मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत लयाचा लय

संगीत लयाचा लय

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१५-१०-१९२०). संगीत : वझेबुवा

१ (बहार : एकताल)
पिता मानिता नाथा । वरिलें या पदा
मिटवा आता वाद हा ॥धृ०॥
सुखभागी तुम्हा संगी । असु तनुजा पितयाला
आपुल्या गृहा न्या तिला ॥१॥
१७१ (चाल : लहु आँखोंसे हम अपना)
ललना लाडकी रुसली, रडाल ना ? बोला ॥धृ०॥
चंद्रिका खिन्न पाहे । चंद्र मणीही, शोके हा
हांसत नाहीं, शोके । भागला हांसता
हंसणार कुणाला बोला ॥१॥

२ (चाल : पिया मिलन हम जाय)
तुला गणिल पति काय ? बावरे ॥धृ०॥
माया ममता तया । निज सुखी वाटे । जननि परकी सदा अपाय ॥

३ (चाल : माने नाही सैया)
जाणे आई माया । सुता तिची काया ॥धृ०॥
भिन्ना जरीं देहे आहे । जगाला दिसाया ॥१॥
तोडी कुणी ऐसा मोहा । सुखाच्या रडाया ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP