मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत वीरतनय

संगीत वीरतनय

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१८९६). संगीत : खुद्द नाटककार

१ (राग : झिंजोटी, ताल : धुमाळी)
अंकित पदांभुजाची दासी । गुण गुणी लुब्ध मृगीसी ॥धृ०॥
ज्या दुष्टाने कारागृहि या कष्टविले देहासि
नरवेषाने येउनि तिने । वंचियले तुम्हासी ॥१॥

२ (राग : मालकंस, ताल : दीपचंदी)
तुझी अन्यथा ती कराया कृती । अम्हा मानवांची मुळी न गती ॥धृ०॥
अनंता अहोरात्र तारारती । त्वदाज्ञेसि नमी शिरी मानिती ॥१॥
दयाळा, सुविश्वास तुझ्यावर । सदा ठेउनि साधु ते राहती ॥२॥

३ (चाल : जो नेक होके कोइ दिल आजार)
किती कोमलतनु तनुलतिका याचि मोहिका
दर्शन किति याचे हे देतसे सुखा ॥धृ०॥
वक्षस्थलि हे रुळती । केश घन स्वैरगति
मन मोहे निष्कपटा पाहुनी मुखा ॥१॥
कंप सुगात्रांसि सुटट । खिन्न मुख खिन्न होत
स्थिति दीना झाले याचि भीति मूलिका ॥२॥

४ (राग : पूरिया, चाल : बारि कर तू मोहे रहेम)
पुनरपि नयना ती तनुलतिका । गोचर होईल का
मंजुवचे रंजवील मन का ॥धृ०॥
तत्विंतनि जे नयनांतरि या अंबु निघे ते चुंबुनिया
का देईल सुदति सुखा ॥१॥

५ (चाल : नजरिया मिलाये जावो)
अशि ही सुगुणखनी देह त्यजोनी ॥
जगि या दिसोनी न येइल कोणी ॥धृ०॥
शरच्चंद्र अति निर्मल जैसे शोभवि तारागार
विमल देही शुद्ध आत्मा तेंवि करित सुविहार
निरखोनी विदेही आत्महीन होई ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP