मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
अर्कविवाह प्रयोग

अर्कविवाह प्रयोग

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


कर्त्यानें रविवारी किंवा शनिवारी अथवा हस्त नक्षत्रीं, अथवा दुसर्‍या कोणत्या एका शुभदिवशीं पुष्पफ़लांनी युक्त असा अर्क ( रुई ) वृक्ष पाहून त्या वृक्षाच्या समीप जाऊन अर्ककन्यादान करणारा आचार्य वरून आरक्त गंधादिकानें भूषित होत्साता देशकालांचा उच्चार करून माझा मानुषी बरोबर होणार्‍या विवाहाची शुभता सिद्धीकरितां अर्कविवाह करीन. असा संकल्प करून आचार्याला वरून नांदीश्राद्धापर्यंत पृष्ठ ४ ते २२ कर्म करावे. दात्याने मधुपर्क, यज्ञोपवीत, वस्त्रें, गंध, पुष्पमाला इ० उपचारांनी वराची पूजा करावी. नंतर अर्कवृक्षाच्या पुढें बसून “ त्रिलोकवासिन्० ” या मंत्राने प्रार्थना करून छायायुक्त रवीचे अर्काचे ठिकाणीं ध्यान करून “ समुद्रज्येष्ठा० इ० पुष्ठ १७ ओळ ३ ” अभिषेक करून वस्त्रादिक उपचारांनी “ आकृष्णेन० पृष्ठ ६३ ओळ १ ” ह्या मंत्रानें पूजा करून श्वेतवस्त्र व सूत्र यांनी वृक्षाला वेष्टन करून गूळभाताचा नैवेद्य अर्पण करून तांबूल द्यावे. नंतर “ ममप्रीतिकरा० ” या मंत्रानें अर्क वृक्षाला प्रदक्षिणा करून पुन: “ नमस्ते मंगले० ” या मंत्रांनी प्रदक्षिणा करावी. मग अंत:पटधारणापासून कन्यादानापर्यंत मुख्य तांत्रिक विधि करून कन्यादात्यानें आदित्याची पणती, सवित्याची नात, अर्काची पुत्री, काश्यपगोत्राची अर्क नांवाची कन्या अमुक गोत्राच्या अमुक नांवाच्या वराला तुला दिली आहे. असे म्हणून “ अर्ककन्या० ” या मंत्रानेम अर्ककन्या द्यावी. नंतर दक्षिणा देऊन गायत्री मंत्रानें अर्क व वर यांना सूत्रानें वेष्टून त्या सूत्राने “ बृहत्साम ” या मंत्रानें अर्कवृक्ष व वर यांना कंकण बांधून अर्कवृक्षाच्या चार दिशांचे ठायीं चार कलश मांडून त्या प्रतिकलशावर नाममंत्रानें विष्णूची षोडशोपचार पूजा करून अर्कवृक्षाच्या उत्तरेस वरानें अर्कपत्नीस हस्तस्पर्श करून वरानें हिला भार्यात्वसिद्धीकरिता पाणिग्रह होम करतो. असा संकल्प करावा. नंतर स्थालीपाक पृष्ठ ३३ प्यारा ३ “ आघारदेवतेआज्येन ” पर्यंत करून “ बृहस्पति० आज्यद्रयेण ” याप्रमाणे प्रधानदेवतेचा उच्चार करून नंतर स्थालीपाक प्यार ७ “ शेषेणास्विष्टकृत० ” येथून प्यारा ८ व १० ते १२ नंतर प्यारा १६ ते २२ पर्यंत करावा. नंतर “ संगोभि० यस्मैत्वा० ” या दोन मंत्रांनी दोन व व्याहृति मंत्रांनी चार अशा सहा तुपाच्या आहुती देऊन स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ ते पृष्ठ ५२ प्यारा ३२ पर्यंत होम समाप्त करावा. नंतर “ मयाकृतं० ” या मंत्राने प्रार्थना करून शांतिसूक्ताचा ( पृष्ठ १६० ओळ १ आनोभद्रा० ते जनित्वं पर्यंत ) पाठ करावा. दोन गाई व धारण केलेली वस्त्रें आचार्याला देऊन दुसरी वस्त्रें धारण करावी. दहा अथवा तीन ब्राह्मणाला भोजन द्यावे. असा अर्कविवाह संपला.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP