मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ७५

क्रीडा खंड - अध्याय ७५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

चक्रपाणीला मोद बहू झाला ।

तपश्चर्येसी करुन सूत आला ।

सूर्यवरदानें अमर पुत्र होत ।

चक्रपाणी कीं राज्य सुतां देत ॥१॥

पुढें भूपति तो जात अरण्यांत ।

सिंधु सेनेसी सिद्ध तो करीत ।

निघे दिग्विजया भूपा नवा खासा ।

सर्व अवनीसी जिंकितसे व्यासा ॥२॥

(उपेंद्रवज्रा)

ऐकून वार्ता दिति सूत आले । करुन सेना नृप-दास झाले ।

ठेवीत मानें असुरांस सिंधू । वर्धीत सेना करि भूप सिंधू ॥३॥

इंद्रादि लोकांवरि राज्य व्हावें । इच्छून सिंधू दलिं सिद्ध व्हावें ।

आज्ञा दलासी करि भूप खास । आला त्वरें तो अमरावतीस ॥४॥

साधून संधी पिशिताशनांनीं । गेले त्वरेनें पुरिं ते मिळूनी ।

त्यांनीं लुटाया पुरवासि यांना । आरंभ केला छळतीहि नाना ॥५॥

इंद्रास वार्ता कळवीत दूत । ऐरावता सिद्ध करी त्वरीत ।

आरुढ झाला समरास सिद्ध । आला रणासी सुर-भूप सिद्ध ॥६॥

सिंधू करीचे धरि दंत चारी । भूमीस पाडी करिं हा पुढारी ।

पायींच इंद्रा धरिलें करांनीं । गोलाकृती त्या फिरवी करांनीं ॥७॥

जाणोन इंद्रें धरि सूक्ष्म रुप । गेला करींचा निसटून भूप ।

देवांस घेई अपुल्या समीप । विष्णूकडे ते पळती अमूप ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP