मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत पुण्यप्रभाव

संगीत पुण्यप्रभाव

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


७-६-१९१६
संगीत : किर्लिस्कर नाटय मंडळीचे नट आणि हिराबाई पेडणेकर


वाजिव रे बाळा । वेल्हाळा । रुमझुम घुंगुरवाळा ॥
अस्फुट विश्वाचे । प्रेमाचे । गाणे आनंदाचे ॥
वदलो जे नादीं । संवादी । तुझिया जन्मा आधी ॥
पहिल्या प्रीतीचे । गमतीचे । काहीसे भीतीचे ।
बाळा ते बोल । तूं बोल । आज मनी जे खोल ।
रात्रीच्या काळी । जों बसली । ब्रह्मानंदी टाळी ।
मनी तेव्हां बाणे । जे गाणें । अस्फुट मंजुळवाणे ॥
धीर न परि ह्रदया । उघडाया । उघडपणे ते गाया ॥
ह्रदयी खळबळले । दरवळले । विना ऐकिल्या कळले ॥
गाणे मंजुळ ते । झुळझुळते । तुझिया वाळ्या भवते
बाळा हालूं दे । बोलूं दे । आनंदे डोलूं दे ॥
एकच पायाचा । वाळ्याचा । नाच गोड बाळाचा
ऐकूनि आनंदे । त्या छंदे । घर सगळे नाचू जे ॥


(चाल : आनपरी दरबार)
नाचत ना गगनांत । नाथा । तारांची बरसात ॥धृ०॥
आणित होती । माणिक मोती । वरतुनी राजस रात ॥१॥
नाव उलटली । भाव हरपली । चंदेरी दरियात ॥२॥
ती ही वरची । देवा घरची । दौलत लोक पहात ॥३॥


(चाल : बोल मोरे राजा रे)
बोल ब्रिजलाला काही हंसुनी बोला । भ्याले जनाला ।
भ्याले जनाला । सुटला माझा तोल ॥ बोल० ॥
करी उरि धडपड रहा मनिच तू ।
हांसुनि भिरभिर वदनयनांनी नवलखाचा बोल ॥ बोल० ॥


(चाल : अजि अक्रूर हा नेतो)
निज बाळा रे गाणे गाते आई । करि आता जो जो गाई ॥
तुज जन्म दिला त्यांची स्वारी । लाखात शिपाई भारी ॥
बघ गरदी ही बुरुजाची तुजभवती । दगडांची त्यांची छाती ॥
कळिकाळाशी झगडणार खंबीर । हे तुझेच हिरवे वीर ॥
जीवांच्या जळत्या जोती
आकाशी तारा होती
मोलाची माणिक मोती
त्या डोळ्यांनी देवराया तुज पाही । करि आतां जो जो गाई ॥१॥
दो दिवसांची ही दुनियेची वसती । सारखीच असती नसती ।
तुज ऐसा हा बाळ नऊ नवसाचा । हातचा कि रे जायचा ॥
हे देवाघरचे लेणें
नशिबाने देणे घेणे
कुणीतरी कुणास्तव रडणे
ती रडणारी रडतील धाई धाई । करि आता जो जो गाई ।


(चाल : रंग उडावत ले)
रंग अहा भरला । सुबक भला । नाचत चंचल हा वरवरला ॥धृ०॥
भुलवुनि खुलवुनि हांसत खेळत । भारुनि केले गुंग जिवाला ॥१॥
हंसबी फसवी नटवी माया । शोभत वाई ज्याची त्याला ॥२॥
बांधुनि नजरा जादुगारा । दाखविता हा खेळ कुणाला ॥३॥


(चाल : जो पिया आये ना)
चतुरा चातुरी । तुमची न्यारी । भुलावणी खरी खुरी ।
परि भारी । जिव्हारी । दुधारी सुरी ॥धृ०॥
भोळा भाव भुलाया टाकुनिया फासा ।
केला डाव असा अवचित का हो खासा ।
हा देव पावला आज कुणाच्या नवसा ।
रुसला कान्हा काय जिवाच्या रासा ।
तुटली सारी । का दिलगिरी । इतक्यावारी ॥१॥


(चाल : डालन मेंडे)
हालत वाते मृदुशांति । ही जी । भासे हांसे की चंद्रलोक तनुलकांति ॥धृ०॥
दशदिशा पुष्पपरागे दरवळुनि हंसत जणु असती ॥१॥


(चाल : पाणी दादुरवा)
करा करुणांमया क्षमा । विषमा जरि गमे कृति हतकामा ।
तरि सुखधामा सुपरिणामा ॥धृ०॥
क्षणचि ह्र्दय भरता विकारी मोदभरे तव कृति न स्वीकरी विसरूनि ते,
अघ हे सहाया दे या शमा ॥१॥


(चाल : पियाके मिलनकी)
जिवास नसुनि हा घाय । दयाघना । घडि घडि छळित कसा
अजुनी रुजत ना । ह्रदय करिल हे काय ॥धृ०॥
निकटि न तान्हा । फुटला स्तनि पान्हा ।
आतां होई निरुपाय । नावरे मना ॥१॥

मंगलचरण
(चाल : सरस सीस मुगुट मोर)
प्रभुपदास नमित दास मंगल मात्रास्पदा । वरदा सदवनि लव
यदवलंब विलंब न करि हरि दुरिता सौख्य वितरि ॥धृ०॥
सारस्वत-चरण-कमल- । दलि विहरत कविमंडल ।
दुर्लभ ते दिव्य स्थल । पंकनिरत । राम रमत । धन्य तरी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP