मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
नारायणबलि प्रयोग

नारायणबलि प्रयोग

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


नदीच्या तीरीं, देवालय इत्यादिक पवित्रस्थानी नारायनबलि करावा तो असा - त्रिपुंड्र धारण केल्यावर शुभ्रवस्त्र धारण करून हातांत पवित्र धारण करून पूर्वेस तोंड करून बसावें. आचमन प्राणायाम करावा. देशकालाचा उच्चार करून माझ्या कुलाची अभिवृद्धि होण्यास प्रतिबंध करणार्‍या प्रेताचें प्रेतत्व नाहीसें होण्याकरितां नारायनबलि करीन असा संकल्प करावा. नंतर पूर्वादि चार दिशेस चार व मध्यें एक, असें पांच कलश “ महीद्यौ० ” ( पृष्ठ ८ ओळ २० ) इ० मंत्रांनीं स्थापन करावेत. नंतर त्यापैकीं प्रथम उत्तरेकडच्या कलशावर तांब्याच्या तबकडींत प्रानप्रतिष्ठापूर्वक सुवर्नाची विष्णुप्रतिमा स्थापन करून “ इषेत्वेजत्वा० ” या मंत्रानें आवाहन करून पुरुषसूक्ताच्या १६ ऋचांनीं षोडशोपचारांनीं पूजा करावी. नंतर त्याप्रमानेंच पूर्वेकडच्या कलशावर रुप्याची ब्रह्मप्रतिमास्थापन करून “ अग्निमीळे० ” या मंत्रानें आवाहन करून “ हिरण्यगर्भं० पृष्ठ २७९ ओ. १४ ” यानें पूजा करावी. पश्चिम कलशावर तांब्याची शिवप्रतिमा स्थापून “ अग्रआयाहि० या मंत्रानें आवाहन करून “ कद्रुद्राय० ” पृष्ठ १०५ ओ. १ यानें पूजा करावी. दक्षिणेकडच्या कलशावर लोखंडाची यमप्रतिमा “ यमायसोमं० ” ( पृष्ठ ६९ ओ. ८ ) या मंत्रानें आवाहन करून पूजा करावी. मध्यकुंभावर दक्षिनेस मुख करून अपसव्यानें दर्भमय प्रेताची स्थापना करून प्रानप्रतिष्ठा करावी. त्यांत विशेष ( अस्यांप्रतिमायां ) याठिकाणीं ( काश्यप० मूर्तौ ) असा उच्चार करून पृष्ठ ६१।६२ यात सांगितल्याप्रमाणें करावी. नंतर काश्यपगोत्राय देवदत्तप्रेताय विष्णुदैवताय आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि ” याप्रमाणें आसनादि षोडाश उपचारांनी पूजा करावी. नंतर सव्य करून ईशान्यदिशेस स्थंडिल करावें. स्थालीपाक पृष्ठ ३३ प्यारा १ पासून पृष्ठ ३७ प्यारा ६ पर्यंत नंतर पुरुषनारायणाला १६ वेळ चरूनें असा उच्चार करून पुढें स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ ते पृष्ठ ४६ प्यारा ३२ “ समप्रदेशेहत्वा ” पर्यंत करून चरूनें पुरुषसूक्ताच्या सोळा ऋचांनी नारायणाच्या उद्देशानें १६ आहुति द्याव्यात. नंतर पृष्ठ ४९ प्यारा २८ “ यदस्येति० ” येथून पृष्ठ ५३ प्यारा ३२ पर्यंत सर्व होम संपवावा. नंतर अपसव्य करून दहा पिंड द्यावेत; त्याचा प्रकार - विष्णूच्या पूर्वेस वेदि करून “ अयोध्या० ” या मंत्रानें लेप करावा. नंतर “ अद्येत्यादि० ” येथून “ करिष्ये ” येथपर्यंत म्हणून संकल्प करावा. नंतर उजव्या हातानें दर्भानें “ अपहता० ” हा मंत्रा प्रत्येक रेखेस म्हणून प्रथम दक्षिणबाजूकडून पश्चिमबाजू अशा रीतीनें १० रेखा काढाव्या व त्यावर पानी शिंपडून दक्षिणेकडे अग्रभाग केलेले दर्भ पसरावेत. त्यांवर अपसव्यानें दक्षिणेस मुख करून “ शुंधतां विष्णुरूपी प्रेत ” म्हणजे विष्णुरूपी प्रेत पवित्र होवो असें बोलून दहा जागीं उत्तरेकडून दक्षिणेकडे तिलयुक्त पानी पितृतीर्थानें दिऊन मधु व तूप ह्यांनीं भिजलेलें तिळयुक्त दहा पिंड “ काश्यप० ” हे काश्यपगोत्र देवदत्तप्रेत विष्णुदैवत हा तुझा पिंड असें बोलून दक्षिणेस तोंड करून दक्षिनाग्र असलेल्या दर्भांवर वांकड्या हातानें डावा ढोपा ( गुडघा ) खाली करून पितृतीर्थानें द्यावा. त्यावर तिलोदक द्यावें. नंतर काजळ, गंध, तुलसी, माका, फ़ुलें, वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य, फ़ल, तांबूल, दक्षिणा वगैरे उपचार वरील मंत्रांनी अर्पण करून तिलोदक द्यावे. नंतर “ तद्विष्णो० ” “ तद्विप्रा० ” “ प्रेतस्य० ” हे मंत्र म्हणून पिंडावर हात ठेवावा. नंतर सव्य करून “ अद्ये० ” येथून “ पुण्यतिथौ ” येथपर्यंत म्हणून अपसव्य करावें “ नारायणबलि० ” येथून “ नमम ” येथपर्यंत म्हणून पिंड समर्पण करून पिंडांवर गंधाक्षता वाहून सव्यानें विसर्जन करावेत. नंतर पुरुषसूक्तानें अभिमंत्रित अशा शंखोदकेकरून दर ऋचेनें प्रेताचें तर्पन करावें. विष्णु इत्यादि चार देवतांना बलि द्यावेत. पिंड नदींत सोडावेत. पवित्रें सोडून हातपाय धुवावेत.
दुसर्‍या दिवशीं मध्यान्हीं अथवा त्याच दिवशी आचमन करून पुन: पवित्रकें धारण करून दर्भासनावर बसावें. “ करिष्यमाण० ” असा उच्चार करून एक. तीन अथवा पांच क्षण देऊन ब्राह्मणांना श्राद्धाकरितां आमंत्रण करून आपण उपोषण करावें. दुसर्‍या दिवशीं मध्यान्हकाळीं पूर्वी स्थापन केलेल्या श्रीविष्णूची पूजा करून दर्भासनावर बसून पूर्वेस तोंड करावें. देशकालाचा उच्चार करून “ एवंगुण० प्रीत्यर्थं ” येथपर्यंत म्हणून अपसव्य करून “ करिष्ये ” म्हणावे विष्णु, ब्रह्मा, शिव, यम, प्रेत ह्यांच्या उद्देशेकरून एकोद्दिष्ट विधिनें पादप्रक्षालनापासून तृप्तिप्रश्नापर्यंत कर्म करावें प्रकार - “ नारायणबलिश्राद्धेपाद्यमु० ” हे म्हणून पाद्य द्यावें. या प्रमाणेंच आसन देऊन क्षणासमोर दक्षिणाग्र दर्भांवर अर्ध्यार्थ पांच द्रोण ठेवून त्यांत उदक घालून त्यांवर दर्भपवित्रकें ठेवावींत, त्यांत मुकाट्यानें तीळ टाकून “ ना० ब० श्रा० इदमर्ध्यंमु० ” म्हणून अर्ध्य द्यावे, गंध, तुलसी, माका, इत्यादि उपचार द्याव्या. नंतर घृतमिश्र अन्न घेऊन पाणिहोमाकरितां पांच आहुति अग्नींत द्याव्या. चटासमोर मंडळें करून त्यांवर पात्रें ठेवून अन्न वाढावें. त्या सभोंवतीं पाणी फ़िरवून अन्नास अंगुष्ठाग्रानें स्पर्श करीत होत्साता “ पृथिवीते० ” येथून “ उपतिष्ठतां ” येथपर्यंत म्हणून अपोशनार्थ उदक देऊन “ प्राणाय ” इत्यादि पांच मंत्र म्हणून “ सुखेनै० ” येथून “ तृप्तास्म: ” येथपर्यंत म्हणावे. नंतर अद्येत्या० करिष्ये. असा संकल्प करून रेखाकरणापासून उदकदानापर्यंत सर्व कर्म मुकाट्यानें करून सव्यानें विष्णु, ब्रह्मा, शिव आणि परिवारासह यम ह्यांचें नाममंत्रांनीं हे विष्णों हा तुझा पिंड अशा रीतीनें चार पिंड देऊन अपसव्यानें विष्णुरूपी प्रेताचें ध्यान करून हे काश्यपगोत्र देवदत्त विष्णुरूप प्रेत हा तुझा पिंड अशा रीतीनें पांचवा पिंड देऊन ( पूजनादि*प्रवाहणपर्यंतचें ) सर्व कर्म करून आचमन केल्यावर सर्व ब्राह्मणांना दक्षिणा इत्यादिकांनीं संतोषित करावें. त्या सर्वांमध्यें एका गुनवान् ब्राह्मणाला प्रेतबुद्धीनें वस्त्र, अलंकार, गाय, हिरण्य इत्यादिक देऊन हे ब्राह्मणहो प्रेताच्या उद्देशानेम तिलोदकांजलि द्या, असें त्या ब्राह्मणांना सांगावें, त्यांनीहि पवित्र हातांनीं दर्भं, तीळ, तुलसीपत्र ह्यांनींयुक्त उदकांजलि काश्यपगोत्री विष्णुरूपी प्रेतास द्यावी. नंतर ह्या नारायणबलि कर्मानें श्रीभगवान् विष्णु ह्या देवदत्त प्रेताला शुद्ध आणि पापरहित व कर्मास योग्य असा करो असें त्या ब्राह्मणांकडून बोलवून त्याचे विसर्जन करून मग स्नान करावें. आणि भोजन करावे. नंतर एकोद्दिष्टश्राद्धप्रयोगोक्त पिंडोत्थापनादिश्राद्धसांगतासिध्यर्थं गोप्रदान करावें. “ अद्येत्या० ” “ नारायण० करिष्ये ” असा संकल्प करावा. “ यज्ञसाध० ” हा मंत्र म्हणून हे गोप्रदान अथवा ह्याचें निष्क्रयीभूत द्रव्य अमुक गोत्राच्या अमुक नांवाच्या ब्राह्मणास देतो. “ प्रतिगृह्यतां ” म्हणावें. ब्राह्मणानें “ प्रतिगृह्णामि ” असें म्हणावें. श्रीमहाविष्णु संतुष्ट होवो म्हणून पाणी सोडावें. असा नारायण बलिप्रयोग संपला.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP