मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत पट वर्धन

संगीत पट वर्धन

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१९२४). संगीत : गोविंदराव टेंबे


प्रेम हे नितांत तुझे । केवि बानु मी अबला ।
की श्रुति ही विविध वदें स्तवुनि शिणली बा तुजला ॥धृ०॥
संकटि भार घेसी भक्तांचा राया ।
शिशूपाणीं जासि भुक्या दीन धेनू चाराया ।
अससि सज्ज सदा प्रबल शत्रू माराया । तुजला काय कठिण
द्रौपदिसी ताराया ।
गोवर्धनासि सावरूनी अंगुली दावि तव लीला ।
उद्धार हेतु धरुनि मनीं मम वसन वेष्टित तिजला ।


तारिणी नववसनधारिणी वात्सल्य ह्र्दयि धरुनी
करिसि दया स्वजनी ॥धृ०॥
तळमळे अवघी प्रजा । उत्सवी मग्न राजा । साधितो शकुनी काजा ।
वैरि धर भरिती स्वैरगती रमति । प्रजा जन फिरती रानी ॥
भूषविसि राज्ञी हरुनीया दीनापदा ॥
होसि आदर्श सकल स्त्रीजना । स्वजनहितकारिणी ॥


मितभाषिणी तीच कुलकामिनी । गृहिणी ।
रुचिर वय वदुनि भूषवि । स्वकुल कुलाचार राखोनी ॥धृ०॥
केवि मिळे त्या जनी मान्यता । अविनय ज्या वरिती वाक्यपटुता
कुलकलंकिनी ठरती वनिता । मिरविती सदाचार सांडोनी ॥


वैरी भुजंग विषारी । मुरारी कोण तुजविण सांग निवारी ॥धृ०॥
द्युतपाश पसरी दुर्योधन । त्यात पांडव अविचारी ॥
निंद्य मार्ग जरि नृप आक्रमिती । प्रजा सकलही तो स्वीकारी;
अधं बिचारी ॥


शांतवा हो मानसा । क्षोभ वाया करितसा ।
उमटला का मनि ठसा । द्युत लाविन गळफासा ॥धृ०॥
कां तृप्त झाली लालसा । डौल मिरवुनी राजसा ।
केवि सुचली अवदशा । धि:करले सदुपदेशा ॥


मधुसूदना हे माधवा । हे चक्रपाणी सुरम्य सुदर्शन
सूर्यसुधाकर लोचना ॥धृ०॥
वसना विणोनी शिणल्या सुरामा ।
सति रुक्मिणी ही तशी सत्यभामा ।
तव सिद्ध जाया मम रक्षणा । वैरी करिल तरि कृष्ण वदना ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP