पत्नी कोणत्या बाजूस असावी
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
आश्वलायन - चूडाकर्म, उपनयन, विवाह, यज्ञकर्म या कार्याचे वेळी पत्नीने उजवे बाजूस बसावे. या व्यतिरिक्त कार्यास डावे बाजूस बसावे.
कन्यादान, वृषोत्सर्ग, पति व पत्नी संमुख असणे व अवक्षारण ही कार्ये बसून करू नये. उठूनच करावी.
पायधुणेचेवेळी, रथावर बसतेवेळी ऋतुकालाचे वेळी पत्नी डावे बाजूस असावी.
पायधुणेचेवेळी पत्नी डावीकडे असून तिने पाय धुण्याचे पाणी द्यावे. नांदीश्राद्ध, सोमयाग, मधुपर्क या कार्याचें वेळी उजवे बाजूस असावी.
यज्ञसंबंधी सर्वकर्मात पत्नीने उजवे बाजूस व आशीर्वाद घेतेवेळी, अभिषेकाचे वेळी डावे बाजूस बसावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP