मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ३९

क्रीडा खंड - अध्याय ३९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

मुनि सांगे कीर्तीला, ऐकें वृत्तान्त पावला शिव तो ।

मिळतां वर-प्रदाना, मत्त दुरासद प्रवर्तला मुर तो ॥१॥

जिंकुनि अवनी मग ती, स्वर्गावरि पातली असे स्वारी ।

युद्ध न करितां त्यासी, सुरपति लपला गुहेंत कान्तारीं ॥२॥

भीतिस्तव विष्णूनें, स्थल केलें क्षीरसागरीं त्वरित ।

शंभूनें कैलासा, त्यजिलें वस्ती करुन काशींत ॥३॥

त्रिभुवन जिंकुन असुरें, वास कराया मुकुंदपुर योजी ।

पूर्वी भम्सासुरही, वास करी या इथें पुरामाजी ॥४॥

त्याला शिव-देवानें, दिधला वर तूं जया शिरीं हात ।

ठेविसि त्याचें होई, भस्म खरोखर असें असे वृत्त ॥५॥

पाहे असुरपरीक्षा, शंभूच्या मस्तकावरी हस्त ।

ठेवावा योजुनियां, शंभू संनिध त्वरीत ये मस्त ॥६॥

पाहुन शंभु पलायन, करितीही मात ऐकिली हरिनें ।

तेव्हां सुंदर ऐसा, नटला नारी त्वरीत रुपानें ॥७॥

आला संनिध त्याचे, जरि वागसि कीं मदीय आज्ञेनें ।

तरि मी कांता होइन , वदला ऐकून कीं भुले मदनें ॥८॥

तिजसम नृत्य करी तो, करिता झाला असूर हवभाव ।

दिधला तिनें शिरीं कर, ठेवी तैसा असूर करि भाव ॥९॥

ऐसा भाव करुनियां, कर ठेवी कीं त्वरीत भस्म असा ।

रक्षी शिवास हरि तो, वेषा धरुनी त्वरीत नारि असा ॥१०॥

सर्व त्रिभुवन जिंकुन, गर्वानें बोलला सभेमाजी ।

जिंकाया काशी ती, राहे कीं जिंकिली नसे हो जी ॥११॥

सध्यां तेथें शंकर, राहे देवांसहीत जिंकावी ।

म्हणजे पराक्रमाची, सीमा झाली म्हणून समजावी ॥१२॥

दूसासद बोलुनियां, बसता झाला त्वरें विमानांत ।

आला निराळ पंथीं, काशीसंनिध कळे सुरां मात ॥१३॥

गोंधळ झाला तेथें, पूजा हवनें व्रतादि हो बंद ।

पसरे अधर्म तेथें, जिकडे तिकडे न राहिला बंद ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP