TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय १७

क्रीडा खंड - अध्याय १७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


भृशुंडी कथा (पुढें चालू)

(वसंततिलका)

ज्ञाता विनायक असोन पुसेच भूपा ।

तूं त्या मदीय भजका कथिल्या निरोपा ।

सांगें मला मम कथी न येच भक्त ।

ध्यानांत येइल खरें कथिं तूंच वृत्त ॥१॥

भूपा विनायक पुन्हां अणण्या भृशुंडी ।

जाई त्वरें वद गजानन ये भृशुंडी ।

ऐकून हें प्रथित नामचि काशिराजा ।

येई त्वरें मदिय भक्त इथेंच ओजा ॥२॥

बोलून त्यास निरवी अदिती-सुपुत्र ।

भूपास वाटत असे करणी विचित्र ।

आहो मुनी जवळि कीं मुनि भूप आला ।

आश्चर्य त्या मुनिसि वाटतसे मनाला ॥३॥

राजा वदेल मजला श्रवणास आर्त ।

रायें मुनीस नमिलें वदला यथार्थ ।

यावें मुनी प्रभु गजानन देव आला ।

बोलाविलें त्वरित कीं सदनीं तुम्हांला ॥४॥

ऐकून शब्द मुनि ते बहु हर्ष होई ।

रोमांचही उठति सर्व शरीर ठाईं ।

आले मुनी त्वरित त्या प्रभुदर्शनासी ।

गाठी तृतीयचरणीं मुनि त्या पुरासी ॥५॥

पाहूनियां नृपति वेग मुनी गतीचा ।

वर्णीतसे नृपति तो स्वमुखींच साचा ।

राजा मुनीस यजितो विधियुक्त पूर्ण ।

बोले मुनी नृपतिला प्रभु दावि तूर्ण ॥६॥

वाटे मला फसविलें अणिलेंस राया ।

दावीं प्रभू मजसि तूं सदनांत राया ।

नाहीं तरी तुजसि मी करिं भस्म शापें ।

राजा वदे मुनिस मिथ्य वदे न आपें ॥७॥

कोठें मुलांसहित तो खेळे बिदीसी ।

ज्याची तनू सकल ती भरली धुळीसी ।

आहे विनायक खचीत वदेच राजा ।

तो येतसे जवळि कीं प्रभुभक्त चोजा ॥८॥

पाहे मुनीस नयनीं प्रभु तो विचारी ।

होता गजानन कसा वदणेंच सारी ।

मातें कथा मजसि हो समजून द्यावी ।

वर्णावया मुनि करी सुरुवात भावी ॥९॥

ऐकून रुप धरिलें अधिंचें प्रभूनें ।

इच्छेपरी मुनिस तो दिसतां मुनीनें ।

साष्टांग वंदन करी धरि देव दंडीं ।

आनंदयुक्त दिसला प्रभुसी भृशुंडी ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:08:35.8830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

concordat

  • पु. कॉनकॉरडाट 
  • कॉनकॉर्दा (पु.) (पोप व राज्यकर्ते यांच्यातील करार) 
RANDOM WORD

Did you know?

GAJA LAXMI VRAT MHANJE KAY AANI TE KASE KARAYACHE?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.