मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत संन्याशाचा संसार

संगीत संन्याशाचा संसार

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(२५-९-१९१९). संगीत : वझेबुवा,

१ (चाल : उदतन थितलि तौं)

अविरत जगतिं फिरे कालामान । शशि रवि तारकाही ।
अडवि त्यांते कोणी ऐशा नाही ॥धृ०॥
सदवनासि सदाभिमान दे उगम धी निगम
सज्जनमन दुर्जन गुण धिक्कारित जग
सन्मनि शान्त-दान्त व्हाया ॥१॥

२ (चाल : दारादीं दारादीं)
विटला या जगा विफलाश परधामि । निजलोक सहवास मुकला स्वानुगामि ॥धृ०॥
निजधर्म निजनाम । फिरुनि वरि स्वधाम स्वजनि रति तयासि अनुताप सानुकामि ॥१॥

३ (चाल : बैरन ठाडी)
वैरिण झाली । फसवी कशी मला । चोरुनि माझ्या प्रिया आज ही ॥धृ०॥
जरि मज तोडी । जोडि मुकुटा शिरीं ।
अनुगत विभवीं प्रियाला । देउनि झोला । करी त्याग ही ॥१॥

४ (चाल : जानकीरास राजाकी)
वांछिता भावना झाली हिरकमणशी उगम येता ॥धृ०॥
सदा मुकुलिता दिसली । कळि जरि कोमल आतां कुठे रात्री विराजता ॥१॥

५ (चाल : हनुमंतजीने हरखो)
निराधार जीवे जगतां बुडालो बिचारो ।
बुडे बिच्चारा गगनीं तारा नाच नाचता हांसविती मजला
रडवा मेघ सावरिल त्यांना । नाना उदासीन त्या झाल्या आधरा सारा निशेचा पसारा ॥१॥
स्वर्गांगा गगनांगणि डोले चंद्र बिंबिंचा रंग फिका झाला ।
सूर्य निमाला काळोखाचा, साचा । तुफानात वार्‍याचा आवारा सारा तमाचा फवारा ॥२॥

६ (अभंग)
बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी । झालो मी परदेशी तुजविण
ओवाळावी काया चरणावरोनि । केव्हा चक्रपाणी भेटशील ॥१॥
तुका म्हणे माझी पुरवावी आवडी । वेगें घाली उडी नारायणा ॥२॥

७ (आरंभी दादरा)
धूलियुता पदिं तुझ्या पापनाश या जनांत ॥धृ०॥
नाहि दुजी कांहि वासना । ठाव चरणि विभव मजसि
दैवहता हीच भावना । देव दिसलि सदय रमणी ॥१॥

८ (चाल : लागिं लागीं मोरी बिंदिया)
कां ग जागे अता मनिं ममता तळमळ लागे ॥धृ०॥
शैलसमा शिला ह्रदया बांधिता । यौवनकण कसला जगे ॥१॥
स्वैरकरा प्रभा प्रणया जाळिता । त्यगचि रविसमय हा तगे ॥२॥

९ (चाल : कैसि कटेंगी रतिया)
वैरी गमली अबला बाला । समुदित ह्रदयाला काय ॥धृ०॥
रवि करमाला । वाहि धरेला । उषा विरहि वरिता त्याला ॥१॥
तळपत चपला । बघुनि घनाला । लोटि अदय तिजला काळा ॥२॥

१० (चाल : पनघटपर हो गई)
करि विचलित लोचनी नीर । प्रेमरवि समागमे अविकारी ॥धृ०॥
करि झळकत आरंभा । त्या गुणे ह्रदयकमलदल खुलवी
तो हंसवित काल तमाल । धवलिता तारा धांवत  पळती
मृदु सुवासि डुलवि जगता । मधु सुहास्य वदनी रूळतां
आनंदगानिं आकाशा रडवी घाई ॥१॥

११ (चाल : हो मिया जानेवाले)
या जिवा जागवाया । ये माया
प्रखर कठिना वागुरा बांधि काया ॥धृ०॥
नयनिंचा तार उलटा झाला । मिटे कसला
जळे मजला अबला रडवाया ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP