मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ४५

क्रीडा खंड - अध्याय ४५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(शार्दूलविक्रीडित)

कीर्तीनें पुशिलें मुनींस वहिलें काशी असे पुण्य-भू ।

तीतें कां त्यजिलें सुरादि मुनींनीं शंभू त्यजी ही प्रभू ॥

याचें कारण हें मला न उमजे शंका निवारा मुनी ।

ऐके प्रश्न मुनी कथीत तिजला ऐके प्रभू कामिनी ॥१॥

पूर्वी या नगरीं अवर्षण पडे वर्षे रवी या मिती ।

जातां सर्व लया पदार्थ म्हणुनी स्वाहा स्वधा राहती ॥

शंभूला स्तविती समस्त सुर हे मागोन घेती तदा ।

सांगे कीर्तिस तो मुनी श्रवण तो वार्ता करी सौख्यदां ॥२॥

(गीति)

वदती देव शिवाला, बहु दिन करिती तपास मारीची ।

मंदारीं वसती ते, तप करिती तीव्र नियम तेथेंची ॥३॥

ऐकुन विनती वदले, वर देणें हें उचीत वाटतसे ।

देवांसह शिव जाती, वर देण्यास्तव गिरीस शीघ्र असे ॥४॥

शिव जर गेले नसते, प्राण मुनीचे खचीत ते जाती ।

ऐशा तपास पाहुन, तोषितसे सांब देव ते होती ॥५॥

सत्वर दूताकरवीं, बैसविलें त्यांस त्या विमानांत ।

धाडिति कैलासीं त्या, मंदारीं बैसती सुरांसहित ॥६॥

जावें काशीमध्यें वाटे हें शंकरास सुमनानें ।

दीवोदास नृपाला, काशीचें राज्य दीधलें विधिनें ॥७॥

जावें काशीमध्यें, परि लागे दोष त्यास अपहरिलें ।

यास्तव त्याच्याकरवीं, पाप बहु पाहिजेच घडवीलें ॥८॥

पाहुन न्यूना मग त्या, मुकवूं काशीमधून त्या राजा ।

नंतर जाऊं तेथें, पूर्वी परि होउंया स्वयें राजा ॥९॥

न्यूना बघण्यासाठीं, पाठवि देवां त्वरीत काशींत ।

न दिसे कोणातें कीं, पुण्य तिथें सर्वदा असे घडत ॥१०॥

जो जो जाई तेथें, रमता झाला सदैव तो देव ।

असती स्वधर्मरत ते, यास्तव पापा तिथें नसे वाव ॥११॥

न्यूनावांचुन काशिंत, जाणें हें योग्य नाहिंसें वाटे ।

यास्तव सदाशिवाला, हुरहुरसें सर्व काळही वाटे ॥१२॥

देव न येती म्हणुनी, भैरव धाडी त्वरीत काशींत ।

गंगा-स्नानें करुनी, तोषितसे क्षेत्र पाहुनी रमत ॥१३॥

नंतर आदित्याला, शिव-देवांनीं त्वरीत पाठविलें ।

न दिसे पाप तयाला, म्हणुनी तेथें खुशालसे बसले ॥१४॥

चौसष्ट योगिनीही, रमल्या तेथें खरोखरी कीर्ती ।

तेथेंच शिवा भजती, तळमळले शंभु-देव श्रविं कीर्ती ॥१५॥

नंतर शिवास वाटे, कार्य मनींचें सुपूर्ण करि केणें ।

विष्णु-गणपति यांविण, दुसरा नाहीं समर्थ हें जाणें ॥१६॥

पुरवी मनोरथासी, मागावें हें अतां स्वयें त्यांना ।

ऐसा निश्चय करुनी, आव्हानुनि आणवी त्वरें सदना ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP