मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला| सर्वप्रायश्चित्त प्रयोग सार्थ षोडशसंस्काररत्नमाला संस्कार क्रम संस्कारांचीं फले संस्काराची परिभाषा पत्नी कोणत्या बाजूस असावी गणपति पूजनविधि पुण्याहवाचनाची कारिका पुण्याहवाचन प्रयोग मातृकापूजन नांदीश्राद्ध कर्मांगदेवता मंडपदेवताप्रतिष्ठा कर्मविशेष अग्नींची नांवे कुंडमंडप वेदीलक्षण यज्ञपात्रांचा आकार व त्यांची प्रमाणें कुंडसंस्कार स्थालीपाक तंत्र ग्रहयज्ञ करण्याची अवश्यकता ग्रहयज्ञसंकल्प आचार्यवर्ण पंचगव्याविधि भूमिप्रोक्षण अग्न्युत्तारण प्राणप्रतिष्ठा ग्रहस्थापना बलिदान पूर्णाहूती अभिषेक श्रेयसंपादन नवग्रहांची दानें विनायकशांतीचा विचार विनायकशांति करण्याचा विधि गर्भाधानसंस्कार निर्णय गर्भाधानाच्या मुहूर्ताचा निर्णय गृह्याग्नीचा पुन: संधान प्रयोग भुवनेश्वरीशांति प्रयोग गर्भाधानसंस्कार विधानम् गर्भरक्षणाचा प्रयोग गर्भपात होण्याची कारणें वंध्यत्वदोष परिहार अनपत्यत्व दोष निवारण संतति वाचत नसेल तर वांचण्यास उपाय वंध्यास्त्री पुत्रवती होण्याचा प्रयोग पुंसवन अनवलोभन व सीमंतोन्नयन संस्कारांचा निर्णय पुंसवनाचा संस्कार अनवलोभनाचा संस्कार सीमंतोन्नयनाचा संस्कार गर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतो गर्भिणी पतीचे धर्म सुखाने प्रसूत होण्याचा उपाय जातकर्म संस्काराचा निर्णय जननशांतिसंबंधी विचार कन्येच्या संस्काराचा विचार जातकर्म संस्कार षष्ठीदेवीची पूजा नामकरण संस्काराचा निर्णय नामकरणाचा संस्कार बालकास पाळण्यांत घालण्याचा विधि दूध पाजण्याचा विधि कर्णवेध ( कान टोचणे ) संस्कार बाळंतिणीनें जलपूजा करण्याचा विचार बालकाला दुष्टदृष्टि दोषादिक झाले असतां त्याचा रक्षाविधि सूर्यावलोकन व निष्क्रमण संस्काराचा निर्णय सूर्यावलोकन कटिसूत्र बांधणे आणि भूमिवर बसविणे संस्कार - निर्णय अन्नप्राशनाचा संस्कार प्रथम केशकर्तन ( जावळ ) निर्णय वर्धापनाचा ( वाढदिवसाचा ) निर्णय वर्धापन ( वाढदिवसाचा ) संस्कार पुंसवनादिचौलांत संस्काराचा लोप झाला असतां प्रायश्चित्त होम गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंत संस्कार अक्षरारंभाचा निर्णय अक्षरारंभ संस्काराचा विधि रजोदोषाचा विचार श्रीपूजनादिशांति शिखा ( शेंडी ) विचार चौल संस्काराचा निर्णय चौलकर्म संस्कार प्रयोग उपनयनसंस्काराचा विचार उपनयनसंस्काराचा निर्णय. उपनयनाचा काल उपनयनाच्या पूर्वी करावयाचे उपनयनाचा प्रयोग अनुप्रवचनीय होम मेधाजनन मंडपदेवतांचें उत्थापन ( देवदेवक उठविणें ) चार व्रतांच्या संस्काराचा निर्णय सांगवेदाध्यानाचा प्रकार सांगतो ब्रह्मचारीव्रतलोप प्रायश्चित्ताचा प्रयोग समावर्तन ( सोडमुंज ) संस्काराचा निर्णय समावर्तन ( सोडमुंजीचा ) संस्कार विवाहसंस्कार निर्णय विवाहाविषयीं मंडप वेदी इत्यादिकांचा निर्णय वाग्दान ( वाङनिश्चय ) प्रयोग सीमांत पूजनाचा प्रकार विवाहाच्या पूर्वीचें कृत्य व मंडापदेवताप्रतिष्ठादि वरानें वधूच्या घरी प्रवेश करण्याचे विधि मधुपर्काचा विधि गौरीहराची पूजा वधूवरांचे परस्पर निरीक्षण कन्यादानाचा विधि अक्षतारोपण विवाहहोमाचा प्रयोग गृहप्रवेशनीय होम ऐरिणी ( वंशपात्र ) दान वधूसह ग्रहप्रवेश व लक्ष्मीपूजन देवकोत्थापन व मंडपोद्वासनाचा विधि औपासननामक सायंप्रातर्होमाचा निर्णय सायंकालीन औपासनहोमाचा प्रयोग प्रात:कालीन औपासनहोमाविषयी विशेष अग्निसमारोपविधि अग्नि सिद्ध करणें नववधू गृहप्रवेशाचा निर्णय द्विरागमन कन्यावैधव्ययोगनाशक उपायांचा निर्णय कन्येचा वैधव्ययोगपरिहार करणारे विधान मृतभार्यात्व दोष जाण्यास उपाय दुसर्या व तिसर्या विवाहाचा निर्णय अर्कविवाह प्रयोग दत्तकग्रहण विचार दत्तपुत्रविधान पुत्रकामेष्टि प्रयोग नारायनबलीचा व नागबलीचा मुहूर्त निर्णय वीरभोजनविधि नारायणबलि प्रयोग नागबलि प्रयोग सर्वप्रायश्चित्त प्रयोग संस्कारप्रयोगांतर्गत याज्ञिकसाहित्य साहित्यांतील पारिभाषिक शब्द सर्वप्रायश्चित्त प्रयोग ‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे. Tags : poojasanskarvidhiपूजाविधीसंस्कार सर्वप्रायश्चित्त प्रयोग Translation - भाषांतर वस्त्रासहवर्ततान स्नान करून; शक्त असेल तर लोलें वस्त्र धारण केलेला असा ब्राह्मणांच्या सभेपुढें एक गाय व बैल यंचा प्रतिनिधि असा निष्क इत्यादि परिमित ब्रह्मदंड ठेवून साष्टांग नमस्कार करून सभेला प्रदक्षिणा करून “ सर्वेधर्म - द्विजसत्तमा: ” या श्लोकांनीं ब्राह्मणांची प्रार्थना केल्यावर तुम्हीं मजवर अनुग्रह करा असें बोलावें. कोणतें तुझें कार्य आहे ? असें विचारलें असतां त्यानें सांगावें कीं, मी किंवा माझ्या पत्नीनें ह्या अथवा अन्यजन्मीं वांझपणा, मृतवांझपणा, यला कारणभूत असें बालहत्त्या, रत्नांचा अपहार इत्यादिक पातक केलें त्याचा नाश व्हावा याकरितां कर्मविपाकांत सांगितलेला जों हरिवंशग्रथाचें श्रवण इत्यादिक विधि त्याचा अधिकार प्राप्त होऊन दीर्घायु अशी पुत्र इत्यादिक संतति प्राप्त होण्याकरितां प्रायश्चित्त तुम्हीं मला सांगावें. अशी प्रार्थना केल्यानंतर त्या ब्राह्मणांनी जो अनुवादक त्याला सहा अब्द, तीन अब्द दीड अब्द यांतून कोणतेहि प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित असें घेतल्यानें तुझी शुद्धि होऊन तूं कृतकार्य होशील असे बोलावे. अनुवादकानेम पापी याच्याजवळ सांगावें. तदनंतर प्रायश्चित्तकर्त्यानें “ ॐ ” ( बर आहे ) असें म्हणून अनुवादकानें सांगितलें त्याचा अंगीकार करावा, व सभेचें विसर्जन करावें. नंतर देशकालाचा उच्चार करून संकल्प करावा. “ सभार्यस्य० माचरिष्ये ” असा संकल्प करून दोनप्रहरीं क्षौर करून स्नान करावें. नंतर वनस्पतीची “ आयुर्बलं० वनस्पते ” या मंत्रानें प्रार्थना करून आघाड्याच्या काष्ठानें दंतधावन करावें. तदनंतर दहा स्नानें करावींत. त्यामध्यें मस्तकाला भस्म स्नान करावें तें असें - भस्म हातीं घेऊन “ ईशा० ” या मंत्रानें मस्तकाला भस्म लावावें. “ तत्पुरु० ” या मंत्रानें मुखाला, “ अघोरा० ” यानें हृदयाला, “ वामदे० ” यानें गुह्यस्थानीं, “ सद्योजा० ” यानें पायाला, प्रणवमंत्रानें सर्व अंगाला भस्म लावावें. स्नान करून आचमन करावें. नंतर गोमय घेऊन प्रनवमंत्रानें गोमयाचा दक्षिणभाग चार दिशांचे ठिकाणी टाकावा व उत्तरभाग तीर्थांत टाकून बाकी राहिलेलें गोमय “ मानस्तोके० ’’ ( पृ. ५२ ओ. १६ ) या मंत्रानें अभिमंत्रण करून “ गंधद्वारां० ” ( पृ. ९ ओ. ३ ) या मंत्रानें गोमय सर्व शरीराला लावावें. नंतर “ हिरन्यशृंगं० ” ह्या दोन मंत्रांनीं तीर्थाची प्रार्थना करून “ याप्रवत० ” ( पृ. १०२ ओ. १ ) ह्या मंत्रानें तीर्थाला स्पर्श करून स्नान करून दोन वेळां आचमन करावें. “ अश्वक्रांते० ” ह्या मंत्रानें मृत्तिकेचें अभिमंत्रण करून “ उदूधृतासि० ” या मंत्रानें मृत्तिका घेऊन “ नमोमित्रस्य० ” या मंत्रानें सूर्याला दाखवावी. नंतर “ गंधद्वारा० ” ( पृ. ९ ओ. ३ ) ह्यानें मस्तकादि सर्व अंगाला मृत्तिका लावून स्नान करून दोन वेळां आचमन करावें. नंतर “ आपोअस्मान्० ” ( पृ. ५१ ओ. ९ ) हा मंत्र म्हणून सूर्याच्या समोर उभा राहून “ इदंविष्णु० ” ( पृ. ६७ ओ. १ ) या मंत्राचा जप करून उदकाच्या प्रवाहाभिमुख बुडी मारावी. तदनंतर पंचगव्य व कुशोदक यांची निरनिराळी स्नानें करून स्नानसंबंधी तर्पण इत्यादिक करावें. नंतर विष्णुश्राद्ध व पूर्वांगसंबंधी गोप्रदान करून अग्नीची स्थापना करून पंचगव्याचा होम, व्याहृतिमंत्रांनीं १०८ अथवा २८ असा घृताचा होम करून ( व्रत - नियम घेतों ) अशी ब्राह्मणांची प्रार्थना करून उरलेले पंचगव्य ( पृ. ५८ ) प्रणवमंत्रानें प्राशन करावें. असा सर्वप्रायश्चित्त प्रयोग संपला.इति सार्थ षोडशसंस्काररत्नमाला समाप्त.॥ ॐ तत्सत् ॥ N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP