मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
गृह्याग्नीचा पुन: संधान प्रयोग

गृह्याग्नीचा पुन: संधान प्रयोग

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


यजमानानें पत्नीसह स्नान वगैरे केल्यावर दररोजचें नित्यकर्म आटपावे, नंतर देशकालाचें संकीर्तन करावें. माझा गृह्याग्नीचा विच्छेद झालेल्या दिवसांपासून हा वेळपर्यंत गृज्याग्नीविच्छेदापासून झालेल्या दोषांचा परिहारद्वारानें श्रीपरमेश्वराची प्रीति होण्याकरितां गृह्याग्नी विच्छेद दिवसांपासून ह्या वर्षापर्यंत प्रत्येक अब्दाबद्दल एकैक कृच्छ्र यथाशक्तिप्रमाणें त्याचे प्रत्याम्नाय, गाईचे निष्क्रयभूत, रजतनिष्क अथवा निष्कार्ध किंवा निष्कपादार्ध ह्यांपैकीं एखाद्या द्रव्याचें दान करून मी आचरण करीन. त्याप्रमाणें इतकें दिवसपर्यंत गृह्याग्नीविच्छेदामुळें सायंप्रात:औपासनहोमद्रव्य तसेंच लुप्त झालेलें दर्श व पौर्णिमाससंबंधीं स्थालीपाक इत्यादि कर्मं करण्यास लागणारें परिपूर्ण व्रीहि इत्यादि द्रव्य अथवा त्याचे निष्क्रय देण्याकरितां मी सोडीत आहे. असा संकल्प करून पुन: देशकालाचेम स्मरण करून विच्छिन्न झालेल्या गृह्याग्नींचें पुन:संधान मी करीन असा संकल्प करावा. स्थंडिलाचें उपलेपन, उल्लेखन, अभ्युक्षण, ( पृष्ठ ३३ प्यारा १ पासून ३७ ओळ ३ पर्यंत स्थालीपाक करून ) द्विजनामक अग्नीचें स्थापन करून अन्वाधान करावें. दोन समिधा घेऊन “ पुन:संधानहोमे० ” येथून “ द्रव्येण० ” येथपर्यंत म्हणावें.
नंतर पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेणस्विष्ट० ” येथून पृष्ठ ४० प्यारा १२ “ आच्छादयेत्० ” येथपर्यंत स्थालीपाक करून पुढें पृष्ठ ४३ प्यारा १६ “ ततस्ते पवित्रे० ” येथून पृष्ठ ४५ प्यारा २२ “ त्यक्त्वाच० ” येथपर्यंत स्थालीपाकाचें कर्म करावें. त्यांत पात्रासादनामध्ये विशेष असा कीं, प्रोक्षणी आणि स्रुवा, आणि आज्यपात्र, लाह्यांचे शूर्प, इध्म आणि बर्हि इतकीं पात्रें असावीत दधिप्राशनपक्षीं दधीही संपादित केलेलें असावें. आज्यसंस्कार इत्यादि करून तेथें तुपाबरोबर लाह्यांचेंही पर्यग्निकरण करावें. तुपाचें उत्प्लवनमात्र केलें असतां लाह्यांना तीन वेळां प्रोक्षण करावें. स्रुवाचे संमार्जन इत्यादि पत्नीचें अन्वारब्ध इध्माधानापासून तों आघारापर्यत कर्म करावें, परंतु चक्षुषे होम करूं नये.
या प्रमाणें स्थालीपाक केल्यानंतर “ ॐ अग्न० ” ह्या पासून तों ते ते मंत्र म्हणून अग्नीमध्यें तुपाचे हवन करावे. विनियोग पूर्वीप्रमाणेच करावा.
ह्यानंतर पतीने पत्नीच्या धुतलेल्या ओंजळीला तूप लावून त्या ओंजळींत दोन वेळां लाह्या घालाव्यात. पंचप्रवर्‍यानें तीन वेळां लाह्या घालाव्यात. शूर्पामध्यें अभिघार करून स्वत: बसून उभी राहणार्‍या पत्नीच्या ओंजळींला आपल्या दोन्ही हातांनीं धरून “ अर्यमणं ” हा मंत्र बोलावा. तो मंत्र संपल्यावर पत्नीनें न सोडलेल्या एकसारख्या ओंजळींतून अंगुलीच्या अग्रांनीं अथवा डाव्या बाजूनें अग्नीत लाह्या सोडून हवन कराव्यात. असेच पुढेंही करावें. हे हवि अर्यमा अग्नींचें आहे, माझें नाहीं असें बोलावें. असेंच वरुणाच्या व पूषाच्या मंत्रानें हवन करावे. नंतर शूर्पाच्या कोणानें बाकी राहिलेल्या सर्व लाह्यांचे पतीनें अथवा पत्नीनें आपल्या मनांत प्रजापतीचे ध्यान करून हवन करावें व हे हवि प्रजापतिचें आहे माझें नाहीं असें बोलावें.
लाजांना स्विष्टकृत् नाहीं.
उभे राहून होम केल्यावर मग बसून पुढें सांगितलेल्या “ आन:प्रजां० ” इत्यादि ४ मंत्रांनीं तुपाचा होम पतीनें करावा.
“ समंजं० ” हा मंत्र बोलून स्वत: दधि प्राशन करावें. अथवा बाकी उरलेल्या तुपानें हृदयांजन करावें. पत्नीला दधि द्यावें, तिनें तें दधि मुकाट्यानें प्राशन करावें. आपल्याला हृदयांजन करावें. ह्यापक्षी पत्नीनेही मुकाट्यानें आपल्याला हृदयांजन करावें. नंतर तुपानें “ यदस्य० ” ह्यानें स्विष्टकृताला उद्देशून होम करावा.
समिधा बांधलेली दोरी सोडणें वगैरे कर्म करून बाकीचें कर्म समाप्त करावें. म्हणजे पृष्ठ ४९ प्यारा २८ “ यदस्येति० ” येथून स्थालीपाकाचें कर्म पृष्ठ ५३ पर्यंत सर्व समाप्त करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP