कोणत्याहि मासांत करावा; अथवा सीमंतोन्नयन संस्काराबरोबर करावा. नक्षत्रें, मूळ, हस्त, श्रवण, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभा० पुनर्वसु, पुष्य, मृग अश्विनी ( उत्तम ) पूर्वाषाढा, उत्तराषाढा, आर्द्रा, स्वाती, अनुराधा भरणी, कृत्तिका रोहिणी ( मध्यम ) आणि रविवार, भौमवार व गुरुवार हे उक्त आणि रिक्तातिथि ४।७।१४।३० वर्ज करून सर्व तिथि व गर्भधारण झाल्यापासून द्वितीय तसें हीच तिथिवार नश्रत्रें अनवलोभन व सीमंतोन्नयन संस्कारास उक्त आहेत. या संस्कारांना विशेषेकरून शुक्रपक्ष असून चंद्र पुरुषनक्षत्री ( कृष्ण पंचमीं पर्यंत ) असावा. स्त्रीसंज्ञक नक्षत्रांत जल अधिक उत्पन्न करण्याची शक्ति असतें आणि पुरुषसंज्ञक नक्षत्रें सूर्याप्रमाणें अधिक तेज वृद्धि करणारे आहे. हे संस्कार ठराविक कालातच करावयाचें असल्यामुळें याला गुरुशुक्रास्त, बाल्य वार्धक्य, मलमास वगैरेचा दोष लागूं नाही.
अनवलोभन :-- याचा अर्थ - अवलोभन म्हणजे पतन, तें न होणें अर्थांत् अनवलोभन म्हणजे गर्भपतन न होऊं देणें आहे म्हणून पुंसवन व अनवलोभन हे संस्कार पहिल्या गर्भाचें केलें तथापि हे गर्भसंस्कार असल्यामुळें दर एक गर्भांचेहि करावें. पुंसवन व अनवलोभन संस्कारापासून तीन हेतु साध्य होतात. एक गर्भ बलवान् होतो, दुसरा गर्भपात होत नाहीं, तिसरा बालक पुरे दिवस झालेनंतर जन्म पावतें. पुंसवन संस्कार पतीनें, तो सन्निध नसेल तर दीर इत्यादिकांनीं करावा. अनवलोभसंस्कार ऋवेद्यांना सांगितला आहे. अन्य शाखेला नाहीं.
सीमंतोन्नयन : याचा अर्थ - मस्तकांतील पंचसंधीस सीमन्त असे म्हणतात. त्यांचे उन्नयन म्हणजे वृद्धिकरण रक्षण, करण्याकरितां संस्कार होय. सीमंतावर ( मस्तकांतील पंच संधीच्या भागावर म्हणजे मेंदूवर अथव मानसिक शक्तिवर ) जर आघात झाला तर मनुष्य एकदम मूर्छित होऊन त्याची चलनवलन क्रिया बंद होते. सीमंताचें  ( मस्तकांतील पंचसंधीचे ) ठिकाणीं मुख्य मानसिक शक्ति असते म्हणून गर्भवती स्त्रीचे विचार, मानसिक शक्ति आचार, आहार वगैरेचे प्रतिबिंब गर्भस्थ बालकावर पडतें, जर आम्हांला गर्भस्थ बालकाचें मेंदूवर ( मानसिक शक्तीवर ) प्रभाव पाडावयाचा आहे, तर त्याकरितां गर्भवती स्त्रीच्या मेंदूवर ( मानसिक शक्तीवर ) प्रभाव पाडण्याची आवश्यकता आहे, गर्भस्थ बालकाचे मन दृढ करण्याकरितां गर्भवतीचें मन दृढ व शांत केलं पाहिजे. जर बालक ईश्वरभक्त व्हावा अशी इच्छा असेल तर गर्भवतीला पवित्र व ईश्वरभक्त बनविले पाहिजे. जर बालक ब्रह्मतेजानें युक्त व्हावा तर गर्भवतीच्या मनावर तसा परिणाम केला पाहिजे. जर बालक शिल्पशास्त्रवेत्ता व्हावा, तर गर्भवतीचें मन त्सें केलें पाहिजे जर बालक क्षात्रतेजानें युक्त व्हावा तर गर्भवतीचे मन त्याप्रमाणें केलें पाहिजे. सारांश गर्भवतींचे मनाच्या विचाराचे संस्कारानें युक्त असे बालकही त्या मनाच्या संस्कारानें युक्त होईल. गर्भवती आपलें शारिरिक व मानसिक सर्व शक्ती गर्भस्थ बालकाला देऊं शकते म्हणून गर्भस्थ बालक विशेष सामर्थ्यवान् करून त्याची काया पालटण्याचे गर्भवतीहे एक मोठे साधन आहे. ज्या रीतीनें गर्भवती ९ महिने तपश्चर्या करील अर्थात् सुखदु:ख सहन करून नियमानें राहिल त्याचप्रमाणे तिचें बालक कुलोद्धारक होईल, जगदुद्धारक होईल बालकाच्या यथायोग्य शिक्षणाला आरंभ गर्भापासूनच होतो व त्याची बौधिक शक्ति दृढ होतें. शाळा किंवा कॉलेजच्या शिक्षणानें मुलें चांगली निघतील ही कल्पना चुकीची आहे. म्हणून ज्यांना आपली संतती प्रभावशाली व्हावी अशी इच्छा असेल त्यानें त्याप्रमाणें आपले गर्भवती स्त्रीचे मनावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करावा हाच या संस्काराचा मुख्य उद्देश आहे.
हा संस्कार ४।८।५।६।९ या महिन्यांतून कोणत्याही एकांत करावा. प्रसूतीपर्यंत त्यांची मर्यादा आहे. संस्कार न करतां प्रसूत झाली असतां पुत्रासहित त्या स्त्रीचा यथाशास्त्र हा संस्कार करावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP