मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ३२

क्रीडा खंड - अध्याय ३२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(पृथ्वी)

सुरम्य इतिहास हा मम सख्या तुला सांगतों ।

गजानन कथी अधीं प्रियव्रतास तो ऐकतो ॥

शिवास पुसते उमा शमि गजाननाला प्रिय ।

कशी कथन हो करा मजसि नाथ भक्तप्रिय ॥१॥

प्रिये श्रवण तूं करीं चरित हें असें बोधक ।

पुरातन असा असे प्रियव्रताख्य भू-पालक ॥

असे उचित भाषणीं धवलकीर्ति तो धार्मिक ।

प्रजेस बहु आवडे सकल भूवरी लौकिक ॥२॥

तयास असती प्रभा प्रमुख कीर्ति या अंगना ।

असे प्रिय तया प्रभा वडिल कीर्ति ना ये मना ॥

प्रभासह रमे तिला सु-सुत जाहला सुंदर ।

सुतास मग नांव दे पद्मनाभ अत्यादर ॥३॥

सुबुद्धयुत तो असे करित भूप मौंजीविधी ।

यथासमय पाहुनी करि विवाह ऐकें सु-धी ॥

सुतास नवरी बघे नृपति देश पांचाल तो ।

असे नृपति तेथिंचा वधुस अर्पि नाभास तो ॥४॥

वडील सति कीर्ति ती करित नीच सेवा भली ।

चुरीत पतिपाद ती सवतिनें तिला लाथिली ॥

हकून तिजला दिलें म्हणून कीर्ति खेदावली ।

करुन विषप्राशना हरुं अकीर्ति हें चिंतिली ॥५॥

(गीति)

भूप गुरु ते देवल, ऐकुन आले त्वरीत कीर्तिकडे ।

कारुण्ययुक्त होऊन, गणपतिसेवा करी मुलीऒ निकडें ॥६॥

करितां उपाय हा कीं, संकट वारी गजाननप्रभुजी ।

कीर्ती त्वरीत मूर्ती, मांदाराची करुन ती पूजी ॥७॥

हरि रवि-शिव-दुर्गादी, देव असुनियां गणेश तो आधीं ।

पूजन करणें विधिला, प्रमुख असे सांगतों मुली आधीं ॥८॥

पांचां देवांमध्यें, भेद नसे अधिक वा कमी साचा ।

जाणुन यथोपचारें, गणपति पूजी यथाविधी साचा ॥९॥

पूजन झाल्यावरि कीं, स्तविती झाली प्रभूस ती कीर्ति ।

अनन्यभावें मागे, नाशी माझी अकीर्ति दे कीर्ती ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP