मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत नेकजात मराठा

संगीत नेकजात मराठा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.(राग : भीमपलास, ताल : झपताल)
किती अधम गांजी जरी । देशसुत मान्यवर ।
कामिनिस तोचि खल ॥धृ०॥ वांछि रति कांचना ।
पात्र पति लांछना । नच सौख्य शांति या तेवि गरल ॥


(राग : भूप, ताल : त्रिवट)
रति रमणा झुलवि फुलवनांत । हरवित पणांत ।
हंसे-रुसे-फसे । लपुनि नवरसांत ॥
उचित काली सखि आर्या । प्रीतिसुमन गुंफुनिया ॥
सुहास्य वाहि जनांत ॥


(राग : जयजयनट, ताल : झपताल)
तव काय हा पाश । भ्रमतां आकाश । मधुपा कामुकास ।
भुलवित अभिलाष । वदनि या जलभास ॥धृ०॥
हा भुलत त्यास । तव श्वास मधुहास । रसिकास करि दास ॥


(राग : गारा, ताल : केरवा)
या जिवलगा कुणाच्या लीला । खुलविला अनुराग कशाला ॥धृ०॥
वेधि गडे शर तव ह्रदयाला । मजवरि आळ न घाला ॥


(राग : कानडी-काफी, ताल : त्रिवट)
ना तुलना तव वचना । सफलता फुलता नता ललना ॥धृ०॥
मानिता मम भावना । त्यागिता इतरे जना ।
रवि किरण प्रखर तर विपुनि जात तव वदना ॥


(राग : बहार, ताल : त्रिवट)
कृतांत कां न वांछि या नरांतका । मान्य नरक लोकां ॥धृ०॥
नीच नराधम जिवा तारिता । ताप त्या नरा लोकी जगतां ।
क्वचित पापि उपकारा वरितां । जाईन रौरवा कृतार्थ कां ।


(राग : झिंजोटी, ताल : त्रिवट)
प्रेम माया । जयवंता सहाया । वांछि स्वर्गवास जाया ॥धृ०॥
भाव प्रिया दाविता । नाथ तया साथ देतां ।
वारित त्या संकटा । धन्य प्रेमी हा ॥


(राग : मिश्रमांड, ताल : रुपक)
ही आस या मानसा । प्रणयिनी प्रेमा कसा विकासा ॥धृ०॥
प्रेम भरे मन आत्मा । आराधीत । तुज गे सुहासिनी सखे ।
नको विसरुया । लागे पिपासा दासा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP