मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत दुरिताचे तिमिर जावो

संगीत दुरिताचे तिमिर जावो

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(३१-१-१९५७). संगीत : भालचंद्र पेंढारकर


आई तुझी आठवण येते
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळिज कालवतें ॥धृ०॥

वात्सल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
ह्रदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते ॥

तुजविण आई जगीं एकटा पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगू, काळीज तिळमिळ तुटतें ॥

हांक मारतों आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येते ॥

सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरू पहा मनाचें, जागीं तडफड करतें ॥

नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें माते ॥


तूं जपून टाक पाऊल जरा । जीवनातल्या मुशाफिरा ॥धृ०॥

हवें तुला तें नच तुजपाशीं । मिळे न तें का व्यर्थ धुंडिशी
गांठ अखेरिस यमाबरोबर । भुलूं नको हा मंत्र बरा ॥

पापपुण्य जें करशिल जगतीं । चित्रगुप्त मागेल पावतीं ।
पापाइतुकें माप ओतुनी । जे केले ते तसें भरा ॥

जीवन सुखदु:खाची जाळी । त्यांत लटकले मानव कोळी
एकाने दुसर्‍यास गिळावें । हा जगाचा न्याय खरा ॥

अथांग सागर अवतीं । सौख्य शोक दो तीरावरती
तुला हवें जें तया दिशेनें । उचल टाक पाऊल जरा ॥

चौर्‍यांशींच्या पडण्या गांथी । बालक होतिस जरठ शेवटीं
तारुण्याच्या उन्मादानें । विसरतोस का तुझी जरा ॥

हवास तोंवर तुला जवळतील । गरज संपतां दूर लोटतिल
ओळखून ही रीत जगाची । रहा जवळ लांबून जरा ॥

दानव जगा मानव झाला । देवाचाही दगड बनवला
कोण कोठला तूं तर पामर । चुकून तुझा करशील चुरा ॥

निरोप जेव्हां येईल वरचा । तेव्हा होशिल सर्वांघरचा
तोंवर तूं या रिपु जगाचा । चुकवुनि मुख दे तोंड जरा ॥

मृगजळ सगळें तुझिचा पुढती । तहानेला तूं मागुती ।
पाण्यांतच तू पाण्यावांचून । व्याकुळ रे होशील पुरा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP