मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला| अक्षतारोपण सार्थ षोडशसंस्काररत्नमाला संस्कार क्रम संस्कारांचीं फले संस्काराची परिभाषा पत्नी कोणत्या बाजूस असावी गणपति पूजनविधि पुण्याहवाचनाची कारिका पुण्याहवाचन प्रयोग मातृकापूजन नांदीश्राद्ध कर्मांगदेवता मंडपदेवताप्रतिष्ठा कर्मविशेष अग्नींची नांवे कुंडमंडप वेदीलक्षण यज्ञपात्रांचा आकार व त्यांची प्रमाणें कुंडसंस्कार स्थालीपाक तंत्र ग्रहयज्ञ करण्याची अवश्यकता ग्रहयज्ञसंकल्प आचार्यवर्ण पंचगव्याविधि भूमिप्रोक्षण अग्न्युत्तारण प्राणप्रतिष्ठा ग्रहस्थापना बलिदान पूर्णाहूती अभिषेक श्रेयसंपादन नवग्रहांची दानें विनायकशांतीचा विचार विनायकशांति करण्याचा विधि गर्भाधानसंस्कार निर्णय गर्भाधानाच्या मुहूर्ताचा निर्णय गृह्याग्नीचा पुन: संधान प्रयोग भुवनेश्वरीशांति प्रयोग गर्भाधानसंस्कार विधानम् गर्भरक्षणाचा प्रयोग गर्भपात होण्याची कारणें वंध्यत्वदोष परिहार अनपत्यत्व दोष निवारण संतति वाचत नसेल तर वांचण्यास उपाय वंध्यास्त्री पुत्रवती होण्याचा प्रयोग पुंसवन अनवलोभन व सीमंतोन्नयन संस्कारांचा निर्णय पुंसवनाचा संस्कार अनवलोभनाचा संस्कार सीमंतोन्नयनाचा संस्कार गर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतो गर्भिणी पतीचे धर्म सुखाने प्रसूत होण्याचा उपाय जातकर्म संस्काराचा निर्णय जननशांतिसंबंधी विचार कन्येच्या संस्काराचा विचार जातकर्म संस्कार षष्ठीदेवीची पूजा नामकरण संस्काराचा निर्णय नामकरणाचा संस्कार बालकास पाळण्यांत घालण्याचा विधि दूध पाजण्याचा विधि कर्णवेध ( कान टोचणे ) संस्कार बाळंतिणीनें जलपूजा करण्याचा विचार बालकाला दुष्टदृष्टि दोषादिक झाले असतां त्याचा रक्षाविधि सूर्यावलोकन व निष्क्रमण संस्काराचा निर्णय सूर्यावलोकन कटिसूत्र बांधणे आणि भूमिवर बसविणे संस्कार - निर्णय अन्नप्राशनाचा संस्कार प्रथम केशकर्तन ( जावळ ) निर्णय वर्धापनाचा ( वाढदिवसाचा ) निर्णय वर्धापन ( वाढदिवसाचा ) संस्कार पुंसवनादिचौलांत संस्काराचा लोप झाला असतां प्रायश्चित्त होम गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंत संस्कार अक्षरारंभाचा निर्णय अक्षरारंभ संस्काराचा विधि रजोदोषाचा विचार श्रीपूजनादिशांति शिखा ( शेंडी ) विचार चौल संस्काराचा निर्णय चौलकर्म संस्कार प्रयोग उपनयनसंस्काराचा विचार उपनयनसंस्काराचा निर्णय. उपनयनाचा काल उपनयनाच्या पूर्वी करावयाचे उपनयनाचा प्रयोग अनुप्रवचनीय होम मेधाजनन मंडपदेवतांचें उत्थापन ( देवदेवक उठविणें ) चार व्रतांच्या संस्काराचा निर्णय सांगवेदाध्यानाचा प्रकार सांगतो ब्रह्मचारीव्रतलोप प्रायश्चित्ताचा प्रयोग समावर्तन ( सोडमुंज ) संस्काराचा निर्णय समावर्तन ( सोडमुंजीचा ) संस्कार विवाहसंस्कार निर्णय विवाहाविषयीं मंडप वेदी इत्यादिकांचा निर्णय वाग्दान ( वाङनिश्चय ) प्रयोग सीमांत पूजनाचा प्रकार विवाहाच्या पूर्वीचें कृत्य व मंडापदेवताप्रतिष्ठादि वरानें वधूच्या घरी प्रवेश करण्याचे विधि मधुपर्काचा विधि गौरीहराची पूजा वधूवरांचे परस्पर निरीक्षण कन्यादानाचा विधि अक्षतारोपण विवाहहोमाचा प्रयोग गृहप्रवेशनीय होम ऐरिणी ( वंशपात्र ) दान वधूसह ग्रहप्रवेश व लक्ष्मीपूजन देवकोत्थापन व मंडपोद्वासनाचा विधि औपासननामक सायंप्रातर्होमाचा निर्णय सायंकालीन औपासनहोमाचा प्रयोग प्रात:कालीन औपासनहोमाविषयी विशेष अग्निसमारोपविधि अग्नि सिद्ध करणें नववधू गृहप्रवेशाचा निर्णय द्विरागमन कन्यावैधव्ययोगनाशक उपायांचा निर्णय कन्येचा वैधव्ययोगपरिहार करणारे विधान मृतभार्यात्व दोष जाण्यास उपाय दुसर्या व तिसर्या विवाहाचा निर्णय अर्कविवाह प्रयोग दत्तकग्रहण विचार दत्तपुत्रविधान पुत्रकामेष्टि प्रयोग नारायनबलीचा व नागबलीचा मुहूर्त निर्णय वीरभोजनविधि नारायणबलि प्रयोग नागबलि प्रयोग सर्वप्रायश्चित्त प्रयोग संस्कारप्रयोगांतर्गत याज्ञिकसाहित्य साहित्यांतील पारिभाषिक शब्द अक्षतारोपण ‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे. Tags : poojasanskarvidhiपूजाविधीसंस्कार अक्षतारोपण Translation - भाषांतर एका पात्रांत दूध व तूप एकत्र घ्यावें. दुसर्या पात्रांत ओले पांढरे तांदूळ घ्यावें. वधूवरांनीं आपले हात धुवावें. वरानें वधूच्या ओंजळींत दूधतूप एकत्र केलेले हाताच्या दोन अंगुलींनी: २ वेळां चोपडून २ वेळां तांदूळ घालावेत. वरून २ वेळ दूधतूप घालावें व तो वधूचा अंजलि तसाच असूं द्यावा. त्यानंतर वराच्या ओंजळींतही अशाच रीतीनें दोनदा दूधतूप मग तांदूळ व फ़िरून दोनदा दूधतोप दात्यानें अथवा दुसर्या कोणी करावें. नंतर दात्यानें त्या दोघांच्या ओंजळींत सुवर्ण घालावें आणि वधूच्या ओंजळीवर वराची ओंजळ ठेवून “ कन्यातारयतु ” इत्यादि ६ मंत्र म्हणून वधूला उठवून तिच्याकडून ओंजळींतल्या अक्षता “ भगोमेका० ” हा मंत्र म्हणवून वराच्या मस्तकावर टाकवाव्यात. नंतर वरानें आपल्या ओंजळींतल्या अक्षता “ यज्ञोमेकाम:० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्यात. अशा रीतीनें दोघांनीं पुन: दोन वेळां करावें. त्यामध्यें दुसर्या वेळेस वधूनें “ श्रियोमेका० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर अक्षता घालाव्या आणि वरानें “ धर्मोंमे० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्या. तिसर्या वेळेस वधूनें “ प्रजामे० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर घालाव्या आणि वरानें “ यशोमे० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्या. नंतर पूर्वी प्रमाणेंच कन्येकडून वराच्या ओंजळींमध्यें दोन वेळां एकत्र दूधतूप चोपडून त्यांत दोन वेळां तांदूळ घालावेंत आणि त्यांवर दोन वेळां अभिघार करावा. नंतर दात्यानें अथवा दुसर्या कोणी पूर्वीप्रमाणें कन्येची ओंजळ भरली असतां दात्यानें पूर्वीप्रमाणें तीत सोनें घालून वराच्या ओंजळीवर कन्येची ओंजळ ठेवून पूर्वीप्रमाणें “ कन्यातारयतु ” इत्यादि ६ वाक्यें बोलावींत. नंतर वरानें “ यज्ञोमेका० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर अक्षता घालाव्या आणि वधूनें “ भगोमेका० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर घालाव्या. असें पुन: दोन वेळां बोलावें. त्यामध्यें दुसर्या वेळेस वरानें “ धर्मोमे० हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्या. आणि वधूनें “ श्रियोमे० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर घालाव्या. तिसर्या वेळेस वरानें “ यशोमे० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्या आणि वधूनें “ प्रजामें० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर घालाव्या. नंतर वरानें वधूच्या अंजलींत पूर्वीप्रमाणें अक्षता भरून्ब आपली ओंजळ दुसर्याकडून भरव्वून दोघांनींही अगोदर वधूनें व मग वरानें अशा रीतीनें मंत्र न म्हणतां अक्षतां टाकाव्यात. नंतर वरानें आपल्या मस्तकावरील एक फ़ूल घेऊन तें दूध व तूप मिश्र केलेल्या पात्रांत भिजवून त्याच्या योगानें कन्येच्या कपाळावर एक तिलक करावा. तिनेंही आपल्या मस्तकावरील फ़ुलानें तशाच रीतीनें वराच्या कपाळावर तिलक करावा आणि फ़ुलाची माळा वराच्या गळ्यांत घालावीं. वरानेंही वधूच्या गळ्यांत माळा घालावी.मंगलसूत्र - बंधन :- नंतर वरपक्षाकडील सुवासिनींनीं वधू आणि वर ह्या ह्या दोघांना पूर्वेस तोंड करून बसवावें. आणि शिष्टाचाराप्रमाणें अष्टापुत्री नांवाची दोन वस्त्रें आणि कंचुकी म्हणजे चोळी, काळ्या मण्यांचें मंगलसूत्र वधूला अर्पण करून, एक वस्त्र नेसवून अंगांत चोळी घालवावी व दुसरें वस्त्र अंगावर पांघरण्यास द्यावें. नंतर वरानें आपल्या हातांत तें मंगलसूत्र घेऊन “ हे पतिव्रते, हें मंगलसूत्र भर्त्याच्या ( माझ्या ) जीवनाचें कारण आहे, म्हणून हें सूत्र हे सुभगे मी तुझ्या गळ्यांत बांधतो; ह्यामुळें तूं शंभर वर्षेपर्यंत जीवंत रहा. ” असा मंत्र बोलून इष्टदेवतेचें स्मरण करीत करीत तें सूत्र वधूच्या कंठांत बांधावें. “ आयुष्यवर्चस्यं० ” या सूक्ताच्या* “ भूषणधारणमंत्रांनीं ” वधूला दागिने घालावेत. नंतर विवाहव्रताची निर्विघ्नता होण्याकरितां वधूवरांनीं “ गणानांत्वा० ” या मंत्रांनीं एका पात्रांत हळकुंडे, पांच सुपार्या, ठेऊन श्री गणपतीचें पूजन लाडू इत्यादि षोडशउपचारांनीं करावें. पुन: पूर्वी सांगितलेल्या मंत्रांनीं पूजा केलेल्या सुपार्या दंपतीचे अंगावरील वस्त्राचे पदरांत निरनिराळी गांठ देऊन बांधाव्या. नंतर उपाध्यायानें “ नीललोहित० ” ह्या मंत्रानें त्या निरनिराळ्या दोन्ही गांठीं एकेठिकाणीं बांधाव्यात. नंतर दात्यानें भार्येसह वृद्ध सुवासिनी आणि आप्त ज्ञातिबांधवांनीं वधूवराच्या कपाळीं ओल्या अक्षता लावाव्या व उभयतांस आशीर्वाद द्यावा. ( ह्या ठिकाणीं कौस्तुभ व प्रयोगरत्नामध्यें महालक्ष्मी, पार्वती, शची यांचें नाममंत्रानें षोडशोपचार पूजन करून त्या देवतेच्या संतोषार्थ वधून सुवासिनी स्त्रियांस वायनें द्यावीं असें सांगितलें आहे. ) नंतर वधू आणि वर ह्यांनीं एकमेकांचे हात धरून मंडपांतील वेदीवर मंत्राच्या घोषासह जावें N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP