मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
भुवनेश्वरीशांति प्रयोग

भुवनेश्वरीशांति प्रयोग

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


रजोदर्शन झाल्यापासून पांचव्या दिवशीं चंद्र आणि ग्रह इत्यादिकांची अनुकूलता असेल अशा दिवशी शुद्धस्थानीं उत्तम. स्नान केलेल्या पत्नीसह पतीनें पूर्वेस तोंड करून बसावें. आचमन करून प्राणायम करावा. देशकालाचें स्मरण करून माझ्या पत्नीला प्रथम रजोदर्शनामध्यें अमुक, दुष्टमास इत्यादिकांनीं सुचविलेले सकल अरिष्ट निरसन करण्याच्याद्वारानें श्रीपरमेश्वराच्या प्रीतीकरीतां ग्रहमखासहित शौनकाने सांगितलेली शांति करीन असा संकल्प करून गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध करून शांत स्वभावाचा, जितेंद्रिय, कुटुंबवत्सल, मंत्र जाणणार्‍या अशा ब्राह्मणाला आचार्यवरण करून जपाकरिता आणि होमाकरितां ८ व ६ किंवा ४ ऋत्विजांचें वरण करावें; आणि त्या सर्वांची गंधादिपूजा करावी.
नंतर आचार्यानें आचमन करून प्राणायाम करावा देशकालादिकांचा उच्चार करून मी यजमानाच्या अनुज्ञेने आचार्यकर्म करीन असा संकल्प करून “ यदत्रेति० ” ह्यानें पांढर्‍या मोहर्‍या फ़ेकणे इत्यादि आचार्याचे कर्म पृष्ठ ५७ ते ५९ यांत सांगितल्याप्रमाणे करावें.
नंतर घराचे ईशान्यदिशेस एका पवित्रस्थानी “ मोंहिद्यौ:० ”  ह्यामंत्राने भूमीला स्पर्श क्रून त्याच्या दक्षिणेस आणि उत्तरेस तसाच भूमीला स्पर्श करावा. “ औषर्धय:संव० ” ह्याने एक पायलीभर तांदुळांचें तीन ढीग करावे ते असे कीं, एक मध्यभागीं आणि त्याच्या दक्षिणेस व उत्तरेस असे दोन करावेत. त्याच क्रमानें तीन ढीगांवर नवीन, न फ़ुटलेले असे तीन कुंभ “ आकलशेषु० ” ह्या मंत्राच्या तीन आवृतीनें स्थापन करावेत.

नंतर “ प्रसुवआपो० ” येथून “ या:प्रवतो० ” ह्या मंत्रापर्यंत म्हणून पाण्यानें कुंभ भरावेत.
“ गंधद्वारा० ” ह्या मंत्रानें तिन्ही कुंभामध्यें गंध टाकावें. “ या औषधी:० ” ह्या मंत्रानें सर्व औषधी घालाव्यात. “ ओषधय:समिति० ” ह्यानें यव घालावेत.
नंतर मध्य कुंभामध्यें जव, तांदूल, तीळ, उडीद, कंगु, श्यामक ( सावे ) मूग इतके घालावेत. गायत्री मंत्रानें औदुंबर, दर्भ, दूर्वा, लालकमल, चंपक, बिल्व, विष्णुक्रांता, तुलसेसे बर्हि: ( दर्भ ) शंखपुष्पी बर्हि ( पांढरा विष्णुक्रांत ), शतावरी, अश्वगंधा, निर्गुंडी, रक्त - पीत सर्षपा ( तांबड्या पिंवळ्या मोहर्‍या मोहर्‍या ), अपामार्ग ( आघाडा ), पलाश, फ़णस, जीवक ( आसणा ), प्रियंगु ( कांगराळे ), गोधूम ( गहूं ), व्रीहि ( साळी ), अश्चत्थ ( पिंपळ ), दही, दूध, तूप, पद्मपत्र, नीलकमल, पांढरा तांबडा पिंवळा कुरंटक, गुंजा, वेखंड, भद्रमुस्तका ( नागरमोथे ) अशा ह्या बत्तीस औषधी अथवा जितक्या मिळतील तितक्या मिळवून त्या कुंभामध्यें घालाव्यात.
नंतर तिन्ही कुंभामध्यें कांडात्कांडात्० ह्या मंत्रानें दूर्वा घालाव्यात. अश्वत्थे. ह्या मंत्रानें पिंपळ, उंबर, पिंपरी, आंबा, वड ह्या पांचांचे पल्लव घालावेत “ स्योनापृथिवी० ” ह्या मंत्रानें हत्ती, घोडे, ह्या स्थानाची रस्त्यावरची, वारुळावरची, संगमावरची, डोहातील गोठ्यांतील अशा मृतिका घालाव्यात. या फ़लिना० ” ह्या मंत्रानें सुपार्‍या घालाव्यात. “ सहिरत्नानि० ” ह्या मंत्राने सोने, वज्रमणी, नीळ, पद्मगरामणी, मोतीं हीं रत्नें घालावींत. “ “ हिरण्यरूप० ” ह्यानें हिरण्य ( पैसे ), घालावे. “ युवासुवासा० ” ह्या मंत्राने सुताने अथवा वस्त्रानें कुंभाचे गळ्यांभोवती वेष्टन करावें. गंध, अक्षता पुष्पमाला ह्यांनीं कुंभाला भूषित करावें.
नंतर तीन्ही कुंभांवर त्याच क्रमानें म्हणजे स्थापनाच्या क्रमानेंच सोन्याचें, रुप्याचें, कांसाचें अथवा ताब्यांचे, वेळूचें, मातीचें, अशीं तीन पात्रें यवादिकांनी भरून “ पूर्णादवीं० ” ह्या मंत्रानें ठेवावींत आणि त्या पात्र्यांवर पांढरी तीन वस्त्रें ठेवावीत, त्यांवर चंदन इत्यादिकांनी आठ दळें काढावींत.
भुवनेश्वरी इत्यादि तीन प्रतिमांचें अग्न्युत्तारण व प्राणप्रतिष्ठा पृष्ठ ६० - ६१ यांत सांगितल्याप्रमाणे करावे. त्यांपैकीं मध्य कलशावर “ ॐतत्सवितु० ” असा हा मंत्र बोलून भुवनेश्वरीचें आवाहन करतो असें बोलून यथाशक्ति सोन्यानें तयार केलेली भुवनेश्वरीची प्रतिमा अग्युत्तारण केलेली स्थापन करावी. तिच्या द्क्षिणेस असलेल्या कुंभावरील वस्त्रावर इंद्राणी० ” ह्या मंत्रानें इंद्राणीचें आवाहन करतों असें बोलून तशीच सोन्याची इंद्राणी प्रतिमा स्थापन करावी. नंतर उत्तरेकडच्या कुंभावर “ इंद्रत्वा० ” हा मंत्र म्हणून इंद्राचें आवाहन करतों असें बोलून क्रमानेंच तीन देवतांचे वेळेस अनुसरून आणि पदार्थांच्या अनुकूलतेप्रमाणें षोडशोपचारांनीं पूजन करावें.
नंतर आचार्यानें मध्य कुंभावर असलेल्या देवतेच्या उद्देशानें आठ हजार अथवा आठशें गायत्रींचा जप करावा व नंतर श्रीसूक्ताचा जप करावा.
नंतर एका ऋत्विजानें दक्षिणेकडच्या कुंभावर स्थापन केलेल्या रुद्राच्या उद्देशानें रुद्रसूक्ताचा जप करावा.
असें कीं, “ कद्रुद्राय० ” ह्या नऊ मंत्रानें जप करावा.
नंतर “ इमारुद्राय० ” ह्या अकरा ऋचेच्या सूक्तांनीं जप करावा.
नंतर “ आतेपि० ” ह्या पंधरा ऋचांचे सूक्ताचा जप करावा.
नंतर “ इमारुद्राय स्थिर० या चार ऋचेच्या सूक्तांनी जप करावा.
नंतर “ आवोराजानं० ” “ तमुष्टुहि० ” “ भुवनस्य० ” “त्यंबकं० ” ह्यांनीं जप करावा.
नंतर दुसर्‍या ऋत्विजानें उत्तरेकडच्या कुंभावर स्थापन केलेल्या देवतेच्या उद्देशानें रुद्र अकरा आवृत्ति, त्याचे न्यास, ऋषि इत्यादिकांचे स्मरण करून जपाव्यात. “ शंनइंद्राग्नी० ” ह्या पंधरा ऋचांचे सूक्तांनी जप करावा.
नंतर कुंभाच्या पश्चिमेस पृष्ठ ३३ प्यारा १ पासून पृष्ठ ३६ प्यारा ५ पर्यंत स्थालीपाकतंत्र करून स्थंडिलावर वरद नांवाच्या अग्नीची स्थापना करावी. त्याच्या ईशान्यदिशेस वेदी इत्यादिकावर पृष्ठ ६२ ओळ १३ पासून ग्रहस्थापनविधि पर्यंत सांगितल्याप्रमाणें नवग्रहांचें त्यांच्या त्यांच्या मंत्रांनीं आवाहन करून त्यांची षोडशोपचारांनी पूजा करावी आणि त्याच्या ईशान्यदिशेस पूर्वीप्रमाणेच पृष्ठ ७० ओळ १२ पर्यंत कुंभ स्थापन करून त्यावर वरुणाचे आवाहन करावें. नंतर अग्नीजवळ येऊन अन्वाधान करावे तें असें.
पुढें करावयाचा ग्रहमखसहित असा दुष्टरजोदर्शन - शांतिहोम आहे, त्यामध्यें देवतांनीं स्वीकार करावा ह्याकरितां अन्वाधान करीन. अशा रीतीनें अन्वाधान केलेल्या अग्नि इत्यादि पृष्ठ ३७ प्यारा ६ “ चक्षुषीआज्येन० ” येथपर्यंत बोलून नऊ ग्रहांपैकी प्रत्येकाच्या उद्देशानें  ( अमुक १०८ किंवा २८ किंवा ८ ) संख्येच्या समिधा, तीळ, तूप ह्यांच्या आहुतींनीं अधिदेवतांपैकी आणि प्रत्येधिदेवतांपैकी प्रत्येक देवतेला उद्देशून ( अमुक ८ किंवा ४ ) संख्येच्या समिधा, तीळ, तूप ह्यांच्या आहुतींनीं, क्रतु सादगुण्य देवता आणि क्रतुसंरक्षाक देवता ह्यांच्या उद्देशानें ( अमुक ४ किंवा २ ) संख्येच्या द्रव्याच्या [ १००८ किंवा १०८ किंवा २८ ] ह्यांपैकी एका संख्येच्या दूर्वा, तीळ ह्यांनीं मिश्रित गोधूम पायस आणि तूप ह्यांच्या आहुतींनीं इंद्राणीला व इंद्राला उद्देशून प्रत्येकी ( १०८ किंवा २८ किंवा ८ ) ह्यांपैकीं एका संख्येच्या दूर्वा तिलमिश्रित गोधूम पायसाज्याहुतींनीं असा उचार करून अन्वाधान केल्यानंतर :-
पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेण० ” येथून पृष्ठ ४६ प्यारा २३ “ समप्रदेशे० ”येथपर्यंत स्थालीपाकतंत्र करावे. त्यांत परिसमूहन, परिस्तरण इत्यादि कर्म करतेवेळी विशेष असा की पृष्ठ ४१ प्यारा १३ मध्यें भुवनेश्वरी, इंद्रानी आणि इंद्र ह्यांचेकरितां “ अमुष्मै० ” हा मंत्र मनांत मुकाट्यानें चार मुठी घालाव्यात अथवा आहुति पुष्कळ आहेत म्हणून जास्ती घालूं नयेत. गाईच्या दुधांत ते तांदूळ शिजवून आज्यसंस्कार इत्यादि पृष्ठ ४६ प्यारा २३ आज्यभागापर्यंत कर्म करावें.
नंतर यजमानानें दक्षिणेस बसून अंगदेवता व प्रधानदेवता ह्यांना उद्देशून ह्या देवतांकरितां हे हवि आहेत माझें नाहींत असें बोलून आहुति सोडाव्यात.
त्याचा प्रकार - ऋत्विजास आचार्यानें नऊ ग्रहांच्या उद्देशानें आठशे अथवा अठ्ठावीस ह्यांपैकी एका संख्येच्या, तुपांनीं भिजविलेल्या रुई इत्यादि समिधा आणि तिळांच्या आहुतींनीं होम करावा. अधिदेवता, प्रत्यधिदेवता व विनायक इत्यादि पांच लोकपालांच्या उद्देशानें पूर्वीच्या संख्येपेक्षां कमी संख्येच्या आहुतींनीं होम करावा. ज्या वेळेस ग्रहांच्या उद्देशानें आठ आहुति द्यावयाच्या त्या वेळेस दुसर्‍यांना चार आहूति द्याव्यात असा संप्रदाय आहे. आहुति देणें त्या ग्रहांच्या आवाहनांत सांगितलेल्या मंत्रांनीं द्याव्यात. नंतर भुवनेश्वरीच्या उद्देशानें गायत्री मंत्रानें दही, मध आणि तूप ह्यांनी भिजविलेल्या तीन दुर्वांनी एक आहुति द्यावी अशा रीतीनें आठ हजार अथवा आठ शंभर दुर्वांच्या आहुति, तुपानें व तिलांनीमिश्र गोधूमाच्या आहुति, पायसाच्या आहुति, तुपाच्या आहुति होमाव्यात. अशा रीतीनें इंद्राणी व इंद्र ह्यांच्या उद्देशानें पूर्वोक्त आवाहनाच्या मंत्रांनी क्रमानें तेच चार प्रकारचे हवि प्रत्येकास आठशें संख्यानें होमावें. हा पक्ष भुवनेश्वरीकडे आठ हजार आहुति असतात तेव्हांचा आहे. परंतु भुवनेश्वरीकडे आठशें आहुति असतील त्या वेळेस इंद्राणे व इंद्र ह्यांकडे अठ्ठावीस आहुति होमाव्यात, असा संप्रदाय आहे.
नंतर  स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ “ यदस्येति० ” येथून पृष्ठ ५० प्यारा २९ “ त्यजेत्० ” येथपर्यंत सांगितल्याप्रमाणेम स्विष्टकृत् व प्रायश्चित होम करावा.
नंतर “ अथ बलिदानं ” पृष्ठ ७३ पासून पृष्ठ ७६ पर्यंत सांगितल्याप्रमाणें यजमानानें इंद्रादि दिक्पालांच्या नवग्रहांच्या आणि क्षेत्रपालांच्या उद्देशानें दीपांसह, उडीदांसह भाताचे बली द्यावेत. त्यांत विशेष असा कीं, नवग्रहांचें बली दिल्यानंतर “ पृष्ठ ७६ क्षेत्रपालबली ” देण्याचेपूर्वीं, भुवनेश्वरीच्या, इंद्राणीच्या, व इंद्राच्या उद्देशानें त्या त्या देवतांच्या मंत्रांनीं दीपांसह, उडीदांसह भाताचे बली द्यावेत.
नंतर अग्नीजवळ येऊन “ पूर्णाहुती ” पृष्ठ ७७ पासून ७८ पर्यंत सांगितल्याप्रमाणें ‘‘ समुद्रा० ” इत्यादि मंत्रांनीं पूर्णाहुति करावी.
नंतर “ प्रणीताविमोक ” म्हणजे पृष्ठ ५० प्यारा ३० “ ततस्तंडुल० ’’ येथून पृष्ठ ५२ प्यारा ३१ “ प्रोक्षेत् ” येथपर्यंत स्थालीपाकतंत्र करावे.
नंतर भुवनेश्वरी इत्यादिकांचें कुंभातील पाणी ग्रहांचे कलशांतील पाणी दुसर्‍या पात्रांत घेऊन त्यानें त्याच पाण्यांत असलेल्या पांच प्रकारच्या पल्लवांसहित दर्भ आणि दूर्वा ह्यांनीं नवीन वस्त्र नेसलेल्या यजमानावर आणि नवीन सादीं चोळी डाव्या बाजूस बसलेल्या ऋतुमती पत्नीवर ऋत्विजांसह आचार्यानें पुढील मंत्रांनीं अभिषेक करावा.
“ आपोहिष्ठा० ” हे नऊ ऋचांचे मंत्र, “ यएक० ” ह्या मंत्रानें, “ त्रिभिष्ट्वं० ” ह्या सात ऋचेचें सूक्तांनीं अभिषेक करावा तसेंच “ उभयं० ” “ स्वस्तिदा० ” “ त्यंबक० ” “ जातवेदसे० ” “ समुद्रज्येष्ठा इति० इत्यादि मंत्र पृष्ठ १७ ओळ ४ पासून २३ पर्यंतचे येथे म्हणावे. “ तमीशानं० ” “ त्वमग्ने० ” “ तमुष्टु० ” “ भुवनस्य पितरं० ” “ यातेरुद्र० ” “ यजाग्रत० ” “ इंद्रत्वां ”  इत्यादि मंत्रांनी तसेच “ सुरास्त्वां० पृष्ठ १८ ओळ १ ते १२ ” ह्या पुराणमंत्रांनीं यजमानावर व त्याच्या पत्नीवर अभिषेक करावा.
नंतर कलशांतील उदकानें आणि दुसर्‍या उदकानें उत्तम स्नान केलेल्या त्या दंपतीनें शुभ्रवस्त्र धारण करावें. चंदन लावावें. पुष्पमाला धारण करावी. अलंकार घालून होमाजवळ बसावें. पत्नीनें उजवे बाजूस बसावें. स्नान करून टाकलेली वस्त्रें आचार्यास द्यावी.
पृष्ठ ५२ प्यारा३४ “ तत:कर्ताग्ने: ‘ येथून पृष्ठ ५३ पर्यंत सांगितल्याप्रमाणें अग्निची पूजा विभूतिधारण वगैरे स्थालीपाकतंत्र संपवावे यजमानानें आचार्य इत्यादिकांची गंध, पुष्प, वस्त्र अलंकार इत्यादिकांनीं यथाशक्ति पूजा करावी. आचार्याला गाय द्यावी. ऋत्वि जांना आणि दुसर्‍या ब्राह्मणांना भूयसीदक्षिणा द्यावी. त्यानंतर ग्रहपीठ देवतांची, भुवनेश्वरी इत्यादिकांची उत्तरपूजा पंचउपचारांनीं करावी. “ यांतुदेवा० ” हा मंत्र म्हणून विसर्जन करावें आणि तें सर्व आचार्यास द्यावें. नंतर अग्नीची पूजा करून “ गच्छगच्छ० ” हा मंत्र म्हणून अग्नीचें विसर्वन करावें.
नंतर ब्राह्मणांनीं महाशांतीचें पठण करावें. ती अशी की, “ आनोभद्रा० ” हे दहा मंत्र, “ स्वस्तिनौ० ” हे पांच मंत्र, “शंनइंद्रा० ” हे पंधरा मंत्र, “ शंवती० ” हे पांच मंत्र, ‘‘ त्यमूष० ” हे तीन मंत्र आणि “ तच्छंयो० ” हे नऊ मंत्र हे मंत्र ऋग्वेदी ब्रह्मकर्मसमुच्चयांतील शांतिपाठांत पाहावेत.
नंतर यजमानानें नवग्रहाप्रीत्यर्थ ३ भुवनेश्वरी, इंद्राणी व इंद्र ह्यांच्याप्रीत्यर्थ प्रत्येकीं तीन तीन ब्राह्मणांना भोजन देण्याचा संकल्प करून ब्राह्मणांकडून आशीर्वाद घ्यावेत. आपल्या मित्रमंडळीसह भोजन करावें. अशा रीतीनें भुवनेश्वरीशांति करावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP