अभिषेक
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
यजमानानें आपल्या अंगास सर्वौषधी व सर्वगंध लावून आपल्या परिवारासहित पूर्वेस तोंड करून बसावें. नंतर चार ब्राह्मणांनीं उत्तरेस किंव ईशान्येस तोंड करून उभे राहून ग्रहकलशांतील पाणी घेऊन " स्मुद्रज्येष्ठा० " इत्यादि अभिषेक मंत्रांनीं व " ग्रहाणा० " इत्यादि ९ ग्रहमंत्रांनीं " सुरास्त्वा० " इत्यादि ९ पौराण मंत्रांनीं यजमान व पत्नी आणि मुलें यांस अभिषेक करावा.
नंतर यजमानानें स्नान करून शुभ्र वस्त्र व गंधपुष्प धारण करावें आणि पूर्वेस मुख करून ग्रहादिकांची उत्तरपूजा करावी. नंतर राहिलेलें स्थालीपाक तंत्र पृष्ठ ५३ प्यारा ३२ चे कर्म करावें.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP