मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत एक होता म्हातारा

संगीत एक होता म्हातारा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(५-९-१९४८) संगीत : मास्तर कृष्णराव


ये झणिं ये रे । येरे । माघारी ॥
क्षणभर वळुनीं, बघ मम नयनीं, मूर्ति अपुली ।
कुठवर एकलि वाट पाहू । तुजविण राहू ।
विसरुनि जाशिलही । नवथर प्रीत खुळी ।
जा घेउनिया सांगाती रे हे मन वेडें ॥धृ०॥
तळमळले नयन तुझे जरि । मजला कधी पहाया ।
सुखविन तुजला । नकळत रे राया । येउनिया
स्वप्निं तुझ्या सखया ॥


छंद तुझा मजला । कां मुकुंदा लावलिया ॥
अशी कशी रे मी । भुललें सांग तुला ॥
संसारी माझ्या । माझ्या
येउनि कां ऐसा । ऐसा
केला घात पुरा पुरा । पुरा पुरा ।
कां असा रे घननीळा ॥धृ०॥
कशासि झाले सासुरवाशिण ।
उठता बसता तुझेच चिंतन ।
कुणा म्हणू रे मम स्वामी । मम स्वामी ।
नकळे मी । जोंवरिं तू मनि माझ्या ॥


नाच ह्रदया आनंदे । मिरवित अपुले भाग्य हें ॥
शुभदिन मंगल हा ।
उधळित आला । अमर सुखाला ।
दशदिशा अहा फुलल्या ॥धृ०॥
उडूनिया देव लोकी । जाउनी सांगा सकलांना
भाग्यवंत जगिं आज कोण मज ऐशी ।
सांगा । त्रिभुवनिं देवा ॥


हांस, हांस रे । ह्रदया, तुज केवि हांसवू ? ॥
गाऊ कुणा संगीत मी ।
हांसू अतां कुणा सवें मी ।
तुज आता कसें आळवू ? ॥धृ०॥
सरलें सुख काय आज रे । प्राक्तनि अपुल्या ॥
उधळलि पूजा माझी । प्रीतिची कुणी रे ।
नकळे तुज केवि शांतवू ? ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP