मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत होनाजी बाळा

संगीत होनाजी बाळा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(२२-४-१९५४). संगीत : हेमंत केदार


श्रीरंगा कमलाकांता हरी पदरातें सोड ॥धृ०॥
आम्ही वृजवासी नारी । जात असों कीं बाजारीं ।
अहो कान्हा मुरारी । अडवितां कां कंदारीं ।
मथुरेच्या बाजारीं । पाहूं मजा हो गिरिधारी ।
विकूनी नवनीत दधी गोड । श्रीरंगा ॥
ऐका लवलाही । गृहीं गांजिती सासुबाई ।
परतुनिया पाही । येऊं आम्ही ईश्वर ग्वाही ।
यान देऊन कांहीं । मन जाऊ आपले ठायीं ।
पतीभयानें देहरोड । श्रीरंगा ॥
विनवुनी कृष्णासी । शरणागत आल्या दासी ।
आणल्या गोपी महालासी । होनाजी राजासी ।
मती आगळी कविरायाची । धोंडी सदाशिव जो । श्रीरंगा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP