मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत द्रौपदी

संगीत द्रौपदी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


१९-१२-१९२०


(राग : हमीर, ताल : त्रिवट, चाल : धीट लंगरवा)
थाट समरिचा दावी नट साचा; परि येतां
मग काळ करणिचा, लागतो नाट ॥धृ०॥
स्वयंवरा मम नटवा आला; सोंग सजविलें,
धनुला धरिलें, मत्स्य दिसेना, बाण चढविना;
जय पावेना हा थयथयाट ॥१॥


(गज्जल-जिल्हा खमाज, चाल : मै फक्त एक नहि)
धर्ममय ही काया, धर्म हा विजया पाया;
बुडतां तो नासवितो शूर वीराची विद्या ॥धृ०॥
पांडव हा, कुरु हा तुल्यबली सकला;
परि घाली कमला लोटांगण धर्माला ॥१॥


(राग : भूप, ताल : आध्वा, चाल : झांझ मंदिरवा)
लाजविलें वैर्‍यांना, उरेना कामना ॥धृ०॥
सदा आनंद मला, सुखाला संपूर्णाला सेवित आलें;
न्य़ून भासलें, नाहीं देखिलें रिपुविडंबना


(राग : जयजयवंती, ताल : झपताल, चाल : अचल रहो राज)
नयनीति ही नाहीं; बंधूसि व्यसनीं देखोनि स्वस्थ मन राही ॥धृ०॥
जो कौरवजनां, तो पांडवांना न्याय पाही ॥१॥


(गज्जल : पहाडी, चाल : देखके दीदार)
पांडवा सम्राटपदाला पोंचविता तो जाहला;
भक्तिचा हाचि हात माझा महापुष्पें सजविला ॥धृ०॥
कंस पापी तो जरासंध परमसाहसें मारिला;
उपभोगाची वेळ येतां स्वार्थत्यागी राहिला ॥१॥


(राग : देसकार, ताल : त्रिवट, चाल : जागो जागोजि)
पुरुषासि स्त्री ज्ञानमाला;
सुखद समय, अशुभ समय, भेद कळे सहज तिला ॥धृ०॥
पुरुषवपुसि अर्पी शौर्याला,
लोकीं बहु दिन सुखविलास-फळ मिळवी अबला ॥१॥


(राग : पहाडी, ताल : खेमटा, चाल : करोना कोई)
विराट ज्ञानी कोंदटला सुमनीं ॥धृ०॥
सुमन रेणु चराचर भुवनीं,
परि तें कृष्ण जाण;
कणकण असे महाजन,
कारण मागेल उभा धनी ॥१॥


(राग : बागेश्री, ताल : त्रिवट, चाल : अपराध क्षमा करुनिया)
ठरला जणु मत्सर राजा; वृद्ध तरुण बांधिती पूजा ॥
होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोड सुखलीला,
सह्य तरिच परि विभव मनाला, हाहि नियम विलया आजि गेला ॥१॥


(राग : जिल्हा पहाडी, ताल : खेमटा, चाल : गुरु दीन दयाळ)
लढवूं गुरुला रणीं नका ।
बोधामृतासि पसरावयासि व्हावे कां बोध नेमका ॥१॥

१०
(राग : सोहनी, ताल : त्रिवट, चाल : मधुरानना)
गमली मना, निज सावली भूतावली ॥
अशुभ नाना नव कल्पना भयचकिता जवळीं ॥१॥

११
(राग : भीमपलास, ताल : झपताल, चाल : भरन लगी)
न रणभूमि न विलसन, एकावरी प्रेम धरि कुरुजन ॥
समप्रीति जरि ख्याति, नातें भगिनींचे तुझें साचे, करि मनन ॥१॥

१२
(राग : जिल्हा खमाज, ताल : झपताल, चाल : आज आनंद मुखचंद्र)
हा हिणवाल जरि फार ना दिसे संसार पार ॥
लांबला आनंद सुखविता दमला; आधार गेला सुखा मुकला ॥१॥

१३
(राग : सिंध काफी, ताल : धीमा ताला, चाल : मदकी भरी)
तळमळिला चळवळ बोला; कळकळीची ही लीला ॥
उत्कट तो उसळत उठला निज परिवारी पसरत पडला ॥१॥

१४
(राग : बिहाग, ताल : त्रिवट, चाल : ना देरे तन तदेरे ना)
मुदित सवत नच या काला : हंसली गदा न : कसली फुगली
समरी बलधर वीरांचा कर हिज दावी
अरिवर विनाश; हा खरा उपचार, शोभवी फार अबला ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP